NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, २ जून, २०१६

मनपा मालमत्ता विक्री

मनपा मालमत्ता विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा - बंडू खेडकर

नांदेड(प्रतिनिधी)कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहासाठी दिलेली जागा महानगरपालिका आयुक्त सुशील खोडवेकर,उपायुक्त प्रकाश येवले,मालमत्ता व्यवस्थापक श्रीकृष्ण झाकडे यांनी कट रचून नियमबाह्यरित्या विक्री करण्याचा प्रकार मनपामध्ये शिवसेनेचे विरोधी पक्षनेते बंडू खेडकर यांनी उघडकीस आणला असून या सर्वांना त्वरीत प्रभावाने निलंबित करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.या संदर्भाचे निवेदन खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना दिले आहे.

आज दि.२ जून २०१६ रोजी महापालिकेत झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत शिवसेनेचे मनपा विरोधी पक्षनेते प्रमोद उर्फ बंडू खेडकर यांनी महापालिकेच्या आयुक्तांनी काही अधिकाऱ्यांशी संगनमत करुन शहरात असलेला एक मोकळा भूखंड परस्पर विक्री करण्याचा प्रकार घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून हा प्रकार झाल्याचे सांगून या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करा,अशी मागणी त्यांनी केली. नांदेडच्या वजिराबाद भागात मटन मार्केटजवळ असलेल्या नगर भूखंड क्र.3580 या जागेपैकी 6.10 मीटर बाय ११.८३,७२.१६ अर्थात अंदाजे १६०० स्वेअर फिट एवढी जागा नगरपालिकेच्या सभेच्या मान्यतेने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहासाठी भाडेपट्‌‌यावर देण्यात आली होती. ज्याची मुदत ३१ मार्च २०१२ रोजी संपली  आहे. या जागेची लिज वाढवून देण्यात यावी यासाठी संस्थेने पत्र देखील दिले आहे. मात्र महापालिकेचे यापूर्वीचे आयुक्त सुशिल खोडवेकर, उपायुक्त प्रकाश माधवराव येवले, मालमत्ता व्यवस्थापक श्रीकृष्ण झाकडे या तिघांनी संगनमत करुन तत्कालीन नांदेड नगरपालिकेने कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावे सदर जागा भाडेपट्याने देण्याची मान्यता दिली असताना या जागेवर प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती या नावाने सदरची जागा विक्री करण्याचा प्रताप या मंडळींनी केल्याचा  आरोप खेडकर यांनी केला आहे. सदर नावातील बदलात कोणत्याही सभेची मान्यता देण्यात आली नसल्याने संगनमताने या जागेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे तत्कालीन आयुक्त सुशिल खोडवेकर यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ७९ क मधील तरतुदीनुसार ही जागा विक्री करण्यास मान्यता दिल्याचे स्पष्ट दिसत असले तरीही महानगरपालिकेच्या मालकीची कोणतीही जागा वंश परंपरागत व धार्मिक,सामाजिक कार्याकरिता विक्री करण्याची कोठेही तरतूद नाही. बदली झाल्यानंतर आयुक्तांनी सदरच्या विक्रीसाठी मान्यता दिल्याचे स्पष्ट झाले असून,सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी व प्रकाश येवले यांनी ही संचिका नियमबाह्यरित्या हाताळल्याबद्दल त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी आपण करीत असल्याचे खेडकर यांनी या पत्रकार परिषदेत संागितले.याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटून संबंधित सर्व कागदपत्रे सादर केल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला  शिवसेनेचे महानगर प्रमुख महेश उर्फ बाळू खोमणे यांचीही उपस्थित होते.

दोन चोऱ्यांमध्ये १ लाख २२ हजारांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)नांदेड आणि हदगाव येथे झालेल्या दोन चोऱ्यांमध्ये १ लाख २२ हजार २०० रूपयाचा ऐवज चोरीला गेला आहे.

अब्दुल जफर अब्दुल वाहीद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेडच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ त्यांची तारा मोबाईल शॉपी आहे.त्यांनी दि.३१ मे रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले.१ जून रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा दुकान उघडल्यानंतर दुकानाच्या छताला छिद्र झालेले दिसले.कोणी तरी चोरट्यांनी हे छिद्र पाडून त्यांच्या दुकानातील विविध कंपन्यांचे मोबाईल चोरून नेले आहेत.त्याची एकूण किंमत ७३ हजार ५०० रूपये आहे.वजीराबाद पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक एस.एस.भराटे अधिक तपास करीत आहेत.

दुसऱ्या एका प्रकरणात गोळेगाव ता.बिलोली येथील प्रल्हाद मरीबा वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २५ मे २०१६ ते १ जून २०१६ या दरम्यान त्यांचे सर्व कुटूंबिय घर बंद करून लग्नासाठी गेले होते.या दरम्यान कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराचे दार सोडून आतून सोन्या-चांदीचे दागिने त्यांची एकुण किंमत ४८ हजार ७०० रूपये आहे.चोरून नेले आहे.बिलोली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस हवालदार शिंदे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा