NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

जिल्हापरिषद पाणीपुरवठा विभागातील आत्महत्या प्रकरण;कार्यकारी अभियंत्यांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)पाणी पुरवठा विभागातील एका लिपिकाने केलेल्या आत्महत्या प्रकरणात दोन दिवस ते प्रेत दवाखान्यातच राहिल्यानंतर कार्यकारी अभियंता डाखोरे यांच्याविरुध्द आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी 9.30 ते दहा वाजेच्या दरम्यान पाणीपुरवठा विभागातील  कर्मचारी मारोती वाघमारे यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ती आत्महत्या त्यांनी आपल्या कार्यालयात केली. पोलिसांना तेथे चार पानी मृत्यूपूर्व चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत कामाचा अतिरिक्त ताण व निवृत्तीवेतन लागू न झाल्याच्या तणावाखाली येवून आत्महत्या करीत असल्याचे लिहिलेले होते. त्यांची पत्नी गंगाबाई वाघमारे यांनी हे हस्ताक्षरच माझ्या पतीचे नाही, तेंव्हा हस्ताक्षर तज्ञांकडून तपासणी करुन दोषीविरुध्द गुन्हा दाखल करेपर्यंत मारोती वाघमारेवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला.

प्राप्त माहितीनुसार वजिराबाद पोलिसांनी रात्री उशिरा पाणीपुरवठा विभागाचे नांदेड येथून बदलून गेलेले कार्यकारी अभियंता डाखोरे यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पाठपुरावा करताना बहुजन समाज पार्टी, आरपीएफ, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, पुरोगामी लोकशाही आंदोलन आणि इतर अनेक सामाजिक संघटनांनी वजिराबाद पोलीस ठाण्यासमोर जोरदार निदर्शने केली होती. 
टिप्पणी पोस्ट करा