NEWS FLASH लोकसभा विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. चारुलता टोकास यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली, भाजप नेते माजी आ.रमेश कदम यांचा समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश, मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची जाणीव करून देण्यासाठी गुरुवारी पनवेल सावंतवाडी दरम्यान काँग्रेस पक्ष करणार सत्याग्रह आंदोलन, मुखेड नगरपरिषदेच्या घन - कचरा व्यवस्थापन टेंडर निविदा प्रक्रिया रखडल्याने जागोजाग घाण साचली, राम शिंदे यांना स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्राचे ब्रँड अम्बॅसेडर नेमा- सचिन सावंत **

५ नोव्हेंबर, २०१६

मेल्यावर स्वर्गाची अपेक्षा करण्यापेक्षा स्वच्छतेतून गावाला स्वर्ग बनवा - मिलिंद व्‍यवहारे



संत गाडगेबाबा स्‍वच्‍छता पालखीतुन हिमायतनगरात प्रबोधन 


नांदेड(अनिल मादसवार)निसर्गाने मानव जातीला सर्वकाही भरभरून दिले आहे. त्यामध्ये स्वच्छ हवा, पाणी, अन्न, फुले, फळे, आदींचा समावेश आहे. परंतु आपण आपल्या बेजबाबदार कृतीमधून निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा नाश करीत आहोत. मेल्यावर स्वर्ग मिळावा अशी अपेक्षा आपण सर्व करीत असतो. परंतु मेल्यानंतर स्वर्ग मिळण्याची अपेक्षा करण्यापेक्षा संत गाडगेबाबांनी दिलेल्या स्वच्छतेच्या प्रेरणेला महत्व द्यावे

४ नोव्हेंबर, २०१६

पोलीस स्थानकात जातीय सलोखा हॉलीबॉल सामने

हिमायतनगर(प्रतिनिधी) येथील पोलीस स्थानकात बुधवारी जातीय सलोखा हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात नगरपंचायतीचे नगरसेवक, पत्रकार, शांतता कमिटीचे सदस्य व युवकांनी सहभाग घेतला होता.

हिमायनगर शहर हे गेल्या अनेक वर्षपासून हिंदू - मुस्लिम एकतेचे प्रतीक

रेल्वे अंडरब्रिज बनला मृत्यूचा सापळा..प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष


नागरिक रेल्वेरोको आंदोलन करण्याच्या तयारीत 
हिमायतनगर(प्रतिनिधी)शहरातील उमरचौक पासून पार्डी, अन्देगाव, टेम्भी, एकघरी, वाशीकडे जाणार्या रेल्वे अंडर ब्रिज रस्त्याची अक्षरशा चाळणी झाली असून, बैलगाडी, दुचाकी वाहनातून ये - जा करणाऱ्या,  नागरीकातून रेल्वे प्रशासन व खासदार, आमदारांच्या नावाने बोटे मोडत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मार्केटचा कायदा... हिमायतनगरात फक्त व्यापाऱ्यांचाच फायदा...! शेतकऱ्यांचा आरोप

हिमायतनगर (अनिल मादसवार) स्थानिक व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांच्या मालाची कवडीमोल दराने कापूस व सोयाबीनची खरेदी केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्याकडून प्राप्त होत आहेत. व्यापार्यांनी हमीभावाने खरेदी करून शेतकर्यांना दिलासा देण्याचे काम कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक व सचिवांचा असताना याकडे दुर्लक्ष करून व्यापाऱ्यांना अभय देत असल्याचा

३ नोव्हेंबर, २०१६

शेतकरी व युवकांनी दिले वानरास जिवदान

हिमायतनगर (प्रतिनिधी) स्वच्छंद बागडणाऱ्या एका वानराला वीजताराचा स्पर्श होऊन जखमी झाल्याची घटना घडली असून, याची माहिती मिळताच येथील शेतकरी व काही युवकांनी तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केल्याने मुक्या प्राण्यास जीवदान मिळले आहे.

याबाबत सविस्तर असे कि, हिमायतनगर शहराजवळ पळसपूर रोड असलेल्या औद्योगीय प्रशिक्षण केंद्राजवळ गणपती वळण रस्ता आहे. सध्या सर्वातर हिरवळ पसरली असल्याने निरसर्ग रम्य वातावरण निर्माण झगले आहे. आमच्या वातावरणात खेळण्या - बागडण्याचा मनमुराद आनंद घेणाऱ्या एका वानरास झाडा जवळ असलेल्या पोलवरिल जिवंत विद्दुत ताराचा स्पर्श झाला. त्यामुळे शोक लागून बजरंगबलीचा अवतार असलेले वानर जमिनीवर

महान संत साधू महाराज

साधुमहाराज पुण्यतिथीनिमित्त कीर्तन भजनाचे आयोजन  

हिमायतनगर(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे विरसनी येथील साधू महाराजांच्या मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही साधू महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. 

विरसनी येथील कर्मभूमी असलेल्या साधू महाराजांची पुण्यतिथी उत्सवानिमित्त कार्तिक शुद्ध दशमी, एकादशी, द्वादशी असे तीन दिवस यात्रा उत्सव साजरा केला जातो. याची सुरुवात दि. 9 नोव्हेंबर रोजी पूजा अभिषेक प्रसाद वितरणाच्या कार्यक्रमाने होणार असून, दि.10 रोजी हजारो नागरिक भक्तांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी हभप. कामारीकर महाराज यांचे भव्य कीर्तन होणार असून, उत्सवाचा समारोप दि. 11 रोजी पालखी मिरवणुकीने करण्यात