NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

कु.सुमेधा नंदनवरे हिची अकोलाच्या राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड

गोकुंदा (उत्तम कानिंदे)  मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित माध्यमिक विद्यालय, कोठारी (चिखली) ता. किनवट येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या सुमेधा रविकांत नंदनवरे हिची अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड झाल्याने सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने लातूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विभागस्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटात सुमेधा नंदनवरे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकूल, स्व. वसंत देसाई स्टेडियम, स्टेशन रोड, अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा शिक्षक प्राप्रेम तांदळे यांचे तिला मार्गर्शन लाभले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष अभि. प्रशांत ठमके, सचिव प्राचार्या शुभांगी ठमके, मुख्याध्यापक श्याम बागनवार, प्राचार्य राजाराम वाघमारे, उप प्राचार्य सुभाष राऊत, उप मुख्याध्यापक जे.एस. पठाण, पर्यवेक्षक एच.ए. शेख, डॉ. महेंद्र नरवाडे, के.जी. डांगे, प्रा.व्ही.ए. चव्हाण आदींसह सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा