NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

सोशियल मीडियाचा जबाबदारीने वापर करा - पोनी.विठ्ठल चव्हाण

हिमायतनगर (कानबा पोपलवार) वेगाने वाढणाऱ्या सोशियल मीडियाद्वारे केल्या जाणाऱ्या पोस्ट अपलोड करताना प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी बाळगून धार्मिक सौहार्द जपायला हवे. असे मत हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांनी व्यक्त केले.

ते दि.11 ऑगस्ट रोजी पोलीस ठाणे हिमायतनगर येथे आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. हिमायतनगर शहरातील नागरिक, महिला,विद्यार्थी व पत्रकारांशी त्यांनी आज संवाद साधला. यावेळी वाढत्या छेडछाडीच्या घटना, अवैद्य धंदे व गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी उपस्थितांनी केली.

यावर लवकरच उपाययोजना करण्यात येतील व महिला आणि मुलींच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचेही श्री चव्हाण यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन बरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी युवकांचे मानपरिवर्तनात पालकांची भूमिका यासह अनेक विषयावर सखोल चर्चा झाली. बैठकीस पोलीस निरीक्षक नितीन गायकवाड, एसएसआय आडे, पोकॉ. आर. एस.घुन्नर, संदीप बोईनवाड यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीसाठी भाजपचे तालुकाध्यक्ष गजानन तुप्तेवार, नगरसेविका सौ.पंचफुलाबाई लोणे, नगरसेविका सौ.लक्ष्मीबाई भवरे, सुभाष शिंदे, खुदूस मौलाना, फेरोज खान, विठ्ठल फुलके, छायाबाई उमरे, धुरपताबाई मगरे, आर.पी.लोखंडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल मादसवार, तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, परमेश्वर गोपतवाड, अशोक अनगुलवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, संजय मुनेश्वर, सोपान बोंपीलवार, परमेश्वर शिंदे, संजय कवडे, धोंडोपंत बनसोडे, स.मनानं भाई आदींसह अनेक महिला - पुरुष नागरिक व  पत्रकारांची उपस्थिती होती.  
टिप्पणी पोस्ट करा