NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

hetkaryane Bandhala Bandhara शेतकऱ्याने बांधला श्रमदानातून बंधारा

बहुजन समाज बाबासाहब की मूर्ति परस्ती की बजाय उनके बताये मार्गपर चले - लक्ष्य

लखनौ (नृसिंह न्यूज नेटवर्क) लक्ष्य की युथ  टीम ने संविधान दिवस के अवसर पर एक दिवसीय कैडर कैम्प दिल्ली के मीठापुर में आयोजित किया। जिसमें युवाओं ने बढ़- चढ़कर हिस्सा लिया। 

लक्ष्य कमांडर मिलाप सिंह ने संविधान दिवस के अवसर पर सभी युवाओं को बधाई दी तथा बाबा साहब डॉ भीम राव अम्बेडकर के योगदान के  बारे में विस्तार

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

सरसम में अवैध शराब की बिक्री को परमानेंट बंद करें

विवादमुक्त समिति अध्यक्षसहित महिलाओं की मांग
अन्यथा पुलिस स्टेशन के सामने आंदोलन करने के दिए संकेत

नांदेड़ (अनिल मादसवार) हिमायतनगर तहसील में आनेवाले ग्राम सरसम बु. के इंदिरानगर इलाका क्षेत्र मी शराब बंदि कि मांग करणे के उपरांत भी अवैद्य शराब कि बीक्रि बेझिजक जारी है/ इस मामले में विवादमुक्त समिति अध्यक्षसहित महिलाओं ने शराब बेचना अवैध होणे कि बात पुलिस को बताई और साथ हि पुलिस ठाणे में आकार नोटिस द्वारा बिक्रेता पर कारवाई कि मांग कि है/ परमानेंट शराब कि बिक्री बंद न हुई तो आगामी दिनो में पुलिस ठाणा क्षेत्र में आंदोलन छेडने कि चेतावणी भी दि है/ इस मामले कि भनक लागते हि अवैद्य शरभ बिक्री करनेवाला बिक्रेता फरार हो गया है।

MLA Bachhu Kadu Speach Part -2 आसूड सभेतून आ.बच्चू कडू

डॉ बी.आर. आंबेडकर ने बहुजन समाज व् महिलाओ को मानवीय जीवन दिया - लक्ष्य

लखनौ (नृसिंह न्यूज नेटवर्क) दिनांक 26 नवंबर 2017 को लक्ष्य की टीम ने सविधान दिवस के अवसर पर उत्तर प्रदेश के जिला बाराबंकी के बिहुरी  गावं में एक कैडर कैम्प करके लोगो संगीत के माध्यम से भीम गाथा सुनाई !  इस कैडर कैम्प में गावं के लोगो ने विशेषतौर पर महिलाओ ने बढ़चढ़कर हिस्सा लिया ! कैडर कैंप की शुरुवात लक्ष्य की महिला कमांडरों ने बुद्ध वंदना से की ! उन्होंने डॉ भीम राव आंबेडकर के संघर्ष को विस्तार से लोगो को समझाया !

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

Vidnyan Pradarshan तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

Polisacha Atmhatyecha Prayatn पोलिसाने केला आत्महत्येचा प्रयत्न

कॉ. अर्जुन आडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करा - माकपा.

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अर्जुन आडे हे दि. 24 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किनवट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेले असता एका पोलीस कर्मचाऱ्यांनी विनाकारण त्यांच्याशी हुज्जत घालत, बाचाबाची करून धक्काबुकी केली. 

