NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

पोलीस अधीक्षकांनी 23 पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवली 200 दंडाची नोटीस

नांदेड (रामप्रसाद खंडेलवाल) नांदेड जिल्ह्यातील 3200 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 23 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी 200 रुपये दंडाची नोटीस दिली आहे. पोलीस दलातील एकूण संख्येच्या हिशोबात नोटीस दिलेल्या पोलीसांची टक्केवारीत संख्या 0.71875 अशी आहे. या पोलीसांवर शारिरीकदृष्ट्या अपात्र असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर. पाटील असतांना त्यांनी शारिरीकदृष्ट्या तंदुरूस्त असणाऱ्या पोलीसांना दरमहा रोख भत्ता देण्याची एक योजना जाहीर केली. ती योजना आजही चालू आहे. त्यात फक्त दरवर्षी ज्या पोलीसांना
हा शारीरिक तंदुरूस्ती भत्ता हवा आहे. त्यांनी  दरवर्षी आपली वैद्यकीय तपासणी करुन घेणे बंधनकारक आहे. त्यातील सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा उंची आणि त्या मानाने वजन महत्त्वपुर्ण आहे. यावर्षी पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकानुसार पोलीसांना शारिरीक तपासणी करण्याची सुचना नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी केली. त्यात नांदेडच्या लोटस हॉस्पिटलमध्ये जावून तपासणी करण्यासाठी सांगण्यात आले. त्याप्रमाणे ज्या पोलीसांनी शारीरिक तंदुरूस्ती भत्ता मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्या सर्वांनी लोटस हॉस्पीटलमध्ये जावून तपासणी केली. तेथे झालेल्या तपासणीचा अहवाल कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला देण्यात आला नाही. प्राप्त  माहितीनुसार त्या तपासणीत 90 टक्के पोलीस तंदुरूस्त आल्यानंतर जिल्ह्यातील 23 पोलीसांना पोलीस दवाखान्यात तंदुरूस्तीची तपासणी सांगण्यात आली. त्या पोलीसांमध्ये श्यामसुंदर नागरगोजे, चांद अकबर शेख, एम.डी. खान, सुधाकर रणविरकर, महादेव पालेवार, बाबुराव हटकर, गोविंद धोंडगे, ओमदेव जुगनाळे, पांडूरंग गजगे, बालाजी गोतराम, अशोक गुडपे, दिगंबर जमजाल, गजानन देवडे, केशव हाके, पंडीत रामजी राठोड, हेमंत चोले, गिता जोशी, चंदर अंबेकर, भुजंग खेडकर, संजय कंधारे, संजयकुमार पवार, नारायण कदम, मारोती मुंडे आणि माणिका आव्हाड यांचा समावेश आहे. 

या सर्व पोलीसांना जा.क्र. एस.बी./171/5/कसूर (401) का.दा.नो. /2017 नुसार पोलीस अधिक्षकांनी नोटीस दिली आहे. या नोटीसीमध्ये असे लिहिले आहे की, आपण लोटस हॉस्पीटल नांदेड येथे तपासणी केल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले हेाते. त्यांची पोलीस दवाखाना नांदेड येथे फेर वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता तुम्ही अपात्र असल्याचे अहवालात दिसून येते आहे. अशा प्रकारे वास्तवीकरित्या प्रोत्साहन भता मिळण्यास पात्र नसतांना तुम्ही पात्र असल्याचे प्रमाणपत्र दाखल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करुन गंभीर स्वरुपाची कसूरी केली आहे. त्यामुळे मुंबई पेालीस (शिक्षा व अपील) नियम 1956 मधील नियम क्रमांक 3 अन्वये शिक्षेस पात्र आहात. ही नोटीस मिळाल्यानंतर हे 23 पोलीस कर्मचारी परेशान आहेत. कारण सर्व लोकांची तपासणी लोटस हॉस्पीटमध्ये झाली. त्यातील 23 जणांना पोलीस दवाखाण्यात का पाठविण्यात आले ? याही पेक्षा विशेष बाब अशी आहे की, पोलीस दवाखान्यात या 23 चीच तपासणी झाली पण प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी पुन्हा एकदा नांदेडच्या सरकारी रुग्णालयात सर्वांची तपासणी झाली. तोही अहवाल कोणालाच माहित नाही.

ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्याला शारीरिक तंदुरुस्ती भट्ट मिळण्यासाठी अर्ज केला नाही अश्याही  अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना नुसता भत्ताच मिळाला नाही तर त्या भत्त्याच्या थकीत रक्कम सुद्धा मिळाल्या. याचा जबाबदार कोण..? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा काहीच प्रयत्न पोलीस अधीक्षकांनी केला नाही. याचे आश्चर्य नोटीस प्राप्त झालेले २३ पोलीस कर्मचारी बोलत आहेत. त्यामुळे या 23 लोकांची फेर तपासणीसाठी झालेली निवड कशी करण्यात आली याचा कांहीच उल्लेख या नोटीसमध्येच नाही. यामुळे जयदीपसिंघ शाहूने किंवा त्यांच्या कुटूंबियांनी जास्त नाराज होण्याची गरज नाही.

कारण ज्या 3200 पोलीसांचे मुळ पालकच पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा आहेत. त्यांनी त्यातील 23 जणांना पाठविलेली नोटीस नक्कीच जयदीपसिंघ शाहू आणि त्याच्या परिवाराला आधार देणारी आहे. या संदर्भाने या 23 नोटीस प्राप्त पोलीसांना भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की, एखाद्या व्यक्तीच्या उंची प्रमाणात त्याचे वजन एका आलेखाद्वारे निश्चित आहे. त्यातही 20 बी.एम.पी.चा फरक असला तर तो माणूस तंदुरूस्त मानला जातो. मग फक्त 23 पोलीस कसे शोधून काढले याच्या विवंचनेत हे 23 पेालीस आहेत. 
टिप्पणी पोस्ट करा