NEWS FLASH रजनीकांत के बाद कमल हासन की राजनीति में एंट्री, 26 से करेंगे तमिलनाडु का दौरा,... अमेठी से मिशन 2019 का आगाज करने जा रहे हैं राहुल, रास्ते में खाई चाट - पकौड़ी,... 'घर का मामला था, जिसे सुलझा लिया गया है': जज विवाद पर बोले BCI चीफ,... कुरुक्षेत्र में 'निर्भयाकांड', नाबालिग से गैंगरेप के बाद निर्मम हत्या,... रिपब्लिक डे पर धमाकेदार ऑफर, महज डेढ़ हजार में कर सकेंगे हवाई सफर,... दिल्ली की एक प्लास्टिक फैक्ट्री में लगी भीषण आग, लाखों रुपए का सामान जलकर खाक,... वसीम रिजवी को सिर कलम करने की धमकी, मदरसों पर उठाए थे सवाल,... छग : फिल्म 'नायक' की तरह पार्षद ने की एक दिन का सीएम बनाने की मांग,... Army Day: शहीदों के साहस और जज्बे को राष्ट्रपति और प्रधानमंत्री ने किया सलाम, ..., **

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

विद्यार्थ्यांना लहान वयात वाचन संस्कार केले पाहिजे - डॉ. व्यंकटेश काब्दे


नांदेड (अनिल मादसवार) वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना लहान वयात वाचन संस्कार केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय (म.रा.) मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या विद्यमाने  आयोजित "नांदेड ग्रंथोत्सव 2017" च्या समारोप समारंभ प्रसंगी डॉ. काब्दे बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन मनपाचे उपमहापौर विनय गिरडे
पाटील, नगरसेवक बालाजी कल्याणकर, प्राचार्य उत्तमराव सुर्यवंशी, डॉ. सुरेश सावंत, डॉ. जगदीश कुलकर्णी, डॉ. श्याम तेलंग यांची उपस्थिती होती. डॉ. काब्दे म्हणाले, ज्यांना ग्रंथ व गुरु लाभले त्यांचे भाग्य उजळले. वाचन संस्कृतीच देशाची प्रगती साधू शकेल. पुस्तकाची आवड निर्माण होण्यासाठी आणि वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी गाव तेथे ग्रंथालय ही संकल्पना प्रत्यक्षात रुजविली पाहिजे. शासकीय जिल्हा ग्रंथालय आणि अभ्यासिकेतून शासनामध्ये अधिकारी व कर्मचारी पदावर निवड झाल्याचे एक चांगले कौतुकास्पद कार्य झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

उपमहापौर श्री. गिरडे पाटील यांनी सिडको येथे नवीन ग्रंथालय इमारत बांधण्यात आली असून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहे. आता तेथे विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध होत आहे असे सांगितले. डॉ. कुलकर्णी म्हणाले, बऱ्याच ग्रंथालयांनी आता ऑनलाईन सेवा सुरु केल्यामुळे पाहिजे त्या ग्रंथालयातून पाहिजे ते पुस्तक मिळवता येत आहेत. डॉ. सावंत यांनी मागेल त्याला पाहिजे ते पुस्तक दिले तरच वाचन सस्कृंती वृध्दींगत होईल. विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीची पुस्तके देण्यामध्ये शाळांनी कुठेही कमी पडू नये. पुस्तकाची निवड करताना भावनिक व बौध्दिक कुपोषणाचा प्रभाव असू नये असे सांगितले. प्राचार्य सुर्यवंशी यांनी देखील वाचन संस्कृती संदर्भांत जुन्या काळातील उदाहरणे दिली प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी दोन दिवस चाललेल्या नांदेड ग्रंथोत्सव-2017 चा आढावा घेतला. 20 पुस्तक स्टॉल उभारण्यात आले होते. लोकांनी मोठया प्रमाणात पुस्तकांची खरेदी केली. काव्य संमेलन, तुफान विनोदी कार्यक्रम, कथाकथन, परिसवांद, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

वक्तृत्व स्पर्धेत विजयी नितिन कसबे (प्रथम), व्यंकटेश नारलावार (व्दितीय), मुक्तीराम शेळके (तृतीय), राम जाधव (उत्तेजनार्थ), वैशाली भोजने (उत्तेजनार्थ) तर निबंध स्पर्धेत विजयी कु. पायल गाढे (प्रथम), कु.पल्लवी जोगदंड (व्दितीय), कु. सुप्रिया कंकाळ (तृतीय), कु.श्रध्दा कंकाळ (उत्तेजनार्थ), कु.अनघा वटपलवाड (उत्तेजनार्थ) यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते रोख बक्षिसे व प्रशस्तिपत्र देण्यात आले. संत तुकाराम सार्वजनिक वाचनालय, धानोरा आडा यांच्यातर्फे आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे सुरेख संचालन देवदत्त साने यांनी केल्यामुळे त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रंथोत्सव चांगल्या प्रकारे आयोजित केल्याबद्दल जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांचा डॉ. काब्दे यांच्या हस्ते शालश्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. आभार तांत्रिक सहाय्यक प्रताप सुर्यवंशी यांनी मानले. 
टिप्पणी पोस्ट करा

आजकि खास खबर

टेक्स का भुगतान कर प्रशासन को सहयोग करें -- नगराध्यक्ष अ.अखिल

हिमायतनगर (अनिल मादसवार) शहर के नागरिकों ने प्रशासन के आधिकारियो कि और मार्च एन्डपूर्व   टेक्स का भुगतान कर शहर विकास में सहयोग देंवें ऐ...