NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

हदगांव तालुक्यात गाराचा पाऊस; रब्बी पिकाचे नुकसान

हदगांव (शे.चांद पाशा) तालुक्यात बऱ्याच ठिकाणी दि.12 रोजी मोठ्या प्रमाणात गाराचा पाऊस झाला. या ठिकाणी तालुक्यातील शेतकर्याचे हरभरा गहु पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे शेतकरी परत कर्ज बाजारी होण्याच्या मार्गावर असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. 

हदगाव तालुक्यातील कोथळा, वाळकी, हरड़फ, वाटेगाव, हड्सनी, निवघा, तामसा, निवघा, उमरी,
नाव्हा, कंजार, तळेगांव, शिरड, इत्यादि ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तसेच गारपिट ही मोठ्या प्रमाणात झाली आहे. या ठिकाणी अगोदर शासनाने कर्जमाफी कमी प्रमाणात दिली असली तरी त्यामध्ये शेतकरीराजा फार सुखावला नाही. की लगेच दि.12 रोजी सायंकाळी गारपिटिने शेतकर्याचे रबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाळकी फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाराचा पाऊस पडल्याने येथील तालुक्यातील शेतकरी वर्गाचे काडनिष अलेला हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले असून, गहु पिकाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी सायंकाळी गारपीटी झाल्याने अखाड्यावरील जनावर यानां गाराचा जबर मार लागला आहे. एकीकडे शेतकर्यावर कर्जमाफीचा डोंगर कोसळला असून, दुसरीकडे निसर्गाच्या गारपीटीने शेतकरी हवाला दिल झाला आहे. या गरपीटी झालेल्या ठिकाणी तहसील प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी. अशी मागणी हदगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. या ठिकाणी नुकसान भरपाई न दिल्यास मोठे आंदोलन करण्याच्या इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशअध्यक्ष माधव पाटिल देवसरकर यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा