NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

जिल्हा नियोजन समितीवर मुखेडच्या लोहबंदे, सौ. साबणे, सौ. सुगांवकर यांची निवड

तालुक्याच्या विकास कामाला मिळणार गती...

मुखेड  (ज्ञानेश्वर डोईजड) जिल्हा हा नियोजनाचा पायाभूत घटक मानून प्रत्येक जिल्ह्राकरिता यथार्थदर्शी वार्षिक योजना तयार करण्यासाठी जिल्हा स्तरावर सुयोग्य नियोजन यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने े घेउन प्रत्येक जिल्ह्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाची स्थापना केली त्यात मुखेड तालुक्यातील जिल्हा नियोजन समितीवर तिघांची बिनविरोध वर्णी लागल्यामुळे तालुक्याच्या विकास
कामाला गती मिळणार आहे.

यात रासपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस तथा फुलवळ जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य दशरथराव मंगाजी लोहबंदे यांची निवड तर आमदार सुभाष साबणे यांच्या सुनबाई तथा एकलारा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. भाग्यश्री लखन साबणे याची निवड व सावरगांव पि. जिल्हा परिषद गटाच्या सौ. गंगासागर विजयकुमार पाटील सुगांवकर यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे मुखेड तालुक्यासाठी विकास कामाच्या बाबतीत अच्छे दिन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दशरथराव लोहबंदे यांच्या निवडीमुळे रासपात चैतन्याचे वातावरण असून त्यांच्या निवडीबद्दल रासपाचे तालुकाध्यक्ष डॉ. रामराव श्रीरामे, माजी सरपंच बापुराव कांबळे, उपनगराध्यक्षा सौ. रेखा दिपक लोहबंदे, नगरसेवक मैनोदीन शेख, गंगाधर सोंंडारे, श्रावण नरबागे, कंधारच्या सभापती दैवशाला देवकांबळे, पं.स. सदस्य उत्तम चव्हाण, सरपंच लिंगुराम पेंडलवाड, सुभाष पाटील गवते, अशोक नाईक, संभाजी लवटे, माधव लवटे, गोविंद ठावरे, ईसाक हाडोळतीकर, शिवाजी गायकवाड, रोहीदास गजलवाड, कल्याण श्रीरामे, आदींनी अभिनंदनाचा वर्षाव केला. 

तर सौ. भाग्यश्री साबणे यांच्या निवडीबद्दल शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे, जिल्हा नियोजन समितीचे व्यंकटराव लोहबंदे, वसंत संबुटवाड, शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनुरकर, शहरप्रमुख नागनाथ लोखंडे, किसान सेनेचे जिल्हा प्रमुख शंकर पाटील लुट्टे, उप तालुका प्रमुख संजय बेळीकर ,माजी नगराध्यक्ष अनिल जाजू, उप तालुका प्रमुख गंगाधर पिटलेवाड, शहर संघटक राजू गंदपवाड, पं.स. सदस्य जे. बी. कांबळे, पं.स. सदस्य नागनाथ कोटीवाले, संजय पाटील लादगेकर, गजानन पत्की, सतिष डाकुरवार, कृष्णा कामजे, अतुल चव्हाण, पप्पु पाटील डुमणे, मिलिंद लोहबंदे, रवि गंदपवाड, इम्रान आत्तार, बजरंग कल्याणी, माणिक देवकत्ते,आदींच्या स्वाक्ष­या आहेत. तर सौ. गंगासागर विजयकुमार पाटील सुगांवकर यांच्या निवडीबद्दल माजी आमदार किशनराव राठोड, आमदार डॉ. तुषार राठोड, प्रदेश चिटणिस अविनाश गायकवाड, माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, जि.प. सदस्य संतोष राठोड, भाजपाचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील जाहुरकर, सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर, बालाजी पाटील अंबुलगेकर, शहरप्रमुख अशोक गजलवाड, सरपंच नारायण चमकुरे, संगमेश्वर देवकत्ते, किशोरसिंह चौहाण आदींनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
टिप्पणी पोस्ट करा