NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

जिप.पाणीपुरवठा विभागाचा कार्यकारी अभियंता सहायक ५० हजारांची लाच घेतांना जेरबंद
नांदेड(खास प्रतिनिधी)जिल्हा परिषदेचा वर्ग एकचा अधिकारी पोलिस कोठडीत असतांना आज दुसरा वर्ग एकचा अधिकरी आपल्या सहायकासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याचा प्रकार दुपारी १ वाजता जिल्हा परिषद इमारतीत घडला आहे.  पाणी पुरवठा विभागात टंचाईच्या काळात केलेल्या अडीच लक्ष रुपयांच्या कामाची बिले त्वरित मिळावीत यासाठी तक्रारदारास ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या व ती स्विकारणाऱ्या कार्यकारी अभियंता गंगाधर निवडंगे व त्यांचा सहकारी खाजा मोहियोद्दीन या दोघांना आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जिल्हा परिषदेच्या त्यांच्याच  कार्यालयात रंगेहात पकडून अटक केली.

नांदेड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात गंगाधर निवडंगे हे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. टंचाईच्या काळात एका कंत्राटदाराने अडीच लक्ष रुपयांची कामे केली होती, मात्र त्यांची बिले गेल्या तीन महिन्यापासून मिळत नव्हती. त्यांनी तयार केलेल्या कामाचा अहवाल तसेच एम.बी.वर सह्या करण्यासाठी कार्यकारी अभियंत्याने आपल्या वरिष्ठ सहायकामार्फत ५० हजार रुपयांची लाच मागितली. हे पैसे मिळाल्यानंतरच तुमच्या बिलाचा विचार करु असे निवडंगे व मोहियोद्दीन यांनी सांगितले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात लेखी तक्रार देवून संबंधितावर कारवाईची मागणी केली. आज दुपारी एक वाजता  लाचलुचपत विभागाचे सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक संजय लाटकर, अपर पोलीस अधिक्षक  एस.आर. चव्हाण, पोलीस उप अधिक्षक  संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने निवडंगे यांच्या दालनात सापळा रचला. तक्रारदाराच्या मार्फत ५० हजार रुपये घेताना गंगाधर निवडंगे  व खाजा मोहियोद्दीन या दोघांना रंगेहात पकडले. कार्यालयीन कामकाजाचा दिवस असल्यामुळे हे वृत्त जि.प.च्या आवारात वाऱ्यासारखे पसरले. पोलिसांची जवळपास एक तास ही कारवाई सुरु होती त्यावेळी पाणीपुरवठा विभाग कार्यालयाचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आला होता.निवडंगे यांच्यावर अटकेची कारवाई झाल्याने नांदेड जिल्हा परिषद पुन्हा एकदा वादात सापडली आहे. चार दिवसापूर्वीच कोमवाड नावाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने परस्पर रक्कमा वळवून अपहार केला होता. त्यांच्या निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आज नांदेड जिल्हा परिषदेत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून आणखी दोघांना अटक केली आहे.या दोन लाचखोरांवर वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

लाच लुचपत विभागाने जनतेला  आवाहन करण्यातकेले की, शासकीय अधिकारी/कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडीओ, ऑडीओ क्लिप असल्यास, भ्रष्टाचार संबधाने कांही माहिती असल्यास  किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती असेल तर खालील क्रंमाकावर संपर्क करावा. टोलफ्री हेल्पलाईन क्रंमाक- १०६४ आणि  कार्यालयाचा फोन क्रंमाक ०२४६२-२५३५१२ तसेच पोलीस  उप अधिक्षक संजय कुलकर्णी,  मोबाईल क्रंमाक ८५५४८५२९९९ वर पण भ्रष्टाचार बाबत तक्रार करता येणार आहे आणि दाद मागता येणार आहे
टिप्पणी पोस्ट करा