NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

नांदेड जिल्हयात एक लाख चोवीस हजार शौचालय

पायाभूत सर्वेक्षणानंतर बांधले 2 लाख 40 हजार शौचालय

नांदेड (अनिल मादसवार) नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागातील नागरीकांच्‍या आरोग्‍यमानात बदल घडवून आणण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्‍हयात वेगवेगळे उपक्रम राबविले, त्‍यामुळेच मागील सात महिण्‍यामध्‍ये सुमारे 1 लाख 24 हजार 789 शौचालये बांधण्‍यात आली आहेत.

ग्रामीण भागात शौचालय बांधकामासाठी सन 2012-
13 या वर्षात पायाभूत सर्वेक्षण करण्‍यात आले होते. या सर्वेक्षणानुसार नांदेड जिल्‍हयात 3 लाख 21 हजार 206 शौचालय बांधकामाचे उद्दिष्‍ट देण्‍यात आले होते. त्‍यानुसार आजमितीला 2 लाख 40 हजार 727 शौचालय बांधण्‍यात आली आहेत. यात अर्धापूर, मुदखेड, माहूर, धर्माबाद, हिमायतनगर, नांदेड व भोकर ही सात तालुके हागणदारीमुक्‍त झाली आहेत. चालू वर्षात 1 लाख 23 हजार 520 शौचालय बांधून नांदेड जिल्‍हा राज्‍यात पहिला क्रमांकावर आहे. यात बिड जिल्‍हयाने 1 लाख 17 हजार 29 शौचालय बांधली आहेत. सोलापूर (हागणदारीमुक्‍त) जिल्‍हयात 1 लाख 12 हजार 341, उस्‍मानाबाद 83 हजार 782 तर नाशिक जिल्‍हयाने 83 हजार 323 शौचालय बांधून पाचव्‍या क्रमांकावर आहे. मागच्‍या वर्षीत पुणे जिल्‍हा परिषदेने 1 लाख 21 हजार 897 शौचालये बांधली होती. परंतू नांदेड जिल्‍हयाने अवघ्‍या सात मिहिन्‍यात 1 लाख 24 हजार 789 शौचालय बांधून नवा विक्रम केला आहे. आतापर्यंत जिल्‍हयातील 835 ग्राम पंचायती पायाभूत सर्वेक्षणानुसार हागणदारीमुक्‍त झाल्‍या असून यापैकी चालू वर्षातील 725 ग्राम पंचायतींचा समावेश आहे.

शौचालय बांधकामासाठी गेल्‍या अनेक वर्षापासून विविध उपक्रम जिल्‍हयात राबविण्‍यात आले होते. परंतू जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री अशोक शिनगारे यांनी मिशन मोड राबविल्‍यामुळे शौचालय बांधकामाला गती प्राप्‍त झाली. यापूर्वी जिल्‍हास्‍तरावरील अधिकारी, तालुकास्‍तरावर गट विकास अधिकारी व विस्‍तार अधिकारी यांचा आढावा घेतला जायचा. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री अशोक शिनगारे यांनी गावात काम करणा-या थेट ग्रामसेवक यांच्‍याशीच त्‍यांनी संवाद साधला. यातून ग्रामस्‍तरावरील ख-या अडचणी जाणून घेऊन प्रत्‍यक्ष कामाला सुरुवात केली. त्‍यामुळेच नांदेड जिल्‍हयात शौचालय बांधकामाला गती प्राप्‍त झाली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी शौचालय बांधकामासाठी नांदेड जिल्‍हयात मिशन 181 उपक्रम, मिशन फास्‍ट ट्रॅक 75, मिशन दस अश्‍वमेध, फोर्स फिनिक्‍स, फास्‍ट्र ट्रॅक 100 व मिशन लक्षवेध आदी उपक्रम राबवले. यामुळे शौचालय बांधकामाचे उदिष्‍ट साध्‍य करण्‍यास जिल्‍हा प्रशासनाला यश मिळाले आहे. नांदेड जिल्‍हयाने शौचालय बांधकामाचे 80 टक्‍के उदिष्‍ट साध्‍य केले आहे. जिल्‍हयातील 9 तालुके हागणदारीमुक्‍तीसाठी शौचालयाचे बांधकाम केले जात आहेत. जिल्‍हयात 78 हजार शौचालयाचे बांधकाम केल्‍यास संपूर्ण जिल्‍हा हागणदारीमुक्‍त होणार आहे. यात उमरी तालुक्‍यातून 2 हजार 618 शौचालयाचे बांधकाम शिल्‍लक आहे, हदगाव 908, बिलोली 6 हजार 536, देगलूर 7 हजार 968, कंधार 14 हजार 671, किनवट 15 हजार 107, लोहा 11 हजार 308, मुखेड 10 हजार 286 तर नायगाव तालुक्‍यातून 8 हजार 973 शौचालयाचे बांधकाम शिल्‍लक आहे. येत्‍या डिसेंबर 2017 अखेर हे तालुकेही हागणदारीमुक्‍त करण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला आहे.

शौचालय बांधकामासाठी जिल्‍हयात विविध जनजागृतीसह स्‍वच्‍छताही सेवा पंधरवडा गावस्‍तरावर राबविला. यात महिला बचतगट, शालेय विद्यार्थी, ग्राम पंचायतीसह विविध स्‍वंयसेवी संस्‍था यांचा सहभाग घेण्‍यात आला. 17 सप्‍टेंबर रोजी जिल्‍हयातील सर्व कार्यलायातून स्‍वच्‍छता मोहिम, शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या प्रभात फे-या, शौचालयासाठी शोषखड्डे आदी उपक्रम जिल्‍हयात राबविण्‍यात आले. शौचालयाचा वापर आणि ग्रामीण भागातील नागरीकांचे आरोग्‍यमान उंचावणे हाच मुख्‍य हेतू घेवून जिल्‍हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. केवळ शौचालय बांधून चालणार नाही तर त्‍याचा वापरही झाला पाहिजे, यासाठी जिल्‍हयात माहिती शिक्षण व संवादाचे एलईडी व्‍हॅनव्‍दारे मोठया प्रमाणात जनजागृती, सर्व बसस्‍थानक व रेल्‍वे स्‍टेशनध्‍ये स्‍वच्‍छतेचे बॅनर, जिंगल जाहिराती, माळेगाव येथे स्‍वच्‍छता स्‍टॉल आदी उपक्रम जिल्‍हा परिषदेच्‍या जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्षाच्‍या वतीने राबविण्‍यात येणार आहेत. 
टिप्पणी पोस्ट करा