पोलीस शिपाई बेग यांना निलंबित करण्याची मागणी

भाकपचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन 

माहुर (नृसिंह न्यूज नेटवर्क) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नांदेड जिल्हा सचिव काॅ.अर्जूण आडे यांना काल दि.24/11/20 17 रोजी पोलीस शिपाई इद्रीस बेग यांनी किनवट येथिल उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात धक्का देऊन आपमानीत केल्यामुळे त्या पोलीस शिपाईला त्वरीत निलंबीत करा. अन्यथा उग्र स्वरुपाचे अंदोलन करण्यात येईल अशी मागणी माहुर तालुका भाकप (मार्क्सवादी) पक्षाच्या वतिने उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच्या इमारतीवरून एक पोलिसाने केला आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांनीच ठरवला निष्क्रिय 

नांदेड (रामप्रसाद खंडेलवाल) आज सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालया समोर डॉ. हंसराज वैद्य यांच्या इमारतीवरुन स्वतःच्या गळ्यात दोरी बांधून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने केलेला प्रकार वजिराबादचे पोलीस निरीक्षक आणि अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून हाणून पाडला.

आज सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालया समोर काही

5 लाखांच्या चारचाकीसह 27 हजारांची देशी दारू पकडली

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) काल दि.24 नोव्हेंबरला रात्री दहा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर पोलिसांनी एका चारचाकी वाहनात जाणारी 27 हजारांची दारु पकडली आहे. सोबतच तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजीनगरचे पोलीस हवालदार मारोती नारायण तेलंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आपल्या पोलीस

'बार्टी' च्या वतिने संविधान दिन जागृती सप्ताहाची भोकरमध्ये सुरूवात

भोकर/नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) च्यावतिने समतादूत कु.राणीपद्मावती बंडेवार यांच्या मार्गदर्शनात भोकर तालुक्यामध्ये संविधान दिन जागृती सप्ताहास सुरूवात करण्यांत आली असून या निमित्ताने विविध उपक्रम घेण्यांत येत आहेत.

संविधान दिनानिमित्त 'बार्टी' च्या वतिने विविध

मुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन

मुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) लहूजी साळवे कर्मचारी महासंघ व पुरोगामी शिक्षक समिती मुखेडच्या वतीने संविधानिक मूल्य आणि सामाजिक अनुकुलता व परिवर्तन चळवळीतील आव्हाने आणि लसाकमची भूमिका या विषयावर कामगार नेते फारुक अहमद व लसाकमचे पुर्व महासचिव बालाजी थोटवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जि. प. हा. मुलींची शाळेच्या सभागृहात करण्यात येणार असल्याची माहिती पि. एल. दाडेराव यांनी दिली.

श्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता

नवीन नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) तुप्पा येथे ,श्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठाव ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सोहल्याची सांगता २३ नोव्हेंबर हभप किशन महाराज बरबडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने झाली या वेळी हजारो भाविकांची उपस्तिती होती.   

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या

'बार्टी' च्या वतिने संविधान दिन जागृती सप्ताहास सुरूवात

अर्धापुर (नृसिंह न्यूज नेटवर्क) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) च्यावतिने समतादूत दिपाली हाडोळे यांच्या मार्गदर्शनात अर्धापूर तालुक्यामध्ये संविधान दिन जागृती सप्ताहास सुरूवात करण्यांत आली आहे.

संविधान दिनानिमित्त 'बार्टी' च्यावतिने विविध उपक्रम राबविण्यांत येत असून दि.21 ते 27 नोव्हेंबर या कालावधित संविधान दिन जागृती सप्ताह

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

शिक्षकाचा प्रभावामुळे विज्ञानाची अभिरुची निर्माण होऊन वैज्ञानिक घडतात

गटविकास अधिकारी सुहास कोरेगाव यांचे प्रतिपादन  

हिमायतनगर (अनिल मादसवार) भारत देश अनुशक्तित स्वावलंबी झाला आहे, देश महासत्ता बनत असून, शिक्षण घेताना विद्यार्थ्यांवर शिक्षकाचा प्रभाव असला तर विज्ञानाची अभिरुची मुलात निर्माण होते. त्यामुळे मुले चिकित्सक बनतात व नवनवे प्रयोग करून त्याच्यातील वैधानिक अभिरुचीला प्रेरणा दिली तर भविष्यात संशोधक निर्माण होऊ शकतात असे प्रतिपादन येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुहास कोरेगाव यांनी केले. ते नुकतेच संपन्न झालेल्या राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.

सगरोळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी एच .के.तोडे वा-यावर

बिलोली (शिवराज भायनुरे) बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे पशुवैद्दकिय दवाखाना असुन या ठिकाणी पशुवैद्दकिय अधीकारी म्हणुन डॉ.एच.के.तोडे याची नियुक्ती करण्यात आली असुन ते गेल्या सहा महिण्या पासुन बेपता असुन सदरिल पशुवैद्दकिय दवाखाना नेहमी बंद राहत असल्यामुळे अनेक समस्याच्या विळाख्यात सापडला आहे.

या पशुवैद्दकिय दवाखाण्यात जणावराना वैद्दकिय उपचारासाठी सगरोळीसह, केसराळी, रामपुर, हिप्परगाथडी,

नगराध्यक्षपदाच्या पदभार सेनेच्या उपाध्यक्ष मोहम्मद जफरोद्दीन यांनी स्विकारला

कंधार (सचिन मोरे) नगरविकास राज्य मंत्री रणजित पाटील यांनी कंधारच्या नगराध्यक्ष शोभाताई नळगे यांना पदापासून हटवल्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्षाच्यापदावर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे खंदे समर्थक सेनेच्या उपनगराध्यक्ष महंमद जफरोद्यीन यांची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली. सौ.शोभाताई नळगे बाहेर गावी गेल्याने गुरुवार दि.२३ नव्हेंबर रोजी एकतर्फी जफरोदिन यांना अध्यक्षपदाचा पदभार सोपवण्यात आला.

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या निळ हरणाचा अखेर मृत्यू

वनअधिकारी, कर्मचारी व डॉक्टरचे प्रयत्न निष्फळ  

हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील सरसम बु. शिवारात चारण्यासाठी निघालेल्या हरणाच्या  कळपापैकी एका निळं जातीच्या हरणास मोकाट कुत्र्यांनी गंभीररीत्या जखमी केल्याची घटना दि.२२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली होती. त्या जखमी हरणावर कामारी येथील पशुधन विकास अधिकारी डाॅ. कदम यांनी उपचार करून प्राण वाचविले मात्र अधिक धास्ती घेतलेल्या हरणाचा रात्रीला मृत्यू झाला आहे. वनअधिकारी व डॉक्टरांनी केलेले शर्तीचे प्रयत्न करूनही ते निष्फळ ठरले आहेत.

घरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण

मुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) तालुक्यातील प्रधानमंत्री आवास व राज्य पुरस्कारीत योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, पारधी घरकुल योजना, इंदिरा आवास योजना, व आदी घरकुल योजनांसाठी प्रस्ताव दाखल केलेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समिती मार्फत आॅनलाईन करणे चालू असून गेल्या आठ दिवसांपासून सदर साईड बंद असल्यामुळे तालुक्यातील सर्व लाभार्थी हैराण झाले आहेत.

रेल्वे पटरीच्या कामाकरिता नांदेड- लिंबगाव -चुडावा-पूर्णा दरम्यान 07 दिवस ब्लॉक

नांदेड (अनिल मादसवार) नांदेड - लिंबगाव - चुडावा - पूर्णा दरम्यान रेल्वे पटरीच्या दुरुस्ती (टेम्पिंग) च्या कामाकरिता दिनांक 28.11.2017 ते 06.12.2017 दरम्यान रोज 2.30 तास असा 07 दिवसांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात येत आहेत, तर काही उशिरा धावतील. यात दिनांक 30.11.2017 (गुरुवारी) आणि 04.12.2017 (सोमवारी)  कोणताच ब्लॉक घेण्यात येणार नाही.

‘रुसा’ निधीतून बांधकाम परवानगीसाठी नियमावली तयार करा - विनोद तावडे

मुंबई (नृसिंह न्यूज नेटवर्क) राज्यातील विद्यापीठांना विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा, संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी राज्य शासनाकडून तसेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत  निधी मंजूर होतो. या निधीतून संबंधित विद्यापीठांना आवश्यक ते बांधकाम करण्यासाठी परवानगीची आवश्यकता असून त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विशेष नियमावली तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले.

कोस्टा क्रूझच्या पहिल्या फेरीचे पर्यटन मंत्र्यांनी केले स्वागत

क्रूझ पर्यटनाला मुंबईतून मिळणार मोठी चालना

मुंबई (नृसिंह न्यूज नेटवर्क) मुंबई हे महाराष्ट्रासह देशाचे क्रूझ पर्यटनाचे (समुद्र पर्यटन) केंद्र ठरत असून जगातील नामांकित अशा कोस्टा क्रूझ कंपनीने चालू सिझनमधल्या पहिल्या क्रूझची सुरुवात मुंबईहून केली. मुंबई-कोचीन-मालदिव या मार्गाने जाणाऱ्या क्रूझचा शुभारंभ आणि स्वागत राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे करण्यात आले. अवघ्या २९ हजार ८०० रुपयात मुंबई ते कोचीन दरम्यान डोमेस्टिक क्रूझचा आनंद

ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूटमुळे कॅन्सरग्रस्तांना चांगली सुविधा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर (नृसिंह न्यूज नेटवर्क) कॅन्सरवर आज अनेक आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. त्याद्वारे कोणत्याही टप्प्यातील कॅन्सर बरा केला जाऊ शकतो. त्यामुळे कॅन्सर रुग्णांनी निराश होऊ नये, असे सांगून कॅन्सरवरील उपचारासाठी जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान कोल्हापूरमध्ये आणल्याबद्दल मुख्यमंत्री

१५ लाख ४२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे ६५०० कोटी भरले - मुख्यमंत्री

राज्यातील शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली कर्जमाफी आधारच्या माध्यमातून करुन पारदर्शी कर्जमाफी करण्यावर भर दिला. महाराष्ट्रातील 15 लाख 42 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे 6 हजार 500 कोटी रुपये आजच भरले असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापुढे 10 लाख शेतकऱ्यांची यादी पुन्हा 10 लाख शेतकऱ्यांची यादी अशा पध्दतीने कर्जमाफीचे काम येत्या 10 ते 15 दिवसात पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दारूगोळा तयार आहे, आदेशाची वाट पाहतोय - जाधव

जिल्हाप्रमुख पदासह इतर पदांवरील नियुक्त्या लवकरच

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) नांदेड शहरात शिवसेना संघटनात्मक पातळीवर कमकुवत असल्याचा फटका महानगरपालिका निवडणुकीत बसला. त्यामुळेच शिवसेनेच्या मतांमध्ये घट झाल्याची कबुली शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी शुक्रवारी येथे दिली. या पराभवाचे चिंतन आम्ही करीत आहोत, असेही ते म्हणाले. शासकीय विश्रामगृहावर नांदेड उत्तर विभानसभा क्षेत्रातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस महिलांची बैठक


नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला संघटनेची महत्वपूर्ण बैठक दि. 25 रोज शनिवारी दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली आहे. माजीमंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाध्यक्ष बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

मूळ आदिवासी अन्यायग्रस्तांचा 30 रोजी आक्रोश मोर्चा

सुरेशराव अंबुलगेकर यांनी दिली माहिती

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) मूळ आदिवासी अन्यायग्रस्तांचा आक्रोश मोर्चा दि. 30 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती अन्यायग्रस्त मूळ आदिवासी समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेशराव अंबुलगेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

सन 1980 पासून शासनावर दबाव तंत्राचा वापर करून महाराष्ट्रात बहुसंख्येने असणाऱ्या मन्नेरवारलु, कोळी महादेव, तडवी, राजगोंड, हालबा, माना या जमातीय प्रशासकीय स्तरावर जमात प्रमाणपत्र काढण्यासाठी

गरीब, गरजू रुग्णांसाठी किनवट येथे वैद्यकीय, दंत शिबिराचे मोफत आयोजन

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोमवार 27 ते गुरुवार 30 नोव्हेंबर या कालावधीत आदिवासी भागातील गरीब व गरजू रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा किनवट येथे वैद्यकीय व दंत शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. 

