NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

'अमृत' च्या माध्यमातून नांदेड शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य - आ.अमर राजूरकर

बजाजनगर परिसरात जलवाहिनी कामाचा शुभारंभ 

नांदेड (अनिल मादसवार) अमृत अभियान पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून नांदेड शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यांत येत असून यामूळे आगामी काळात येथिल जनतेला मुबलक पाणी मिळणार असल्याची ग्वाही आ.अमरभाऊ राजूरकर यांनी दिली. केंद्र शासनाच्यावतिने अमृत अभियान पाणी पुरवठा योजनेंतर्गत प्रभाग क्र.6 अंतर्गत बजाजनगर भागात जलवाहिनी टाकण्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आज आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आ.अमरभाऊ राजूरकर यांच्या शुभहस्ते व महापौर सौ.शिला भवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यांत आला. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे, महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीच्या सचिव सौ.ज्योतीताई पवार,नगरसेवक अॅड.महेश कनकदंडे, राजेश यन्नम, संजय पवार, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री.बोडके, मनपाचे कार्यकारी अभियंता के.टी. शास्ञी, अभि.अमित शिराठोणकर आदी मान्यवर उपस्थित होते. छञपतीनगर जलकुंभाची मुक्त जलवाहिनी 250 मि.मि.व्यासाची मुख्य रस्त्यावर असून त्यामधून जूनी 80 मि.मि.ची पूर्वि वाहिनी अस्तित्वात होती त्याऐवजी 'अमृत' च्या माध्यमातून हॅड्रोलिक डिझाईननुसार 160 मि.मि.व्यासाची जलवाहिनी टाकण्यांत येत आहे सदर कामाचाच शुभारंभ आज करण्यात आला.या कामाच्या पुर्णत्वानंतर बजाजनगरसह परिसरातील ज्ञानेश्वरनगर, दत्तमंदिर परिसर आदी भागाचा पाणी प्रश्न सुटणार आहे. महत्वाचे म्हणजे नवनिर्वाचित महापौर सौ.शिला भवरे यांच्या प्रभाग क्र.6 मध्ये बजाजनगर भाग समाविष्ट असून सदर जलवाहिनी कामामूळे या भागात मुबलक पाणी मिळणार असल्यामूळे जनतेत समाधान व्यक्त होत आहे. याप्रसंगी खोबाजी वाळके, बालाजीराव बोबडे, बालाजीराव केजकर, बाबुराव उदगिरे, लक्ष्मणराव पारडे, उपअभियंता बोधनकर, कनिष्ठ अभियंता उत्तम स्वामी आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा