NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

अंबार्इ धाब्याजवळील मटका व जुगारावर धाड, 25 अटकेत, 71 हजाराचा मुदेमालासह जप्त

मनाठा(विजय वाठोरे)हदगांव तालुक्यातील मनाठा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या चोरंबा शिवारात अंबार्इ धाब्याजवळ चालणाऱ्या जुगार, मटका आडयावर मनाठा पोलीस स्टेशनचे सपोनी तात्याराव भालेराव यांनी आज सकाळी धाड टाकुन 25 जणांना अटक तर 71 हजाराचा मुदेमाल जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेल्या काही दिवसापासून मनाठा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या चोरंबा शिवारात मटका - जुगार आड चालविला जात आहे. 


आजसुद्धा अंबार्इ धाब्याजवळ रोडलगतच्या खडयात बैंचवर बसुन तिर्रत नावाचा जुगार खेळत व खेळवीला जात होता. याची माहिती मिळाल्यावरून छापा मारला. याप्रकरणी सपोनी तात्याराव भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राज्याराम मंजाजी सोनटके, कैलास र्इत्रजीत थोरात, शे.करीम, शे.आहेमद, प्रकाशरावजी भालके, गोविंद रामराव पवार, विजय भगवान राठोड, यांच्या विरूध12(अ) मुबर्इ जुगार कायदानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेत रोख 4800रू जप्त करून आरोपीस मनाठा ठाण्यात अटक करण्यात आली. तसेच त्याच दिवसी त्याच ठीकानी 1:15 च्या सुमारास हिंगोली पोलीस स्टेशनचे पि.एस.आय. तानाजी डीगांबर चरले यांच्या पथकाने धाड टाकुन कल्यान, मिलन, टीर्इम बाजार, तारा मुंबर्इ हया नावाने चालु असलेला मटका पकडुन आरोपी संजय गायकवाड, विनोद मस्के, राजु भुसावडे, दिलीप थोरात, मारोती साबळे, सुर्दशन चटलेवाड, विठल देशमुख, रमेश चव्हान, नरहारी बारहाटे, मारोती हापगुंडे, भिमराव पवार, बाबाराव लोणे, अनिल इंगळे, राम शिवनकर, मारोती बसवंते, पिराजी ोटेवाड, कमल यादव, रंगराव कदम, दिलीप चव्हाण यांच्याविरूध मनाठा ठाण्यात कलम 12(अ)मुबर्इ जुगार कायदा नुसार गुन्हा नोदकरून मुदेमालासह 66150 रू जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली.  
टिप्पणी पोस्ट करा