NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

ग्रामीण पोलिसांच्या वतीने अपघात टाळण्यासाठी दिशादर्शक चिन्हाचे फलक लाऊन

रोडवरील फांद्या तोडण्याचे सांबाला पत्र  
नवीन नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) मौजे धनेगाव चौक ते असना महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी जागोजागी दिशादर्शक चिन्हाचे फलक व रोडलगत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडून रास्ता मोकळा करावा यासाठी ग्रामीण पो स्टे चे पो नि एस एस अम्ले यांनी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड याना एका निवेदनाद्वारे सूचित केले आहे.
नांदेड हैद्राबाद रोडवरील धनेगाव चौक ते असना महामार्गावर गेल्या आठवड्यात समोरासमोर वाहनांची धडक होऊन अनेक अपघात झाले यात वाहन चालकासह अनेक जण जखमी झाले यामुळे जाणारी येणारी वाहतूक प्रचंड प्रमाणात खोळंबली यामुळे अनेक वाहनधारकांना दैनंदिन नाहक त्रास सहन करावा लागला. या परिसरातील  अनेक गावकर्यांनी दुतर्फा रस्त्यावरील अपघातास कारणीभूत असलेल्या वृक्षांची फांदी तोडण्याची मागणी करून दिशा दर्शक फलक लावण्याची मागणी करत रास्ता रोको केले. अपघातानंतर अनेक वेळेस पोलीस आल्यानंतरच वाहतूक सुरळीत करण्यास यश आले परंतु अपघातास कारणीभूत असलेल्या या रोडवर दुतर्फा वाढलेली झाड्यांच्या फांद्या व दिशादर्शक नसल्याने होणारे अपघात पाहता  ग्रामीण पो स्टे चे पो नि एस एस अम्ले यांनी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड याना एका निवेदनाद्वारे सूचित केले त्यात त्यांनी नमूद करून तात्काळ वृक्षांची फांदी तोडावी जेणे करून पुढून येणारे वाहन वाहन चालकास दिसेल व जागोजागी दिशा दर्शक चिन्हांचे फलक लावून होणारे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होईल. असे पत्र दिल्यानंतर संबंधितांकडून वृक्षांच्या फांद्या तोडण्यास सुरुवात झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा