NEWS FLASH रजनीकांत के बाद कमल हासन की राजनीति में एंट्री, 26 से करेंगे तमिलनाडु का दौरा,... अमेठी से मिशन 2019 का आगाज करने जा रहे हैं राहुल, रास्ते में खाई चाट - पकौड़ी,... 'घर का मामला था, जिसे सुलझा लिया गया है': जज विवाद पर बोले BCI चीफ,... कुरुक्षेत्र में 'निर्भयाकांड', नाबालिग से गैंगरेप के बाद निर्मम हत्या,... रिपब्लिक डे पर धमाकेदार ऑफर, महज डेढ़ हजार में कर सकेंगे हवाई सफर,... दिल्ली की एक प्लास्टिक फैक्ट्री में लगी भीषण आग, लाखों रुपए का सामान जलकर खाक,... वसीम रिजवी को सिर कलम करने की धमकी, मदरसों पर उठाए थे सवाल,... छग : फिल्म 'नायक' की तरह पार्षद ने की एक दिन का सीएम बनाने की मांग,... Army Day: शहीदों के साहस और जज्बे को राष्ट्रपति और प्रधानमंत्री ने किया सलाम, ..., **

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

दिलीप धोंडगे यांच्यावर पक्षाकडुन मोठी जबाबदारी

परभणी व लातुर शहर जिल्हा निरीक्षक म्हणुन नेमणुक 

नांदेड (अनिल मादसवार) राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे प्रदेश सरचिटणिस तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे यांच्यावर पक्षाने अजुन एक मोठी जबाबदारी सोपवली आहे,  लातुर व परभणी शहर जिल्हा निरीक्षक म्हणुन त्यांची नियुक्ती करण्यात आली असुन तसे पत्र राष्ट्रवादी युवक कांॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी दिले आहे. 

शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकरआण्णा धोंडगे यांच्या मुशीत घडलेले व अभ्यासु व लोकप्रिय युवक नेते  असलेले  दिलीप धोंडगे यांनी आजपर्यंत अनेक जनहितांच्या प्रश्नांना वाचा फोडत सरकार व प्रशासनाला धारेवर धरुन पिडीत वंचीतांना न्याय
मिळवुन दिला आहे, लिंबोटी, विष्णुपुरी धरणातुन पाणीपाळ्यांसाठी आंदोलन असो अथवा शेतकर्यांच्या कृषीपंपाचे कनेक्शन तोडु नये म्हणुन अगदी आक्रमकपणे त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते, शिवाय पिक आणेवारी, शेतीमालाला योग्य भाव मिळणे, यासाठीही त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे.  जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना काम घेऊन येणार्या प्रत्येक सामान्य नागरीकांची आस्थेवाईकपणे विचारपुस करुन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणीक प्रयत्न त्यांनी केला आहे, त्याचवेळी त्यांनी शेतकर्यांच्या हिताचे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे  यशस्वी आयोजन केले होते. सध्या त्यांच्या गाव तिथे राष्ट्रवादी या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे, गावोगावी मोठ्या प्रमाणावर युवक दिलीप धोंडगे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये सामील हेत आहेत. ज्या ज्या वेळी पक्षाने  दिलीप धोंडगे यांच्यावर जबाबदारी सोपवली ती अगदी यशस्वीपणे त्यांनी पार पाडली आहे. त्यांचे संघटन कौशल्य व कामाची तडफ पाहुन यापुर्वी पक्षाने दोनवेळा त्यांना प्रदेश सरचिटणिस पदाची जबाबदारी सोपवली होती,त्यापुर्वीही त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती त्यावेळीही त्यांच्याकडे पुणे व परभणी जिल्हा निरीक्षकपदाची जबाबदारी होती, विद्यापीठ सिनेट निवडणुकीतही त्यांनी पक्षाचा झेंडा फडकवला होता.

संपुर्ण मराठवाडाभर त्यांचा असलेला मोठा जनसंपर्क व पक्षाने सोपवलेली जबाबदारी अगदी निष्ठेने पार पाडण्याची त्यांची वृती यामुळेच राज्य पातळीवर काम करण्याची  संधी पक्षाने त्यांना दिली आहे , आणी  आताही पक्षाचे नेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी  परभणी व लातुर जिल्हा निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवुन दिलीप धोंडगे यांच्या  नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. व तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या माध्यमातुन मराठवाडाभर युवकांचे मजबुत संघटन करत सरकारच्या अपयशावर हल्लाबोल करुन शेतकरी , शेतमजुर, युवक, बेरोजगार, सामान्य नागरीक यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम अविरतपणे ते करत असतात,  शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी शेतकरी नेते माजी आ शंकरआण्णा धोंडगे यांनी राज्यव्यापी शेतकरी शेतमजुर सुरक्षा अभियान सुरु केले त्यावेळी या अभियानात मराठवाड्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा सांगली तसेच नाशिक या जिल्ह्यांतील युवकांना मोठ्या संख्येने सहभागी करुन अभियान यशस्वी करण्याचे काम त्यांनी केले आहे. पक्षाने सोपवलेल्या या जबाबदारीलाही ते योग्य न्याय देतील व संपुर्ण मराठवाड्यात पक्षाचे संघटन अधिक मजबुत करुन आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला य़श मिॆळवुन देतील असा विश्वास येथील युवक व्यक्त करत आहेत. 

पक्षाने सोपवलेली जबाबदारी प्रामाणीकपणे पार पाडत मराठवाड्यात युवकांचे मजबुत संघटन उभा करुन सर्वसामान्य नागरीकांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी सरकारविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा मनोदय दिलीप धोंडगे यांनी व्यक्त केला. मराठवाडास्तरीय युवक मेऴाव्याचे लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याची माहीती त्यांनी दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

आजकि खास खबर

टेक्स का भुगतान कर प्रशासन को सहयोग करें -- नगराध्यक्ष अ.अखिल

हिमायतनगर (अनिल मादसवार) शहर के नागरिकों ने प्रशासन के आधिकारियो कि और मार्च एन्डपूर्व   टेक्स का भुगतान कर शहर विकास में सहयोग देंवें ऐ...