NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६

शेतकरी व युवकांनी दिले वानरास जिवदान

हिमायतनगर (प्रतिनिधी) स्वच्छंद बागडणाऱ्या एका वानराला वीजताराचा स्पर्श होऊन जखमी झाल्याची घटना घडली असून, याची माहिती मिळताच येथील शेतकरी व काही युवकांनी तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केल्याने मुक्या प्राण्यास जीवदान मिळले आहे.

याबाबत सविस्तर असे कि, हिमायतनगर शहराजवळ पळसपूर रोड असलेल्या औद्योगीय प्रशिक्षण केंद्राजवळ गणपती वळण रस्ता आहे. सध्या सर्वातर हिरवळ पसरली असल्याने निरसर्ग रम्य वातावरण निर्माण झगले आहे. आमच्या वातावरणात खेळण्या - बागडण्याचा मनमुराद आनंद घेणाऱ्या एका वानरास झाडा जवळ असलेल्या पोलवरिल जिवंत विद्दुत ताराचा स्पर्श झाला. त्यामुळे शोक लागून बजरंगबलीचा अवतार असलेले वानर जमिनीवर कोसळून जखमी झाले. हा प्रकार लक्षात येताच येथील शेतकरी प्रमेश्र्वर वानखेडे यांनी मारोती हनवते, अवधूत बोबीलवार, विजय बोबीलवार यांच्या मदतीने येथील पशूवैधकिय दवाखान्यात दाखल केले. तात्काळ दाखल केल्यामुळे वानरास पशू वैधकिय अधिकारी डि. एम. मादळे, एम. एस. उट्टलवाड यांनी उपचार केला. याची माहिती वनविभागाला देण्यात आल्याने तातडीने वनमजूर शेख अहेमद यांनी भेट दिली. आणि जखमी वनरावर उपचार झाल्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालयात नेऊन खाण्याची सोय केली.
त्यामुळे जखमी वानर आता उद्या मारू लागले असून, शुक्रवारी त्यास जंगलातील वानरांच्या कल्पस्त सोडले जाणार आहे. शोक लागल्यानंतर तातडीने वानरास रुग्णालयात दाखल केल्यामुळे जीवदान मिळाले असून, मुक्या प्राण्यांबाबत शेतकरी व युवकांनी दाखविलेल्या प्रयत्नामुळे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा