NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 70 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

हिमायतनगर(अनिल मादसवार)भारत माता कि जयच्या जयघोषाने शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयात 70 भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयात येथील नायब तहसीलदार गायकवाड, यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी जेष्ठपत्रकार भास्कर दुसे, महावीरचंद श्रीश्रीमाळ, गटविकास अधिकारी विलास गंगावणे, तत्कालीन तहसीलदार नारायण पैलवाड, गजानन तुप्तेवार, अनंता देवकते, सरदार खान, अभिषेक लुटे, शे.माजिद तरकरीवाले, यांच्यासह सर्वपक्षीय पुढारी, शहरातील मान्यवर नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित होते.
याच प्रमाणे येथील नगरपंचायत कार्यालयात युवा नगराध्यक्ष अ. अखिल अ. हमीद यांच्या हस्ते 8.30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी जी.प.सदस्य लक्ष्मण शक्करगे, अब्दुल्ला भाई, संभाजी जाधव, विठ्ठलराव वानखेडे, विठ्ठल ठाकरे, उदय देशपांडे, दिलीप लोहरेकर, गोविंद बंडेवार, संजय पेन्शनवार, यांच्यासह सर्व नगरसेवक, कर्मचारी, नागरिक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीत उपसभापती परसराम राठोड यांच्या हस्ते 7.30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी गणेश शिंदे, संदीप पळशीकर, सुभाष शिंदे, शांतीलाल सेठ, रफिक सेठ, गौतम पिंचा, प्रकाश कोमावार, परमेश्वर पानपट्टे, देवकते, शरद चायल, सचिव संतोष गायकवाड यांच्यासह कर्मचारी व संचालक पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक वसमतकर, वैद्यकीय अधिकारी डी.डी. गायकवाड यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येउन सकाळी 7.35 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी, कर्मचारी व परीसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. येथील पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांच्या हस्ते तिरंग्याला मानवंदना देवून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व पोलिस कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. 

येथील भारतीय स्टेट बैंकेत उपशाखाधिकारी साहेबराव अक्कुलवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शहरातील जी.प.केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यांनतर शहरातील मुख्य रस्त्यावरून ढोल - ताश्याच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर काळे, श्याम ढगे, रायेवार सर, रामराव सूर्यवंशी, कंठाळे सर, राहुल मोतेवार, हनुसिंग ठाकूर, साहेबराव आष्टकर, यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, परिसरातील नागरिक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सर्वात जुन्या जी.प. शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फेरोज खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गटशिक्षण अधिकारी तथा प्रभारी मुख्याध्यापक संगपवाड, यावेळी माजी मुख्याध्यापक अक्कलवाड सर, जलील सर, माजी सरपंच शे.चांदभाई, फेरोज खान, जावेद खान, यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पत्रकार व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. शहरातील नृसिंह किड्स वर्ल्ड या इंग्रजी शालेय संचालक संजय मारावर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर गुरुकुल इंग्रजी शाळेत संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनोहर राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी चिमुकल्यांना खाऊचे वितरण करण्यात आले. यावेळी  अनेक चिमुकल्यांनी आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण करून तिरंग्याला मानवंदना दिली. याचप्रमाणे शहर व तालुक्यातील शासकीय, निमशासकीय शाळा, कॉलेज, ग्रामपंचायत आदी ठिकाणी तिरंगा ध्वज उंचावून मानवंदना देण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा