NEWS FLASH लोकसभा विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. चारुलता टोकास यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली, भाजप नेते माजी आ.रमेश कदम यांचा समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश, मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची जाणीव करून देण्यासाठी गुरुवारी पनवेल सावंतवाडी दरम्यान काँग्रेस पक्ष करणार सत्याग्रह आंदोलन, मुखेड नगरपरिषदेच्या घन - कचरा व्यवस्थापन टेंडर निविदा प्रक्रिया रखडल्याने जागोजाग घाण साचली, राम शिंदे यांना स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्राचे ब्रँड अम्बॅसेडर नेमा- सचिन सावंत **

२२ सप्टेंबर, २०१६

Relve Brij रेल्वे अंडर ब्रिज धोकादायक

पावसाच्या पाण्याने बांधकाम विभागाच्या निकृष्ठ कामाचे पितळे उघडे

हिमायतनगर(प्रतिनिधी)गेल्या काही महिन्यापूर्वी हिमायतनगर- भोकर रस्त्याची कोट्यावधीच्या निधीतून दुरुस्ती करण्यात आली. मात्र दमदार पावसाने पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, बांधकाम विभागाच्या निकृष्ठ कामाचे पितळे उघडे पडले आहे.

सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाच्या वतीने नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यात कोट्यावधीचा  निधी खर्चुन डांबरीरस्ते, त्याची डागडुजीसाठी खर्च करण्यात आला. उन्हाळ्यात करण्यात आलेल्या

महावितरणच्या कारभाराने बैन्केसह सर्वच कामकाज बंद…शेतकरी नागरिक हैराण

हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरात आज दिवसभर महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे खंडित विद्दुत पुरवठ्याचा सामना राष्ट्रीयकृत बैन्केसह सर्वच शासकीय – निमशासकीय कार्यालयं बसला आहे. दिवसभर कामकाज ठप्प झाल्यामुळे, कामानिमित्त शहरात आलेल्या नागरिक व शेतकर्याना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.

दमदार पावसाने वाडगावसह अनेक गावाच्या पुलावरून पाणी

हिमायतनगर तालुक्यात मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने वाडगावसह अनेक गावाच्या पुलावरून पाणी जाऊ लागल्याने दोन ते तीन तास मार्ग बंद पडले होते.

२० सप्टेंबर, २०१६

pike jomat पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

खडकीतील अवैद्य दारूविक्री बंद करण्यासाठी ग्रामसभेत महिला एकवटल्या

हिमायतनगर(अनिल मादसवार)खडकी बा. गावातील परवानाधारक दारुचे दुकान बंद होऊनही गावात अवैद्य दारू विक्रीमुळे पुन्हा महापूर वाहू लागला आहे. परिणामी महिला वर्गाना दारुड्यांच्या त्रास सहन करावा लागत आहे. याला कंटाळलेल्या महिलांनी दि.19 सॊमवारी झालेल्या ग्रामसभेच्या विशेष बैठकीत राजरोसपणे केल्या जाणाऱ्या दारू विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी महिलांनी केली. तसा ठरावही उपस्थितांच्या एकमताने ग्रामपंचायतीचे अधिकारी - पदाधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्याने अवैद्य धंदे चालकात एकच खळबळ उडाली आहे.

७ सप्टेंबर, २०१६

निराधारांच्या मागण्यासाठी तालुका कांग्रेस कमेटी मागासवर्गीय विभागाचे निवेदन

हिमायतनगर (प्रतिनिधी) तालुका कांग्रेस कमेटी मागासवर्गीय विभागाच्या वतीने नीराधारांच्या विविध मागण्यासंदर्भात मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना तहसीलदार हिमायतनगर यांचा मार्फत दि.07 बुधवारी निवेदन देण्यात आले.

गेल्या काही दिवसापासून निराधारांच्या समस्यांकडे सत्ताधार्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. एवढेच नव्हे तर मानधन वाटपात निराधार समितीच्या काही सदस्यांनी

विघ्नहर्त्याच्या उत्सवावर महावितरणाचे विघ्न... गणेशभक्त संतप्त

हिमायतनगर(प्रतिनिधी)शहर व ग्रामीण भागात गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली असून, तालुक्यात जवळपास 73 हुन अधिक गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु महावितरण कंपनीच्या अधिकारी - कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे विजेचा लपंडाव सुरु असल्याने गणेश भक्त वैतागले आहेत. तात्काळ सुरळीत वीजपुरवठा करावा अन्यथा भक्तांचा उद्रेक होईल असा इशाराही अनेकांनी दिला आहे.

              हिमायतनगर तालुक्याचा कारभार नवीन

६ सप्टेंबर, २०१६

हिमायतनगर तालुक्यातील 53 गावात एक गाव एक गणपती संकल्पना

हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील 53 गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबविली जात आहे. हि बाब हिमायतनगर तालुक्यासाठी भुशनावह आहे, याचा आदर्श सर्व गावातील नागरिकांनी घेवून लोकमान्य टिळकांनी घालून दिलेला एकसंघतेचा उद्देश सफल करावा असे आवाहन पोलिस निरीक्षक  विठ्ठल चव्हाण यांनी केले. 

हिमायतनगर येथील हिंदू - मुस्लिम बांधव गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शांतता व बंधुभावाची परंपरा जोपासत सन- उत्सव साजरे करतात. दरवर्षी होणारा

हिमायतनगरच्या सार्वजनिक वाचनालयाला आली अवकळा...

जुन्या ग्रामपंचायत इमारतीत स्थलांतर करावे
हिमायतनगर(प्रतिनिधी)जुन्या नगरपंचायतीच्या बाजूला असलेल्या नगरपंचायतीच्या वाचनालयाची अत्यंत बिकट अवस्था झाली असून, वाचनालयासाठी इमारत, फर्नीचर, खोलीवर टीन पत्रे नसल्यामुळे  1981 ला स्थापना झालेले हे वाचनालय आता शेवटच्या घटिका मोजत आहेत. या ठिकाणी तत्कालीन  ग्रामपंचयतीच्या इमारतीत सार्वजनिक वाचनालयाची सुरुवात करून वाचकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे.

तत्कालीन ग्रामपंचायतीने सुरु केलेल्या सार्वजनिक वाचनालयात विविध वर्तमानपञांसह येथे जवळपास  अंदाजीत 3999 एवढी

१ सप्टेंबर, २०१६

बळीराज्याचा पोळा दुष्काळाच्या गर्तेतही शेतकऱ्यांनी केला आनंदाने साजरा

हिमायतनगर (प्रतिनिधी) भारतीय परंपरेनुसार वर्षातून एक वेळा येणाऱ्या वृषभराजाचा पोळा दुष्काळाच्या गर्तेतही बळीराजाने उत्साहात साजरा केला आहे. हिमायतनगर नगरपंचायत झाल्यानंतर अधिकारी - पदाधिकारी मानाच्या बैलजोडीसह मारोती मंदिर परिसरात दाखल झाले. यावेळी हजारो शेतकरी आपल्या सर्जा - राज्याची जोडी घेऊन उपस्थित झाले होते. ठरलेल्या वेळेवर पुरोहित परमेश्वर बडवे यांच्या मधुर वाणीतील मंगलाष्ठाकात सायंकाळी 05 वाजून 01 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर येथील बाजार चौकात विवाह सोहळा संपन्न झाला.