NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

शहिद जवानांना समर्पीत ऐ वतन तेरे लिए 15 रोजी देशभक्ती गीतांचा सोहळा

नांदेड(प्रतिनिधी)देशरक्षणार्थ शहिद जवानांना समर्पीत ऐ वतन तेरे लिए हा देशभक्ती गीतांचा सोहळा दि.15 ऑगस्ट 2016 रोजी सोमवारी सायंकाळी 6 वा. कुसूम सभागृह, व्ही.आय.पी.रोड, नांदेड येथे मुंबईच्या सारेगामा फेम शाकांम्बरी किर्तीकर व हास्यसम्राट राहुल इंगळे यां कलाकाराच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. 
मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, समीक्षा, पत्रकार प्रेस परिषद व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिनी शहिद जवानांच्या कुटूंबियांचा सह्दय कृतज्ञता सन्मान करण्यात येतो. याच सोहळ्यात देश रक्षणार्थ शहिद झालेल्या जवानासह अंतर्गत सुरक्षा करत प्राणांची आहुती देणार्‍या पोलीसांना ऐ वतन तेरे लिए हा देशभक्ती गीतांचा सोहळा समर्पीत करण्यात येतो. यंदा मुंबईच्या सारेगामा फेम गायीका शाकांम्बरी किर्तीकर व हास्यसम्राट राहुल इंगळे यांचा सुप्रसिद्ध संच देशभक्ती गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. गायक, वादक व अँकर ही सर्व मंडळी मुंबईची सुप्रसिद्ध व सुपरिचीत आहेत. तरी राष्ट्रीय एकात्मेचा संदेश देणार्‍या देशभक्ती गीतांच्या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, दिलीप माहोरे, भुमन्ना आक्क्‌ेमवाड, राजीव जैन, शिवहरी गाढे, पत्रकार प्रेस परिषदेचे राज्याचे प्रभारी अरविंद जाधव, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश पांडे व सरचिटणीस तथा संपादक रूपेश पाडमुख यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा