NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

भोकरला मटका मिलन ... जुगार खेळताना दोघांना पकडले

भोकर(मनोजसिंह चौव्हाण)शहरातील मुदखेड रस्त्यावरील चिखलवाडी भागात मिलन नावाचा मटका जुगार खेळताना व खेळविताना पोलिसांनी धाड टाकून दोघांना अटक केली आहे. मात्र मुख्य मटका चालकावर कार्यवाही करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की, भोकर शहरातील चिखलवाडी टावर जवळ प्रफुलनगर नगर
येथे दि २३ सोमवारी सायंकाळी ६ वाजता मिलन नावाचा जुगार खेळत व खेळवीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन पो.नि.विठ्ठल चव्हाण व पोलीस कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत विजय तुकाराम थोरात  व उत्तम गिरमाजी निखाते  दोघेही रा.समतानगर, भोकर हे मोबाईल वर मिलन नावाचा जुगार (मटका ) खेळताना व खेळविताना मिळुन आले. पोलिसांनी या दोघास अटक करून मोबाईल व चिठ्या असा १६२० रुपयांचा मुद्दे माल जप्त केला. या प्रकरणी भोकर पोलीसात रात्री उशिरा महाराष्ट्र जुगार अँक्ट कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास पोहेका जवादवार हे करीत आहेत.

भोकर शहरात मटका नावाचा जुगार खेळून अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. मात्र स्थानिक पोलिस प्रशासन याकडे डोळेझाक करीत आसल्याचे दिसत आहे. जेव्हा-जेव्हा कार्यवाही केल्या जाते त्यावेळेस मुख्य चालकाला सोडुन नाममात्र ईतर व्यक्तींना आरोपी केल्या जात आसल्याचे बोलल्या जात आहे. मात्र मुख्य चालकांचा शोध घेवुन त्याच्यावर कार्यवाही होत नाही. त्यामुळे मटकाचालकांचे मनोबल वाढल्याने शहरात बिनधास्तपणे मटका सुरु आहे. सदरील मटकाचालक राजकिय पक्षाशी संबंधित आसल्याचे कळते पोलिसप्रशासन मुख्य सुत्रधाराचा शोध घेवुन  कार्यवाही करतील का? असा प्रश्न नागरिकातुन उपस्थित होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा