NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

ऍड. मदन यादव यांचे निधन


नांदेड (प्रतिनिधी) नांदेड वकील संघाचे वकील ऍड.मदन यादव यांचे काल रात्री हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. आज त्यांच्यावर गोवर्धन घाट स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. 
नांदेड जिल्हा वकील संघाचे सदस्य ऍड.मदन यादव हे सुरुवातीच्या काळात वकिलांकडे मुन्शी या पदावर कार्यरत होते. आपल्या अथक प्रयनांनी त्यांनी विधी पदवी प्राप्त केली


आणि आपला स्वतंत्र वकिली व्यवसाय सुरु केला. अत्यंत मेहनती आणि मन मिळवू वृत्तीने त्यांनी अनेकांना आपलेसे केले होते. काल दिनांक ९ ऑगस्ट २०१ ६रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ते न्यायालयात कामकाज करीत होते.घरी गेल्यावर त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला.कुटुंबीयांनी त्वरित उपचारासाठी नेले पण त्यांची प्राणज्योत मावळली होती. आज १० ऑगस्ट २०१६ रोजी त्यांच्यावर गोवर्धनघाट स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या नातलगांसह मोठ्या संख्येत वकील मंडळी उपस्थित होती.  


नांदेड जिल्हा वकील संघाचे सदस्य ऍड.मदन यादव हे सुरुवातीच्या काळात वकिलांकडे मुन्शी या पदावर कार्यरत होते. आपल्या अथक प्रयनांनी त्यांनी विधी पदवी प्राप्त केली आणि आपला स्वतंत्र वकिली व्यवसाय सुरु केला. अत्यंत मेहनती आणि मन मिळवू वृत्तीने त्यांनी अनेकांना आपलेसे केले होते. काल दिनांक ९ ऑगस्ट २०१ ६रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ते न्यायालयात कामकाज करीत होते.घरी गेल्यावर त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला.कुटुंबीयांनी त्वरित उपचारासाठी नेले पण त्यांची प्राणज्योत मावळली होती. आज १० ऑगस्ट २०१६ रोजी त्यांच्यावर गोवर्धनघाट स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या नातलगांसह मोठ्या संख्येत वकील मंडळी उपस्थित होती.  

टिप्पणी पोस्ट करा