NEWS FLASH नांदेड़ पुलिस भर्ती में बड़ा घोटाला, होणे के बाद परीक्षा रद्द 15 गिरफ्तार, और भी जगह घोटाला आ सकता है सामने, ..., **

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

नांदेड - मुंबई - नांदेड विमानसेवा सुरु.. लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड (अनिल मादसवार) ‘उडान’ या योजनेत समाविष्ट असलेल्या नांदेड येथील विमानतळावरुन नांदेड-मुंबई-नांदेड अशी विमानसेवा सुरु झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी तसेच सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.

नांदेड येथील विमानतळावरुन ‘ट्रु जेट’ या विमान कंपनीकडून दि. 16 नोव्हेंबर 2017 पासून दररोज नांदेड-मुंबई-नांदेड अशी एटीआर-72 विमानाद्वारे
विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या 72 आसनी विमानातील सुमारे 75 टक्के जागा भरण्यात आल्या होत्या. नांदेड ते हैद्राबाद ही 72 आसनी विमानसेवा यापूर्वी दि. 27 एप्रिल 2017 पासून सुरू करण्यात आली आहे. आता नांदेड- मुंबई विमानसेवेमुळे नांदेड हे शहर मुंबई आणि हैद्राबाद या मोठ्या शहरांशी हवाई वाहतुकीद्वारे जोडले गेले आहे. हैद्राबाद-नांदेड विमानसेवेंतर्गत हैद्राबाद येथून सकाळी 9 वाजता विमान प्रस्थान करुन नांदेड येथे सकाळी 10 वाजता आगमन, नांदेड येथून दुपारी 2.40 वाजता प्रस्थान आणि हैद्राबाद येथे दुपारी 3.40 वाजता आगमन असे वेळापत्रक आहे.

नांदेड- मुंबई विमानसेवेंतर्गत नांदेड येथून सकाळी 10.35 वाजता विमानाचे प्रस्थान होऊन मुंबई येथे दुपारी 12.10 वाजता आगमन, तर मुंबई येथून दुपारी 12.45 वाजता प्रस्थान आणि नांदेड येथे दुपारी 2.20 वाजता आगमन असे विमानसेवेचे वेळापत्रक आहे. दि. 29 ऑक्टोबर 2017 ते 15 नोव्हेंबर 2017 या कालावधीत नांदेड विमानतळ तात्पुरता बंद ठेवून  रनवे आणि टॅक्सीवेची दुरुस्ती करण्यात आली. आता 300 प्रवासी क्षमता असलेला हा विमानतळ आधुनिक सोयी-सुविधेसह सुसज्ज असून येथून रात्रीसुध्दा विमान उड्डाणे शक्य आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या विमानसेवेचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे. 
टिप्पणी पोस्ट करा