NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस सदैव प्रयत्नशिल - पो.नि.निकाळजे

नविन नांदेड (एनएनएल) ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी व त्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी पोलीस सदैव प्रयत्नशिल राहिल असे मत ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी हडको येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीत केले. 

ग्रामीण पोलीस स्टेशन, ईच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ हडको व नगरसेविका डॉ.करुणा जमदाडे यांच्या संयुक्तरित्या झालेल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेची बैठक हडको येथील शिवाजी उद्यान परिसरात दिनांक 08 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय पोलीस प्रशिक्षणार्थी प्रशांत ढोणे, मराठवाडा विभागीय फेस्कॉम ज्येष्ठ नागरिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष डी.के.पाटील, उपनिरीक्षक कल्याण नेहरकर, महिला उपनिरीक्षक स्वाती कवाळे, सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक बालाजी इंगेवाड यांच्यासह ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे, नगरसेविका डॉ.करुणा जमदाडे व मान्यवर पदाधिका-यांची यावेळी उपस्थिती होती. बैठकीला मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक निकाळजे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन कटीबध्द असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस सदैव प्रयत्नशिल राहिल असे सांगून ज्येष्ठ नागरिकांनी आपआपले प्रश्न प्रत्यक्ष येऊनही सांगितल्यास, पोलीस प्रशासन तात्काळ सोडवेल अशी ग्वाही यावेळेस दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोणे यांनी संयुक्त कुटूंब पध्दतीत ज्येष्ठ नागरिकांची भुमिका महत्वाची असल्याची सांगून, मला घडविण्यात माझे आजोबा यांची प्रेरणा मला मोलाची ठरल्याची सांगितले. यावेळी विभागीय अध्यक्ष डी.के.पाटील व नगरसेविका करुणा जमदाडे यांनी ज्येष्ठांची कवितेतून भुमिका मांडली. सुत्रसंचालन सचिव शंकरराव धिरडीकर तर आभार हुंबाड यांनी मांडले. ही बैठक यशस्वीसाठी संघटनेचे अध्यक्ष शिंदे, पांचाळ, पुयड, वारकड, बालाजी रहाटकर, गाढे, चंदेल, बच्चेवार, काचावार, दमकोंडवार, भिमराव जमदाडे यांनी प्रयत्न केले. या बैठकीस सिडको हडको परिसरतील जवळपास 200 ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा