NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

नरेंद्राचार्य महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

हिमायतनगर (प्रतिनिधी) जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या संप्रदाय मंडळाच्या वतीने हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दि.13 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिष्यवृन्दाकडून विविध सामाजिक, अध्यात्मिक उपक्रम साजरे केले जात असून, त्यांच्या 50 वय जन्मोत्सवा निमित्ताने
लष्करातील जवानांसाठी पन्नास हजार रक्तबाटल्या व महाराष्ट्र शासनाला 50 हजार रक्तबोतल्या अश्या एकूण 01 लक्ष रक्तसंकलनाचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात अली आहेत. रक्तदाबाचा पहिला टप्पास दि.06 जुलै पासून सुरुवात झाली असून, या महारक्तदान शिबिराचे आयोजन दि.13 रोजी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात  करण्यात आले आहे. याचे उदघाटन परमेशवर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, नगराध्यक्ष अ.अखिल, जी.प.सदस्य सुभाष राठोड, रामभाऊ ठाकरे, डॉ.वसमतकर, डॉ.गायकवाड, डॉक्टर हुलसुरे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच दि.14 रोजी सरसम प्राथमिक, आरोग्य केंद्र, दि. 12 रोजी पोटा बु. येथील उपआरोग्य केंद्रात,  दि.25 रोजी उपआरोग्य केंद्र कानडली येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन माधव पवार, डॉक्टर सूर्यकांत माने, बाबुराव झुकणारे, खंडू गायके, अशोक माने, मारोती, शिवाजी, परमेश्वर तसेच गंगाधर पडवळे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा