NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

प. पू. मातासाहेब देवांजी जन्म शताब्दी सोहळा उत्साहात साजरा करावा - जिल्हाधिकारी डोंगरे

नांदेड (अनिल मादसवार) प. पू. मातासाहेब देवांजी यांची 336 वी जन्म शताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. 

मुदखेड तालुक्यातील गुरुद्वारा मुगट येथे प. पू. मातासाहेब देवांजी यांची 336 वी जन्म शताब्दी सोहळा सोमवार 2 ते बुधवार 4 ऑक्टोंबर 2017 या
कालावधीत साजरा होणार आहे. याची पूर्व तयारीसाठी गुरुद्वारा मुगट येथे झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. डोंगरे हे अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी संतबाबा बलविंदर सिंघ कारसेवावाले, मुगट येथील मातासाहेब देवांजी गुरुद्वाराचे प्रमुख श्री जत्थेदार बाबा प्रेमसिंघजी निंहगसिंघजी, नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे प्रभारी अधीक्षक ठाणसिंघ बुंगई, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या सोहळ्याच्या निमित्ताने सेवा करण्याची संधी मिळाली आहे. राज्य व राज्याबाहेरील भाविक, भक्त मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी येतील. त्यांच्यासाठी सर्व सुविधा पुरवणे आवश्यक आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करुन सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात. तसेच 24 तास विद्युत पुरवठा, स्वच्छता, दूरसंचार, बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था आणि आरोग्य सुविधांबाबत संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन आपआपल्या विभागाने दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडाव्यात अशा सूचना करुन श्री. डोंगरे यांनी हा सोहळा शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. 

यावेळी संतबाबा बलविंदर सिंघ यांनी या सोहळ्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत असल्याने धन्यवाद मानले. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी या सोहळ्याच्या कालावधीत विविध विभागाने करावयाच्या कामांची माहिती दिली. दिलेल्या सूचनेनुसार संबंधीत विभागाने आपली कामे करावीत, असे सांगितले. तर सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे प्रभारी अधीक्षक ठाणसिंघ बुंगई यांनी सचखंड गुरुद्वाराच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगून सर्वांचे आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे  यांनी मुगट येथील गुरुद्वारा परिसराची पाहणी केली. याप्रसंगी महावितरण, पशुसंवर्धन, पोलीस, पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
     

टिप्पणी पोस्ट करा