NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

शिक्षकाचा प्रभावामुळे विज्ञानाची अभिरुची निर्माण होऊन वैज्ञानिक घडतात

गटविकास अधिकारी सुहास कोरेगाव यांचे प्रतिपादन  

हिमायतनगर (अनिल मादसवार) भारत देश अनुशक्तित स्वावलंबी झाला आहे, देश महासत्ता बनत असून, शिक्षण घेताना विद्यार्थ्यांवर शिक्षकाचा प्रभाव असला तर विज्ञानाची अभिरुची मुलात निर्माण होते. त्यामुळे मुले चिकित्सक बनतात व नवनवे प्रयोग करून त्याच्यातील वैधानिक अभिरुचीला प्रेरणा दिली तर भविष्यात संशोधक निर्माण होऊ शकतात असे प्रतिपादन येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुहास कोरेगाव यांनी केले. ते नुकतेच संपन्न झालेल्या राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.

हिमायतनगर येथे दि.२४ रोजी संपन्न झालेल्या ४३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. पुढे बोलताना ते म्हणाले कि, वैधानिक द्रष्टीकोन विज्ञान प्रदर्शनातून मांडण्याची उर विद्यार्थ्यांना मिळते, यासाठी असे प्रदर्शन भरविणे काळाची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून उल्लेख केला. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ वसमतकर, संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव गुंफलवाड, सिप्राचे सचिव दिलीप राठोड, गटशिक्षणाधिकारी रमेश संगपवाड आदींनी मार्गदर्शन करून होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनाचे लेख जोखा संग्रहित ठेवणायची गरज असल्याचे सांगितले. या प्रसंगी केन्द्र प्रमुख पांडे, शिक्षण विस्तार अधिकारी वाटोळे, मुअ गजानन सुर्यवंशी आदींसह तालुक्यातील शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागाचे २८ प्रयोग व माध्यमिक विभागाचे ११ प्रयोग सादर करण्यात आले, यात तालुक्यातील प्राथमिक गटात दहा तर माध्यमिक गटात सात अश्या केवळ सतरा शाळेने सहभाग घेतला होता. 

यामध्ये सौर ऊर्जेचे पारंपारिक उपयोग आणि चांगले रस्ते, वेस्ट पाणी ट्रिटमेंट या प्रयोगाला माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे. दोन्ही प्रयोग राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनि सादर केले होते. ४३ व्या विज्ञान प्रदर्शनात दाखल झालेल्या प्रयोगातून प्राथमिक व माध्यमिक गटात राजा भगीरथ अव्वल ठरले. तर प्रा विभागात द्वितीय क्रमांक राजा भगीरथाने पटकावला आणि तृतीय बक्षीस कन्या शाळा हिमायतनगर, माध्यमिक गटात द्वितीय हुजपा कन्या शाळा हिमायतनगर, तृतीय राजा भगीरथ हिमायतनगर यांनी मिळवला. या विज्ञान प्रदर्शनाचे परिक्षण केंद्र प्रमुख पांडे, शिविअ एम. वाय. वानोळे, एस डी चव्हाण, एम जी टेंभूर्णीकर यांनी केले.  यावेळी मुअ. बासरकर, सुर्यवंशी, गटपाळे, हनवंते, वानखेडे, मुधोळकर, दळवी, पत्रकार अनिल मादसवार, साईनाथ धोबे आदीसह अनेकांची उपस्थित होती. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे बी आर पवार, सुरेश जाधव, डी एल कोंडामंगल, प्रा गोविंद माने, प्रा सोमवंशी, आयरवाड सर, मुळेवाड सर, सुर्यवंशी, बाचावार, कोंडामंगल, बोड्डावार मॅडम, जाधव, आलेवाड, वानखेडे, शिंदे मॅडम, आदीनि परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर उत्तरवार यांनी केले तर आभार अशोक अनगुलवार यांनी मानले. 

तालुक्यात शेकडो शाळा... सहभाग मात्र १७ चा 

दरम्यान विज्ञान प्रदर्शनाचे नियोजनबद्द कार्य केले नसल्याने तालुक्यात शासकीय जिल्हा परिषदेच्या शेकडो व खाजगी बोटावर मोजनाइतक्या शाळा असताना देखील केवळ १७ शाळांचा सहभाग दिसून आल्याने याबाबत संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची अनुत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. यास शिक्षण भागाची उदासीनता म्हणायची कि तालुक्याची गुणवत्ता ढासळली..? या प्रश्नाचे उत्तर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने शोधून आगामी वर्षी विज्ञान प्रदर्शनात  जास्तीत जास्त शाळांचा सहभाग कसा वाढेल याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे मत शिक्षणप्रेमी पालकातून व्यक्त होत आहे.  
टिप्पणी पोस्ट करा