NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

दुकानदारी करणाऱ्या दलालांपासून सावध राहून प्रधानमंत्री आवास घरकुलाचा लाभ घ्या

माजी आमदार माधवराव पाटील यांचे आवाहन 

नांदेड (अनिल मादसवार) घरकुलाचा लाभ मिळवून देतो म्ह्णून कुणीजरी दुकानदारी मांडत असले तर त्या ठिकाणी कुणालाही जायची गरज नाही. घरकुल मंजूर होऊन बैंकेचे कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी हिमायतनगर नगरपंचायतीने उचलली आहे. एवढेच नव्हे तर तुमचा वॉर्डातील नगरसेवक - कर्मचारी तुमच्या घरी येऊन प्रस्ताव भरून घेतील. म्हणून घरकुलासाठी दुकानदारी करणाऱ्यांपासून जनतेनी सावधानता बाळगावी आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून पक्क्या घराचे स्वप्न साकार करावे असे आवाहन माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.


ते हिमायतनगर येथील नगरपंचायतीच्या वतीने दि.२० बुधवारी आयोजित विविध लोकाभिमुख योजनांचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर जेष्ठ नेते लक्ष्मण शक्करगे, नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद, तालुकाध्यक्ष विकास पाटील, नाजीम बैंकेचे संचालक गणेश शिंदे, माजी जी.प. सदस्य सुभाष राठोड, माजी सरपंच शे.चांद भाई, जेष्ठ कार्यकर्ते अब्दुल्ला भाई, मुख्याधिकारी नितीन बागुल, पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण, कृउबाचे  माजी सभापती परमेश्वर गोपतवाड, माजी उपसभापती परसराम पवार, ज्योतीताई पार्डीकर, आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी प्रथम श्रीफळ फोडून “प्रधानमंत्री आवास योजना” सर्वांसाठी घरे (शहरी) योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांचे सर्वेक्षण, रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबधारकांना घरकुल योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचा नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद यांच्यासह नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवक, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील पात्र अपंग लाभार्थ्यांना (अर्थसहाय्य) अनुदानाच्या धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना जवळगावकर म्हणाले कि, हिमायतनगर नगरपंचायतीचे अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक शहराच्या विकासासाठी  अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांच्यामुळे शहरात अनेक चांगली कामे होत आहेत, यांचा मला अभिमान आहे. तसेच शहरात स्मशान भूमी, अग्निशमन इमारत, यासह अनेक कामे प्रगतीपथावर असून, लवकरच अग्निशमन वाहनसुद्धा मिळणार आहे. 

आणि प्रामुख्याने महत्वाची असलेली शहराची कायमची पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी खा. अशोकराव चव्हाण साहेबाच्या मार्गदर्शनाखाली भरीव निधी उपलब्ध होणार आहे. चांगली कामे होताना विरोध करणार्यां विरोध करू द्या... कारण मागील २५ वर्षाच्या काळात नगरपंचायतीच्या माध्यमातून भरपूर काय पालट झाल्याचे सर्वसामान्य माणूसही पाहत आहे. त्यामुळे विरोधकांच्या विरोधाला बाजूला ठेऊन प्रामाणिकपणे शहरासह गोरगरीब जाणतेच्या विकासाची कामे करायची आहेत. तसे पहिले तर विरोध करणारे असल्याशिवाय काम करण्यात सुद्धा मजा येत नाही. म्हणून विरोधाला घाबरू नका... माधवराव पाटील तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगून जवळगावकरांनी नगरपंचायत प्रशासनाला प्रोत्साहन दिले. तसेच उपस्थित जनतेने शासनाच्या सर्व नियम अटींच्या शर्तीच्या अधीन राहून घरकुल योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनहि यावेळी त्यांनी केले. याप्रसंगी उपनगराध्यक्षा सौ. सविताताई अनिल पाटील, नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, मो.जावेद अ.गन्नी, सालेह बेगम अ. आहद, सौ.पंचफुलाबाई लोणे, सौ.लक्ष्मीबाई भवरे, मुमताज बेगम मुजतबा खान, हीनाबी सरदार खान, नूरजहाँ बेगम युसूफखान, शमीम बानो अन्वर खान, अ.अगुफरान अ.हमीद, सौ.सुरेखा सदाशिव सातव, शे.रहीम शे.मिरसाब, ज्ञानेश्वर शिंदे, फेरोजखान युसूफखान, अश्रफ भाई, खय्यूम सेठ, डॉ. प्रकाश वानखेडे, सुभाष शिंदे, प्रकाश कोमावार, सलाम भाई, संजय माने, राहुल लोणे, यांच्यासह अनेक मान्यवर शहरातील महिला - पुरुष लाभार्थीं, अपंग समावेशित लाभार्थी, जेष्ठ नागरिक हजारोच्या संख्येत उपस्थित होते.  


भाजपा युवामोर्चाचा निषेध 
प्रधानमंत्री आवास योजण्याच्या शुभारमाभ निमित्त हिमायतनगर नगरपंचायतचा पत्रकात प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी यांचा फोटो टाकला नाही. त्यामुळे शासनाच्या योजनेची अंमलबाजवणी करताना काँग्रेस सत्ताधारी नगरपंचायतीने प्रोटोकॉलचा भंग केला आहे. गांवभर पोष्टरबाजी करून नगरपंचायत प्रशासनाने मनमानी कारभार करून लोकाभिमुख योजनेला तिलांजली दिली आहे. याचा निषेध करत मुख्याधिकारी यांनी याचे उत्तर द्यावे असे नारे देत भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी निषेध करून बहिष्कार टाकला.

टिप्पणी पोस्ट करा