NEWS FLASH नांदेड़ पुलिस भर्ती में बड़ा घोटाला, होणे के बाद परीक्षा रद्द 15 गिरफ्तार, और भी जगह घोटाला आ सकता है सामने, ..., **

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

संविधान आणि शहीददिना निमित्त 26 रोजी रक्तदान शिबिर


नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) भारतीय संविधान दिवस, 26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना विनम्र अभिवादन करण्यासाठी, संत रोहिदास यांच्या पुण्यतिथी आणि युगपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनाचे औचित्य साधून अंगुली सेना तथा कॉंग्रेसचे नगरसेवक बाळू राऊत यांच्या वतीने येत्या 26 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


आयोजित रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आ. अमिताताई चव्हाण, माजी पालकमंत्री आ.डी.पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, महापौर शीला किशोर भवरे, उपमहापौर विनय गिरडे पाटील, युवा नेते नरेंद्र चव्हाण यांच्यासह नगरसेविका सुनंदा सुभाष पाटील, ज्योती किशन कल्याणकर, विलास धबाले, रमेश गोडबोले, सुभाष रायबोले, मंगेश कदम, दिनेश मोरताळे, बालाजी सूर्यवंशी, दुष्यंत सोनाळे, महेंद्र पिंपळे आदींची उपस्थिती राहणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी तरोडा नाका शेतकरी चौकात सकाळी 10 वाजता हे रक्तदान शिबिर होणार आहे. आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन अंगुली सेना आणि नगरसेवक दीपक (बाळू) राऊत यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा