NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

हदगावच्या शासकीय वस्तीगृहाच्या महिला गृहपालाने घेतली फक्त 20 हजारांची लाच

आणि झाली जेरबंद 
नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीगृह असून या वस्तीगृहाच्या गृहपाल कु. किशोरी अनंतराव अलोने यांनी भोजन पुरवठा करण्याचे बिल मंजुर करून देण्यासाठी 20 हजार रूपयंाची लाच मागितली असल्याची तक्रार नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे दाखल झाली. या तक्रारीनुसार दि. 20 नोव्हेंबर रोजी सापळा रचून 20 हजारांची लाच घेताना किशोरी अलोने यांना अटक केली.
हदगाव येथे समाज कल्याण विभागामार्फत शासकीय मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह चालविले जाते. या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करण्यासाठी एका खाजगी गुत्तेदाराकडे काम आहे. भोजन पुरवठा बिल मंजुर करण्यासाठी गृहपाल किशोरी यांच्याकडे बिल सादर केले असता त्यांनी बिल मंजुर करण्यासाठी तक्रारदात्याकडून 20 हजार रूपयांची लाच मागितली होती, अशी तक्रार तक्रारदात्याने नांदेड लाचलुच प्रतिबंधक विभागाकडे दि. 14 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार दि. 21 नोव्हेंबर रोज मंगळवारी सापळा रचून किशोरी अलोने यांना 20 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. याबाबत हदगाव पोलिस ठाण्यात लाच स्वीकारल्याप्रकरणी कु. किशोरी अनंतराव अलोने वय 36 व्यवसाय गृहपाल शासकीय मुलींचे वस्तीगृह हदगाव ता. हदगाव मुळ राहणार दारव्हा जि. यवतमाळ यांच्याविरूद्ध हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि कपिल शेळके हे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा