NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

वाचनसंस्कृती संवर्धनासाठी शाळा दत्तक योजना स्तुत्य् उपक्रम --जिल्हाधिकारी

नांदेड (एनएनएल) मानवी जीवनात वाचनाचे महत्व् अगाध असून जगणे समृध्द व परिपूर्ण करण्यासाठी वाचनाशिवाय तरणोपाय नाही. भविष्यातील उत्तम नागरिक घडविण्यासाठी शालेय मुलांना वाचनाची गोडी लावणे आवश्यक असुन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली  नांदेड जिल्हयातील सार्वजनिक वाचनालयांनी सुरु केलेला शाळा दत्तक योजना हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,नांदेड येथे ग्रंथालयशास्त्राचे जनक पदमश्री डॉ.एस.आर.रंगनाथन यांचा जन्मदिन व क्रांतीदिनाचे औचित्यावर शाळा दत्तक योजनेच्या शुभारंभप्रसंगी उदघाटक म्हणून बोलताना मनोगत व्यक्त करीत होते.

अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुरेश सावंत,सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा.आ.गंगाधर पटने, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह निर्मलकुमार सुर्यवंशी व जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची उपस्थिती होती. ग्रंथालयशास्त्राचे जनक पदमश्री डॉ.एस.आर.रंगनाथन व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे प्रतिमेला मान्यवरांचे हस्ते हार अर्पण करण्यात आल्यानंतर प्रास्ताविकातून सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी मराठवाडयामध्ये नांदेड जिल्हयामध्ये प्रथमच शाळा दत्तक योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून नजीकच्या काळात ही योजना इतर जिल्हयामध्येसुध्दा राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुरेश सावंत यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून शालेय मुलांना वाचनाकडे वळवून त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी टिकवून ठेवण्यासाठी करण्यात येणा-या विभिन्न उपक्रमांची माहिती देऊन विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनीही वाचन करणे आजच्या काळाची गरज असल्याचे सांगितले.

ॲड गंगाधर पटने यांनी वाचन चळवळीला राजकीय व शासकीय सहकार्य पूर्णपणे लाभणे असल्याचे सांगून वाचनालयांनी विविध वाचकोपयोगी उपक्रम राबवून लोकाभिमूख होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय समारोप करताना अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सदर योजनेचे कौतुक करुन वाचनालयांनी व शाळांनी ही योजना अविरतपणे चालू ठेवावी जेणेकरुन मुलांना ग्रंथ व ग्रथांना वाचक मिळणे सोपे जाऊन यातून एका निकोप समाजाची निर्मिती होईल असे प्रतिपादन केले. निर्मलकुमार सुर्यवंशी व बसवराज कडगे यांचीही या प्रसंगी समायोचित भाषणे झाली. वाचनसंस्कृती जोपासणारे बसवराज कडगे यांचा यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सत्कार केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा ग्रंथालय अधिकारी,सुनील हुसे यांनी तर आभार प्रदर्शन प्रताप सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे,संगत प्रकाशनचे जयप्रकाश सुरनर, संजय पाटील,गजानन कळके,उमेश जाधव हाळीकर,सुभाष पुरमवार,दशरथ सुकणे,कपाटे महाराज,शिवाजी सुर्यवंशी,सुभाष पाटील,बालाजी नारलावार,कुबेर राठोड,यशवंत राजगोरे,बालाजी पाटील, उध्दव रामतीर्थकर,ज्योतीराम राठोड नवनाथ कदम इ.सह जिल्हयातील वाचनालयाचे व शाळेचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कर्वे, अजय वटटमवार, कोंडिबा गाडेवाड, आरती कोकुलवार, बाळू पावडे, रघुवीर श्रीरामवार, यनगुलवाड इ.चे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा