NEWS FLASH नांदेड़ पुलिस भर्ती में बड़ा घोटाला, होणे के बाद परीक्षा रद्द 15 गिरफ्तार, और भी जगह घोटाला आ सकता है सामने, ..., **

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

युवकाची विहिरीत उडी घेवुन आत्महत्या

माहुर (नृसिंह न्यूज नेटवर्क) माहुर पासुन दहा कीमी अंतरावरील विदर्भातील यवतमाळ जिल्हय़ातील आनंदनगर येथिल बाबाकडे उपचारासाठी जाणारया युवकाने विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजता घडली.

आनंदनगर ता.महागाव येथे गेल्या वर्षभरापासुन एका बाबाचा दरबार भरत असुन त्या बाबाकडे
उपचारासाठी आपल्या आई वडिलांसह जाणारया प्रताप देविदास चिंतावार रा. लखमापुर ता. माहुर जि. नांदेड या १८वर्षीय युवकाने गावालगत असलेल्या पाणिपुरवठ्याच्या विहीरीत अचानक उडी घेवुन आत्महत्या केली. प्रताप हा कोण्यातरी आजाराने ग्रस्त होता त्यामुळे त्याला उपचारा करिता आनंदनगर येथिल बाबाकडे घेवुन जात असताना वडिलांच्या हाताला झिडकारुन पळ काढला व सरळ विहीरीत उडी घेतली. विहीरीला भरपुर पाणी असल्यामुळे तोवर आलाच नाही. त्याच्या आई वडिलांनी आरडा ओरड केल्यामुळे लोक धावुन आले. परंतु तोपर्यंत त्याचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला होता. सदर घटनेची तक्रार पोलिस पाटील सुनिल राठोड यांनी महागाव पोलिसांना दिली. यावरुन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन  पोलिस कर्मचारी युवराज जाधव व गावातील धम्मशिल ठमके, प्रमोद पवार, संदिप राठोड यांच्या मदतीने दोन तासांच्या अथक परिश्रमाने मृतदेह बाहेर काढुन प्रेताचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी सवना येथिल रुग्णालयात पाठविले. यावेळी परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी भेट दिली. पुढील तपास उपनिरिक्षक कैलास भगत, राजेश दोनकलवार, गोटे, जमादार सुरेश पवार, चव्हाण, खाॅन हे करित आहे.

टिप्पणी पोस्ट करा