NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

पाणीपुरवठा विभागाचे अभियंता भोजराज यांना डिसेंबर अखेरची डेडलाईन...

अन्यथा कार्यवाहीसाठी तयार राहा - आ.नागेश पाटलांनी ठणकावले  

हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील अनेक गावाच्या पाणी पुरवठा करणाऱ्या समित्यानी कामे अर्धवट ठेवल्याने वाळक्याची वाडी, करंजी, आदेगांव, दिघी, कांडली, पारवासह अनेक गावाच्या पाणी पुरवठ्याची कामे गुत्तेदाराणे अर्धवट ठेऊन पळ
काढल्याने संबंधित गावकर्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षीच्या पाणीटंचाई आढावा बैठकीतील प्रश्न मार्गी लागलेले नसल्याची बाबही अनेकांनी बोलून दाखविली. त्यामुळे संभाव्य

कृती आराखड्या संदर्भाच्या पाणीटंचाई बैठकीत कशाचा ताळमेळ कशाला लागत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत आमदार महोदयांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी भोजराज यांना डिसेंबर अखेरची डेडलाईन देत तात्काळ कामे पूर्ण करा. अन्यथा कार्यवाहीला सामोरे जावे लागेल असे ठणकावून सांगितल्याने उपस्थित सरपंच व पाणी टंचाईने हैराण झालेले नागरिकांना रखडलेली योजना आता पूर्णत्वास जाईल असे वाटू लागले आहे. 

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दि.२१ मंगळवारी तालुक्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाई संदर्भात कृती आराखडा बैठक आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मंचावर गटविकास अधिकारी सुहास कोरेगाव, सहाय्यक गटविकास अधिकारी सुधीश मांजरमकर, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष गजानन तुप्तेवार, मदनराव पाटील सिरपल्लीकर, बंडू पाटील आष्टीकर, प.स.माजी सभापती सौ. आडेलबाई हातमोडे, प.स.सदस्य पंडित रावते, राम नाईक राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शेळके, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अरविंद काटकर आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.  

बैठकीच्या सुरुवातीपासूनच काही सरपंचानी अर्धवट रखडलेल्या नळयोजनेच्या कामाच्या तक्रारी केल्या. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना पाणी पुरवठा अधिकारी भोजराज यांची बोलतीच बंद झाली होती.त्यानंतर टंचाई सदृश्य प्रत्येक गावात बोअर - विहीर अधिग्रहण, नवीन विंधन विहिरी, पूरक नळयोजना, नवीन नळयोजनेच प्रस्ताव, अतिखडकाळ गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे सुचविले. संबंधित सरपंच व ग्रामसेवकाने सुचविलेल्या सर्वच कामांना प्राथमिकतेने मान्यता देण्यात यावी अशी नोंद आमदार महोदयांनी सूचनेद्वारे गटविकास अधिकारी व संबंधितांना दिल्या. गतवर्षीच्या बैठकीत मंजूर बोअर देण्यात आले. त्यापैकी काही ठिकाणी हातपंप घेतले तर काही ठिकाणी मोटारपंप बसवून पाणी पुरवठा चालू केल्याचा प्राथमिक अहवाल पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी दिली. मात्र यावर्षी आढावा बैठकीतच्यावेळी अनेक सरपंच, उपसरपंच व पदाधिकार्‍यांनि रोखठोक भाषेमध्ये सांगितले कि, मागील वर्षी बैठकीत मंजूर झालेले बोअर बर्‍याच ग्रामपंचायतीना मिळालेच नाहीत. त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या विभागात अंधळ दळतय कुत्र पिठ खातय असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रशासनावर आमदाची वचक राहीली नाही का ? असा प्रश्न उपस्थित करून गेल्या तीनवर्षांपासून पाणी टंचाईच्या बैठका आमदार महोदयांच्या झाल्या. त्यानंतर माजी आमदार व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांनी सुध्दा पाणीटंचाईच्या बैठक घेऊन तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आजही अनेक गावे टंचाईग्रस्त का ? असा सवाल टंचाई बैठकीत आलेल्या सरपंचानी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. मागील वर्षीच्या बैठकीतील पाढे या बैठकीत आमदार महोदयापुढे माडल्याने पाणीटंचाई बाबत गेल्या वर्षीचे प्रश्न सुटले नसल्याचे उघड झाले. आज संपन्न झालेल्या संभाव्य पाणीटंचाई बैठकीला अनेक  अधिकार्‍यांचा वानवा तसेच जबाबदार पंचायत समितीचे सभापती व उपसभापतींची अनुपस्थिती प्रकर्षाने दिसून आली. त्यामुळे याना जनतेच्या पाणी टंचाईच्या प्रश्नाबाबत जागरूकता नाही काय..? बैठक तालुका पाणी टंचाईची असताना त्यांची गैरहजेरी अनेकांना खटकली.

तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून कृषी कार्यालयाकडून पाणलोटची मोठ्या प्रमाणात कामे झाली. तसेच जलसंपदा विभागाने जलसंधारणची कामेही मोठ्या प्रमाणावर केली. जलयुक्त शिवाराची बंधारे झाली. परंतु आज हिमायतनगर तालुका एवढ्या मोठ्या पाणीटंचाईला दिवाळीपासूनच सामोरे जात आहे. त्यामुळे कुठे पाणी मुरते... याचा शोधे घेणे गरजेचे असल्याचे अनेकांनी व्यक्त केले. तसेच कोट्यावधी रुपये खर्च करून पाणी पुरवठ्याच्या अर्धवट कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी आणि यावर देखरेख करणारे पाणी पुरवठा अधिकारी भोजराज यांची चौकशी करून कामे पूर्ण करावी अशी मागणी अनेकांनी लावून धरली होती. गेल्या तीन वर्षांपासून वारंवार सूचना देऊनही कामात कोणतीच सुधारणा होत नसली तरी डिसेंबर अखेरपर्यंत रखडलेले कामे पूर्ण करून संबंधित गोरे नामक गुत्तेदारावर कार्यवाही करा अश्या सक्त सूचना आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिल्या. तसेच कामे मार्गी लागली नाही तर तुम्हाला कार्यवाहीला सामोरे जावे लागेल असे ठणकावुन सांगितले. आमदार  महोदयांच्या रुद्रावतारामुळे पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी खरचं रखडलेली कामे मार्गी लागतील याकडे सर्वांचे कटाक्षाने लक्ष राहणार एवढे मात्र खरे. बैठकीचे सुरेख असे सूत्रसंचालन प्रदीप सोनटक्के यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प.स.विस्तार अधिकारी रविराज क्षीरसागर यांनी मानले.

कागद काळा करायला शिका  
महावितरणद्वारे केल्या जाणाऱ्या वीजपुरवठा खंडित बाबतही अनेक तक्रारी झाल्या. यावेळी आमदारांनी संबंधित उपकार्यकारी अभियंता अरविंद काटकर याना सूचना करून आपल्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वागणूक द्यावी. शासनाच्या नियमाप्रमाणे थकबाकीचा तगादा न लावता चालू बिल भरून घेऊन शेतकऱ्यांसह ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा सुरळीत करावा. तसेच ज्यां शेतकऱ्यांची वीज कनेक्शन प्रलंबित आहेत त्यांची वीज जोडणीची समस्या तातडीने सोडवाव्या यासाठी थेट कार्यकारी अभियानात श्री गोपुलवाड यांच्याशी संपर्क साधून तात्काळ समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या. एवढेच नव्हे तर शेतकरी बांधवानी सुद्धा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आगाऊ खर्चाची सवय लावू नये, आपल्यामुळेच कर्मचाऱ्यांना लाचखोरीच्या सवयी लागत आहेत. जर कुणी कोणत्याही कामासाठी पैसे मागत असले तर थेट कागद काळा करायला शिका असे आवाहनही त्यांनी सर्वाना केले.
टिप्पणी पोस्ट करा