दयाळा एवढे द्यावे, रंग न फुलाचे जावे - प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी

नांदेड ग्रंथोत्सवामध्ये रंगली काव्यमैफल


नांदेड (अनिल मादसवार) जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने आयोजित नांदेड ग्रंथोत्सव-2017 मध्ये सुप्रसिध्द ज्येष्ठ कवी प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक नामवंत कवींनी आपल्या कविता सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.

नांदेड - मुंबई - नांदेड विमानसेवा सुरु.. लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड (अनिल मादसवार) ‘उडान’ या योजनेत समाविष्ट असलेल्या नांदेड येथील विमानतळावरुन नांदेड-मुंबई-नांदेड अशी विमानसेवा सुरु झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी तसेच सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.

नांदेड येथील विमानतळावरुन ‘ट्रु जेट’ या विमान कंपनीकडून दि. 16 नोव्हेंबर 2017 पासून दररोज नांदेड-मुंबई-नांदेड अशी एटीआर-72 विमानाद्वारे

५० लाखांपेक्षा अधिकची फसवणूक प्रकरणात बंटीला तीनदिवस पोलीस कोठडी आणि बबलीला जामीन

नांदेड (रामप्रसाद खंडेलवाल) विज वितरण कंपनीमध्ये नौकरी लावण्यासाठी 14 जणांकडून 50 लाखापेक्षा अधिकची रक्कम उखळणाऱ्या नाशिक येथील एकाला नांदेडच्या 6 व्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन एल गायकवाड यांनी 27 नोव्हेंबर 2017 पर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.

नांदेडच्या श्रीनगर भागात राहणाऱ्या दिगंबर माधवराव पांचाळ यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात 9

"डॉ. तात्या लहाने ... अंगार ... पावर इज विदीन”

चित्रपट १२ जानेवारी २०१८ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे 

"कथा मातृत्वाची, कथा त्यागाची, कथा संघर्षाची, कथा जिद्धीची" असलेला चित्रपट "डॉ. तात्या लहाने ... अंगार ... पावर इज विदीन" हा  विराग मधुमालती एंटरटेनमेंट निर्मित असून तो १२ जानेवारी २०१८ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  राष्ट्रमाता जिजाऊ यांचे मातृत्व  व जिद्द तसेच स्वामी विवेकानंद यांचा त्याग व संघर्ष या गुणांना अभिवादत करण्याच्या हेतूने या दोन्ही महामानवांच्या जयंती दिनी म्हणजेच १२ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित

आनंद शोधू नका ! निर्माण करा ! - ॲड. अनंत खेळकर

नांदेड (अनिल मादसवार) सध्या धकाधकी व ताणतणावाच्या वातावरणात जगताना आनदांचे क्षण दुर्लभ होत चालले असून याचे महत्वाचे कारण मनुष्य आनंदाचा शोध घेत असतो. तसे न करता आनंद शोधण्यापेक्षा तो निर्माण करा, असे आग्रही प्रतिपादन प्रसिद्ध हास्य कलाकार अॅड. अनंत खेळकर यांनी केले.

नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित नांदेड ग्रंथोत्सव 2017 अतंर्गत अकोला

जिल्ह्यातील 760 गावात संभाव्य पाणी टंचाई जाहीर

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) महाराष्ट्र भुजल अधिनियम (विकास व व्यवस्थापन) 2009 चे कलम 20, 25 व 26 अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 760 गावे / वाडी / तांड्यामध्ये सद्यस्थितीत पाणीटंचाई भासण्याची शक्यता असल्याने संभाव्य पाणी टंचाईग्रस्त जाहीर केले आहेत.  

वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून नांदेड जिल्हा निरिक्षण विहिरींचा मागील 5 वर्षातील पाणी पातळीची सरासरी तुलना ऑक्टोंबर

मुखेड मध्ये मराठी पाट्याच्या मुद्यावरून मनसे आक्रमक

शहरातील शासकीय कार्यालयात दिले निवेदन

मुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) नुकत्याच पार पडलेल्या ठाण्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी बाजारपेठेतील दुकानांवर मराठी पाट्या व स्थानिक बँकेत होत असलेली मराठी भाषेची गळचेपी यावर खंत व्यक्त केली. याच पर्शवभूमीवर महाराष्ट्रत महाराष्ट्र सैनिकांनी दंड थोपटले. मुंबई, ठाणे, नाशिक,पुणे, धुळे, सातारा पाठोपाठ आज नांदेड  मुखेड मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बाजारपेठेतील दुकानाना तसेच शाळा , महाविद्यालये, चित्रपटगृहावरी तसेच उपहारगृह व वाणिज्य संस्था यावरील पाट्या

कृषि यांत्रिकीकरण उपअभियानांर्तगत शेतकऱ्यांना अनुदानावर औजारे उपलब्ध

नांदेड (अनिल मादसवार) खरीप व रब्बी हंगाम 2017 मध्ये उन्नत शेती समृध्द शेतकरी या मोहिमेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण याबाबीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिल्लक अनुदान खर्च करण्यासाठी शुक्रवार 8 डिसेंबर 2017 पर्यंत ट्रॅक्टर व  इतर औजरासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 

यापुर्वी 16 मे 2017 पर्यंत ट्रॅक्टर, इतर औजारांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात एकुण 2 हजार

नांदेड जिल्हयात एक लाख चोवीस हजार शौचालय

पायाभूत सर्वेक्षणानंतर बांधले 2 लाख 40 हजार शौचालय

नांदेड (अनिल मादसवार) नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागातील नागरीकांच्‍या आरोग्‍यमानात बदल घडवून आणण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्‍हयात वेगवेगळे उपक्रम राबविले, त्‍यामुळेच मागील सात महिण्‍यामध्‍ये सुमारे 1 लाख 24 हजार 789 शौचालये बांधण्‍यात आली आहेत.

ग्रामीण भागात शौचालय बांधकामासाठी सन 2012-

परसराम तांड्यावरील आपद्‌ग्रस्तांना उबदार साहित्यांचे वाटप

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) लोहा तालुक्यातील उमरा ग्रामपंचायत अंतर्गत ग्रूप ग्रामपंचायत वार्डमध्ये सहभागी असलेल्या परसराम तांडा येथे 13 नोव्हेंबर रोजी लागलेल्या आकस्मिक आगीत सहा कुटुंबियांचे अतोनात नुकसान झाले होते. 

“क्रीडा महोत्सव-२०१७” स्पर्धेकरिता स्वारातीम विद्यापीठाचा संघ रवाना

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) “क्रीडा महोत्सव-२०१७” राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा दि.२७ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर या दरम्यान दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या क्रीडा महोत्सवामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ सहभागी होण्यासाठी आज शुक्रवार, दि.२४ नोव्हेंबर रोजी रवाना झाला आहे. याक्रीडा महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील २० विद्यापीठे सहभागी होणार आहेत.

मुखेड येथे संविधान दिन गौरव सोहळयाचे आयोजन

मुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) 'आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करत आहोत.' भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या याच मसुद्याला 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळेच 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

महाकाली शक्तिउत्सव कार्यक्रमाची भव्य शोभा यात्रा व अग्निप्रवेशाने सांगता

हिमायतनगर (नृसिंह न्यूज नेटवर्क) प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाकाली शक्तिउत्सव कार्यक्रमाची दि. २३ रोजी अकाली भव्य शोभा यात्रेने सुरुवात करण्यात आली आहे. 

शहरातील बोरगाडी रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या महाकाली मंदिरात मार्गशीर्ष शुक्ल ५ शके १९३९ गुरुवार दि.२३ रोजी सकाळी

टंचाईच्या पार्शवभूमीवर तहसीलदार कडुन पैनगंगा पात्राची पाहणी

पेयजल समस्येवर मात करण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न 



माहूर (सरफराज दोसाणी) विदर्भ मराठवाडय़ाला जोडणारी जिवन वाहिनी पैनगंगा कोरडी पडल्याने माहुर शहर व रेणुका देवी गडावरील पाणी पुरवठा खंडीत झाला आहे.पैनगंगा नदीत पुस धरनातुन पाणी सोडण्या साठी स्थानिक तहसील, नगरपंचायत प्रशासनानी त्यांचा पातळीवरुन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केले असुन उग्ररुप धारण करु पाहत असणाऱ्या पेयजल समस्येवर मात करण्यासाठी नगराध्यक्ष, आमदार, खासदार यांनी थेट राज्याच्या पाणी पुरवठय़ामंत्र्या पर्यंत संपर्क साधल्याने लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल असी अपेक्षा असुन तूर्तास चेंडु  कार्यकारी अभियंत्याचा कोर्टात असुन दत जयंती उत्सव तोंडावर असल्याने त्वरीत पाण्याची व्यवस्था करण्यात यावा अशी मांगणी रेणुकादेवी संस्थान चे विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी केली आहे.

हंगेरी-भारत उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण - सुभाष देसाई

मुंबई (नृसिंह न्यूज नेटवर्क) राज्यात शिक्षण, अन्न प्रक्रिया उद्योग, वस्त्रोद्योग तसेच संरक्षणासाठी लागणाऱ्या उद्योगांमध्ये हंगेरीने गुंतवणूक करण्यास पुढे यावे, राज्यात सध्या गुंतवणुकीसाठी तसेच उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण असल्याने दोन्ही देशांमधील औद्योगिक वाढीला चालना मिळेल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे सांगितले.

अभिमान आम्हाला संविधानाचा... समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वाचा

जगातील कोणत्याही देशापेक्षा सर्वात मोठे लिखित असे संविधान तयार करुन, केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला महत्वपूर्ण संविधानरुपी अनमोल असा ठेवा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. निश्चितच हे संविधान म्हणजे आपल्याला मिळालेले अलौकिक असे अनमोल, दिव्य रत्न आहे.  26 नोव्हेंबर 1949 रोजी आपले भारतीय संविधान संमत झाले मात्र त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी सुरू झाली. यास 68 वर्षे पूर्ण झाली आहेत.

भारतीय संविधान हे इंग्रजी भाषेत असून हिंदी भाषेतील प्रतही कायदेशिरदृष्ट्या ग्राह्य आहे. जागतिक पातळीवर श्रेष्ठत्व असलेले आपले

तुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रास जि.प.आध्यक्षाचीं भेट

नवीन नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) जिल्हा परिषद आध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर यांनी तुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देउन येथील कुटुंब कल्यान शस्ञक्रिया झालेल्या लाभार्थीच्या आडीआडचनी जानुन घेत आय. एल.आर. या डिप फ्रीझर याची पहानी करुन येथील वैद्यकीय आधिकाऱी डॉ.बालाजी राठोड व डॉ. सौ.पेरगुलवार याच्यासी विविध विषयावर चर्चा केली.

बळीरामपुरच्या लाभार्थ्याना लवकरच श्रावण बाळ व निराधार योजनेचा लाभ मिळणार

नविन नांदेड़ (नृसिंह न्यूज नेटवर्क) बळीरामपुर येथील काहि लाभार्थ्याना संजय ग़ांधी निराधार योजना व श्रावण बाळ या योजनेचा लाभ गेल्या वर्षापासून मिळाला नसून त्यासाठी गावात दवंडी देऊन आज ग्रामपंचायत येथे मा.जीप सदस्य आनंद गुंडले व सरपंच आमोल गोडबोले यानी त्यांची कागद पत्र तपासून नायब तहसीलदार पाटे यांच्या स्वाधीन केले.

