NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

'बार्टी' च्या वतिने संविधान दिन जागृती सप्ताहास सुरूवात

अर्धापुर (नृसिंह न्यूज नेटवर्क) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) च्यावतिने समतादूत दिपाली हाडोळे यांच्या मार्गदर्शनात अर्धापूर तालुक्यामध्ये संविधान दिन जागृती सप्ताहास सुरूवात करण्यांत आली आहे.

संविधान दिनानिमित्त 'बार्टी' च्यावतिने विविध उपक्रम राबविण्यांत येत असून दि.21 ते 27 नोव्हेंबर या कालावधित संविधान दिन जागृती सप्ताह
आयोजित करण्यांत आला आहे. संविधानातील मुल्याविषयी प्रबोधन व संविधान जनजागृती या माध्यमांतून करण्यांत येत असून दाभड येथून या सप्ताहाची सुरूवात करण्यांत आली.डौर येथे शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी संविधान जागृती फेरी काढली तसेच, शेलगांव येथे संविधान प्रस्ताविका वाचन व विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यांत आली. अर्धापूर तालुक्यातील सर्वच गांवात संविधान दिन जनजागृती सप्ताह निमित्त सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यांत येत असल्याचे समतादूत दिपाली हाडोळे यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा