NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

अंनिसच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

नांदेड (एनएनएल) नांदेड अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बुधवारी शहरातील महात्मा फुले पुतळा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त शहरातील आयटीआय येथील महात्मा फुले पुतळ्याशेजारी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी इंडियन रेडक्रॉस व पारसी अंजुमन ट्रस्टचे प्रदीप कांबळे, विद्या केळकर, जगदीश वंजारे, संजय कोकरे, शिवाजी मसुरे आदी कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात लक्ष्मण शिंदे, वसंत कलंबरकर, शिवाजी नाईकवाडे, अमोल कुलकर्णी, बालाजी टिमकीकर, आनंद बिरादार, विजय डोनेकर , धनंजय बुट्टे, शिवराज जाधव, संजय दारलावर, राहुल भालेराव, विठ्ठल चव्हाण, राजू दहिवाळ आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले. चंद्रहर्ष टीमकीकर याच्या ११ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांना फळे आणि गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदरील शिबिरात अंनिसचे राज्य प्रशिक्षण कार्यवाह इंजि. आनंद बिरादार, जिल्हाध्यक्ष डॉ किरण चिद्रावार,  जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. लक्ष्मण शिंदे , इंजि सम्राट हटकर, इंजि रंजना खटके, प्रा बालाजी कोंपलवार, ऍड. धोंडिबा पवार, बालाजी टीमकीकर, कुलदीप नंदूरकर, राणी बंडेवार, दीपाली हाडोळे, रविकिरण पालकूटवार, अमृत केराळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा