NEWS FLASH नांदेड़ पुलिस भर्ती में बड़ा घोटाला, होणे के बाद परीक्षा रद्द 15 गिरफ्तार, और भी जगह घोटाला आ सकता है सामने, ..., **

बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

मुखेड शिवेसेनेच्या वतीने महागाई विरोधात धरणे आंदोलन


मुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) जनतेच्या विविध समस्या घेऊन मुखेड शिवसेनेच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर दि. 20 सप्टेबर रोजी गॅस ठेवून चुल पेटवून धरणे आंदोलन करण्यात आले. 

केंद्र शासनाने अच्छे दिन अशी घोषना केली होती ती सर्व जनतेनी उघडया डोळयांनी अनुभवली व ती घोषना दिवास्वप्न ठरली. त्यात महिलोंका सम्मान हा सम्मान नसून महिलांचे कंबरडे महागामुळे मोडले
आहे. गोर गरीब व्यापारी, शेतकरी यांना लागणारे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, तेल, साखर यामध्ये प्रचंड वाढ झाली असून रेशन दुकानावर मिळणा­या गोर गरीबांच्या वस्तु गहू , तांदुळ, साखर रॉकेल या मालामध्ये कपात व झालेली दरवाढ ही गोर गरीब लोकांना परवडणारी नाही. संबंध तालुक्यात पावसाचे प्रमाण कीमी असून मुग , उडीद, सोयाबिन , कडधान्य हे शेतक­याचे हातचे गेले असून यामुळे शेतकरी त्रस्त आहे. नैसर्गिक व माणव निर्मित आपत्तीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत.जनतेचा रोष ओढवण्याच्या अगोदर शासनाने त्वरीत महागाईवर नियंत्रण आणावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको व तिव्र आंदोलन छेडण्यात येईल या प्रकारचे निवेदन तहसिलदार मुखेड यांना देण्यात आले. या निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनुरकर, किसान सेनेचे जिल्हा प्रमुख शंकर पाटील लुट्टे, उप तालुका प्रमुख संजय बेळीकर ,माजी नगराध्यक्ष अनिल जाजू, उप तालुका प्रमुख गंगाधर पिटलेवाड, शहर संघटक राजू गंदपवाड, पं.स. सदस्य जे. बी. कांबळे, पं.स. सदस्य नागनाथ कोटीवाले, संजय पाटील लादगेकर, गजानन पत्की, सतिष डाकुरवार, कृष्णा कामजे, अतुल चव्हाण, पप्पु पाटील डुमणे, मिलिंद लोहबंदे, रवि गंदपवाड, इम्रान आत्तार, बजरंग कल्याणी, माणिक देवकत्ते,आदींच्या स्वाक्ष­या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा