NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, १ जून, २०१६

भाजप सरकारचा निषेध

पुण्यतिथी साजरी करून विद्यमान भाजप सरकारचा काँग्रेस पक्षातर्फे निषेध

हिमायतनगर(प्रतिनिधी)भाजप सरकारला सत्तेत येउन दोन वर्ष पूर्ण झाली. परंतु निवडणुकीत दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण झालेली नाहीत. १०० दिवसात काळा पैसा भारतात आणतो म्हणणार्यांची वल्गना केवळ हवेतच विरली असून, हेच का तुमचे अच्छे दिन असा घणाघात माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केला. ते हिमायतनगर येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात विद्यमान सरकारची दोन वर्षापूर्तीच्या निषेधार्थ पुण्यतिथी साजरी करून शेतकर्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला. आणि त्या बाबतचे निवेदन तहसीलदार गजानन शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, विद्यमान सरकारने निवडणुकीत शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल इतका भाव देण्याचे जाहीर केले होते. महागाई कमी करून जीवनावश्यक वस्तूच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचे सांगितले होते. परंतु मागील दोन वर्षात एकही आश्वासन पूर्ण तर झालेचा नाही उलट महागाई वाढली आहे. तसेच एपीएलला स्वस्त धान्य देण्याकरिता सरकारकडून दिले जाणारे अंशदान बंद करण्यात आले. तसेच इंदिरा आवास, महिला आदिवासी , दलित अल्पसंख्यांक अश्या विविध घटकासाठी असलेल्या शासकीय योजनांच्या निधिमध्ये कपात केली. एवढेच नव्हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढतच आहे, त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात शासन अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, भरीव आर्थिक मदतीची मागणी मंजूर करण्यास टाळाटाळ केली जात आहे. सत्ताधारी पक्षातील भ्रष्ट नेते व मंत्र्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे समाजातील सर्व घटकामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराविषयी प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.
   
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले, परंतु त्यांचे अच्छे दिन अजूनतरी कोणालाच दिसले नाहीत. उलट देशात यापूर्वी असलेले अच्छे दिन संपुष्टात आणण्याचे कटकारस्थान विद्यमान सरकार करीत आहे. हा प्रकार बंद करून आता तरी शासनाने लोकसभा निवडणुकीत दिलेले आश्वासने पूर्ण करावीत असेही श्री जवळ गावकर म्हणाले. त्यानंतर अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार गजानन शिंदे यांना देऊन विद्यमान शासनाचा निषेध करण्यात आला. या निवेदनावर तालुकाध्यक्ष विकास पाटील, जी.प.सदस्य सुभाष राठोड, गोपाबाई मजळकर, रेहाना बेगम शे.चांद, नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद, उपनगध्यक्ष सविता अनिल पाटील, प्रभाकर मुधोकर, म.जावेद अ.गणनी, सालेह बेगम अ.वाहेद, पंचफुलाबाई लोने, लक्ष्मीबाई भवरे, राबियाबेगम मुमताजखान, हिनाबी सरदार खान, नूरजहा बेगम युसुफ खान, खान शमीम बानो, अ.गुफरान अ.हमीद, सुरेखा सातव यांच्या स्वाक्षर्या आहेत. यावेळी नाजीम बैन्केचे संचालक गणेश शिंदे, माजी तालुकाध्यक्ष जनार्धन ताडेवाड, शहराध्यक्ष फेरोज खान युसुफ खान, ज्ञानेश्वर शिंदे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष म.खालेद भाई, अश्रफ भाई, वसंत कारखान्याचे माजी संचालक जोगेंद्र नरवाडे, संजय माने, स.मन्नान भाई यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा