NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, २ जून, २०१६

कडबाकुटी यंत्रासाठी

राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत 
कडबाकुटी यंत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन 
 नांदेड(प्रतिनिधी)राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत  विद्युतचलीत कडबाकुटी यंत्र 50 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येते. या योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील लाभधारकांकडून  शुक्रवार 10 जून 2016 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक लाभार्थीनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पशुधन विकास अधिकारी पंचायत समितीशी संपर्क साधून अर्ज सादर करण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त  नांदेड यांनी केले आहे. 

अर्ज भरण्यासाठी नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत. या योजनेसाठी 2 एचपी क्षमतेचा विद्युतचलीत कडबाकुटी  यंत्रासाठी दरकरारानुसार निश्चित झालेल्या किंमतीच्या प्रति युनिट 50 टक्के अनुदान अनुज्ञेय आहे. ( प्रती युनिट दर 15 हजार 500 रुपये ). यापुर्वी लाभ घेतलेला असल्यास त्यांनी पुन्हा अर्ज करू नये त्यांना लाभ  देण्यात  येणार नाही. कडबाकुटी यंत्राच्या अनुदानाकरिता अनुसुचित जाती लाभधारकाकडे, महिला  शेतकरी  लाभधारकाकडे  कमीतकमी 5 पेक्षा जास्त जनावरे असावे.  विद्युतचलीत कडबाकुटी यंत्राच्या वापरासाठी, स्वत:च्या नावे किंवा कुटूंबातील इतर व्यक्तीच्या नावे आवश्यक वीज जोडणी सुविधा असावी. एका कुटुंबात एकाच व्यक्तिस लाभ देण्यात येईल. लाभधारकाने विहीत नमुन्यात अर्ज भरून त्यासोबत ओळखपत्र, वीज बिलाची झेरॉक्स प्रत, जमीनीचा 7/12 , जनावरे असल्याचे कार्यक्षेत्रातील संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र, शिधापत्रिका  इत्यादी  कागदपत्रे  सादर  करण्यात  यावीत. निवड झाल्यानंतर लाभार्थी हिस्सा 7 हजार 750 रुपये धनाकर्षाव्दारे भरावा लागेल व 100 रुपयांच्या बाँडपेपर  वर विहीत नमुन्यातील बंधपत्र  देणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी, असेही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी कळवले आहे. 

लोकशाही दिनाचे 6 जून रोजी आयोजन
नांदेड(प्रतिनिधी)मान्य जनतेच्या अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने  प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यासत येतो. सोमवार 6 जून 2016 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला असून या दिनामध्ये अर्ज  स्विकारण्याचे  व न स्विकारण्याबाबतच्या  निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. 

तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्याामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत , असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यादिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबित प्रकरणे  आहेत असे अधिकारी  जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे हजर राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास  सुरुवात करण्यात येईल.   

अर्जदार यांनी विहित नमुन्‍यात (प्रपत्र 1 अ ते 1 ड) अर्ज करणे आवश्‍यक. तक्रार निवेदन वैयक्तिक स्‍वरुपाचे असावे. अर्जदाराने विहित नमुन्‍यात 15 दिवस आगोदर दोन प्रतीमध्‍ये जिल्‍हाधिकारी कार्यालयात अर्ज पाठविणे आवश्‍यक आहे. तालुकास्‍तरावर अर्ज दिल्‍यानंतर एक महिन्‍यानंतर जिल्‍हाधिकारी कार्यालय येथील लोकशाही दिनामध्‍ये अर्ज करता येईल. लोकशाही दिनामध्‍ये न्‍यायप्रविष्‍ट प्रकरणे, राजस्‍व / अपील, सेवाविषयक, आस्‍थापना विषयक बाबी, विहित नमुन्‍यात नसलेले, अंतिम उत्‍तर दिलेले आहे किंवा देण्‍यात येणार आहे, निवेदने वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. 

या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या  लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या उपक्रमात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. 

रास्तभाव धान्य दुकानात जूनसाठीची साखर उपलब्ध 
नांदेड(प्रतिनिधी)सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी जून 2016 साठीची साखर रास्त भाव धान्य दुकानात उपलब्ध झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी कळवले आहे.  

या नियतनानुसार  प्रती  व्यक्ती 500 ग्रॅम प्रमाणे साखर प्रौढ अथवा मुल-बालक अशा भेदभाव न करता शिधापत्रिकाधारकांना साखर वितरीत करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्याला आवश्यक 4 हजार 575 क्विंटल साखरेचा पुरवठा उपलब्ध झाला आहे. तालुका निहाय उपलब्ध साखर पुढील प्रमाणे क्विंटल मध्ये : नांदेड- 495, हदगाव-370, किनवट-528, भोकर-178, बिलोली-284, देगलूर-263, मुखेड-506, कंधार-346, लोहा-309, अर्धापूर-131, हिमायतनगर-185, माहूर-223, उमरी-145, धर्माबाद-148, नायगाव-318, मुदखेड-146. याची शिधापत्रिकाधारकांनी नोंद घेवून स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी  नांदेड  यांच्यावतीने  जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

वसतीगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन  

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत  सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात मागासवर्गीय  मुलांचे शासकीय  वसतिगृह  महाराणा प्रताप चौक गांधीनगर  नांदेड  येथे इयत्ता 10 वीचा निकाल  लागल्यानंतर इयत्ता 11 वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेशाकरीता मोफत अर्ज वाटप करण्यात येत आहेत. इच्छूक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक मागासवर्गीय मुलांचे शासकीय  वसतीगृह  गांधीनगर  नांदेड  यांनी  केले आहे. वसतीगृहात  प्रवर्गनिहाय  रिक्त  जागांचा तपशील  पुढील प्रमाणे आहे. अनुसूचित जाती- 23, अनुसूचित जमाती-7, विमुक्त जाती भटक्या जमाती-9, आर्थीदृष्ट्या मागास प्रवर्ग-8, विशेष मागास प्रवर्ग-2 अशी एकूण 49 रिक्त जागा  भरण्यात येणार आहेत. टिप्पणी पोस्ट करा