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

ग्रंथ वाचनातून संकटावर मात करण्याची शक्ती मिळते - आ. हेमंत पाटील

नांदेड (अनिल मादसवार) ग्रंथ हेच माणसाचे खरे मार्गदर्शक आणि गुरु असून ग्रंथ हे माणसाला संकटावर मात करण्याची शक्ती देतात तसेच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जगाविषयीचे अमाप ज्ञान माणसासमोर ठेवतात, असे प्रतिपादन नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय, नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह शेजारी आयोजित "नांदेड ग्रंथोत्सव -2017" चे उद्घाटन आ. पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

आजची अमृतसर - सचखंड एक्स्प्रेस दुपारी 14.30 वाजता सुटणार

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) गाडी संख्या 12716 अमृतसर – हजूर साहिब नांदेड सचखंड  एक्स्प्रेस हि येणारी गाडी 14.00 तास उशिरा येत आहे. यामुळे गाडी संख्या 12715  हु.सा.नांदेड –अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आज दिनांक 24.11.2017  रोजी (Friday) सकाळी 09.30 वाजता एवजी दुपारी 14.30 वाजता सुटेल. याची प्रवाश्यानी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सरसम येथे गीता जयंती महोत्सवाला सुरुवात

सरसम (साईनाथ धोबे) दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु. येथील भगवान श्रीकृष्ण मंदीरात २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत श्री ज्ञानेश्वरी  पारायण, श्रीमद् भगवत गीता पारायनाने गीता जयंती महोत्सव साजरी केली जाणार आहे. 

तालुक्यात एकमेव असलेल्या सरसम बु. येथील श्री कृष्ण मंदिराच्या परिसरात गीता जयंती निमित्ताने हभप. श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर याचे शिष्य हभप श्री नारायणराव जोशी महाराज

केंद्रीय अर्थसहाय्य योजनेंतर्गत विविध व्यवसायासाठी प्रशिक्षण

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत सन 2017-18 या वर्षातील केंद्रीय अर्थसहाय्य योजनेंतर्गत  संगणक, ब्युटी पार्लर, फॅशन डिझाईन, मोबाईल दुरुस्ती, ॲटो मोबाईल, टीव्ही, रेडीओ, फेब्रीकेशन, वेल्डींग वर्कशॉप, ड्रॉव्हींग पेंटीग, मोटार रिवायडींग आदी व्यवसायासाठी प्रशिक्षणासाठी शुक्रवार 24 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्ज करण्याची अंतीम मुदत आहे.

शेतकऱ्यांसाठी कृषि संदेश

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) नांदेड कृषि उपविभागातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार या 5 तालुक्यामध्ये तूर, कापूस, हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पातंर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पिक किडीच्या संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे. 

कापशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेनवलेरट 20 इसी 8 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यु पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तुर शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेंझोएट 5 एस जी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर

राजमाता जिजाऊ स्वालंबन पुरस्कारासाठी

बँकर्सनी 28 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत दरवर्षी अतिउत्कृष्ट व सक्षम बचतगटांना जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार शासनामार्फत दिला जातो. जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य असलेल्या बँक शाखांनी आपले प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरुन संबंधित गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड

इंटरनेट पाहण्याचा कालावधी निश्चित असावा - डॉ. नंदकुमार मुलमुले


नांदेड (अनिल मादसवार) इंटरनेट पाहण्याचा कालावधी निश्चित केला पाहिजे. यासाठी मोबाईल वापराचा अतिरेक टाळुन मोबाईल वापरण्यात शिष्टाचार असला पाहिजे, असे प्रतिपादन "माध्यम संस्कृती व  वाचन संस्कृती"  या विषयावर आयोजित परिसवांदात डॉ. मुलमुले यांनी केले.

वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी ग्रंथगुढी उभारली पाहिजे असे डॉ. हनुमंत भोपाळे म्हणाले.