NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

... अबब पोलीस निरीक्षकाजवळ १४१.५८ टक्के ज्यादा अपसंपदा

नांदेड(प्रतिनिधी)बिलोली पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना पोलीस निरीक्षक उद्धव शिंदे यांनी लाच स्वीकारून आपली प्रतिष्ठा दाखवली होती. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या संपत्तीची उघड चौकशी करून आज त्यांच्या विरुद्ध आपल्या उत्पन्नाशी विसंगत अशी १४१.५८ टक्के संपदा जास्तीची जमवल्या प्रकणी एक नवीन गुन्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर पत्नीसह दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव शिंदे आपल्या नोकरीवर रुजूझाले होते.
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली पोलीस ठाण्यात या पदावर कार्यरत असतांना एका वाळू माफिया कडून लाच स्वीकारल्यानंतर त्यांना अटक झाली होती. त्यांचे निलंबन झाले होते आणि काही दिवसांपूर्वीच ते पुन्हा कामावर रुजू झाले होते. सन २०१३ मध्ये त्यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांची उघड चौकशी केली. ती चौकशी उद्धव विठ्ठलराव शिंदे पोलीस उप निरीक्षक पदावर नोकरी लागली ती तारीख दिनांक ८ नोव्हेंबर १९८३ ते बिलोलीत लाचेची कार्यवाही झाली ती दिनांक ४ जून २०१३ अश्या कालखंडात त्यांचे उत्पन्न आणि त्यांच्याकडे असलेली प्रत्यक्षात संपत्ती या बाबत सर्व स्थरातून चौकशी झाली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या चौकशीत त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात असलेल्या साधनांच्या तुलनेत ५७ लाख २१ हजार ७११ रुपयांची मालमत्ता सापडली. ती मालमत्ता त्यांच्या उत्पन्नाशी विसंगत अशी १४१.५८ टक्के जास्त आहे. ती अपसंपदा जमवण्यात त्यांची पत्नी सविता उद्धव शिंदे यांच्या सहाय्याने जमवली आहे. या बाबत बिलोली पोलीस ठाण्यात उद्धव विठ्ठलराव शिंदे आणि त्यांची पत्नी सविता उद्धव शिंदे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम १३ (१) (इ) सह १३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक संजय लाटकर, अपर पोलीस अधिक्षक  एस.आर. चव्हाण, पोलीस उप अधिक्षक  संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक विश्वजीत जाधव,पोलीस कर्मचारी सुधीर खोडवे,संतोष वाघ,शिवहर किडे यांनी पूर्ण केली आहे. लाच लुचपत विभागाने जनतेला  आवाहन करण्यातकेले की, शासकीय अधिकारी/कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडीओ, ऑडीओ क्लिप असल्यास, भ्रष्टाचार संबधाने कांही माहिती असल्यास  किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती असेल किंवा त्यांच्या कडे अपसंपदा असेल तर खालील क्रंमाकावर संपर्क करावा. टोलफ्री हेल्पलाईन क्रंमाक- १०६४ आणि  कार्यालयाचा फोन क्रंमाक ०२४६२-२५३५१२ तसेच पोलीस उपअधिक्षक संजय कुलकर्णी,  मोबाईल क्रंमाक ८५५४८५२९९९ वर पण भ्रष्टाचार बाबत तक्रार करता येणार आहे आणि दाद मागता येणार आहे
टिप्पणी पोस्ट करा