NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

लोक न्यायालयात 10 कोटी 45 लाख 27 हजाराचे वाटप

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) रविवारी 10 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात झालेल्या लोकअदालतीमध्ये एकूण 1170 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली. त्यात 10 कोटी 45 लाख 27 हजार 573 रुपये तडजोडीच्या माध्यमाने देण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी.टी.वसावे यांनी दिली आहे.


महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्गदर्शनात नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.पी. कुलकर्णी यांच्या नेतृत्वात 10 फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे सुध्दा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात दिवाणी, फौजदारी, परक्राम्य संर्कीण अभिलेख कायदा, मोटार वाहन अपघात प्रकरणे, भूसंपादन यांच्यासह विविध बॅंकांची प्रकरणे, विद्युत कंपनीचे प्रकरणे, टेलिफोन आणि मोबाईल कंपनीचे प्रकरणे या सर्वांमध्ये एकूण 1170 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाले. त्यात 10 कोटी 45 लाख 27 हजार 573 रुपये लोकांना देण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, सरकारी वकील, सर्व विधीज्ञ, विविध विमा कंपनीचे प्रतिनिधी, भूसंपादन अधिकारी, मनपाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी तसेच   एस.पी.कुलकर्णी यांनी लोकअदालत यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा