NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, ३० जून, २०१६

जिल्ह्यात सरासरी 38.56 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात सरासरी 38.56 मि.मी. पाऊस...
सहस्रकुंड धबधबा प्रचंड वेगाने वाहतोय


नांदेड(अनिल मादसवार) जिल्ह्यात गुरुवार 30 जून 2016 रोजी सकाळी  8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकुण 616.88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  38.56 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 212.95 मि. मी. पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस अर्धापूर तालुक्यात झाला आहे. तर अजूनही जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरूच आहे. वरील पातळीवर झालेल्या पावसामुळे सहस्रकुंड धबधबा प्रचंड वेगाने ओथंबून वाहत आहे. 

जिल्हयात गत 24 तासात सर्वाधिक पाऊस अर्धापूर तालुक्यात 107.33 ‍मिमी पडला असून त्याखालोखाल भोकर तालुक्यात 98.75 मिमी. तर हिमायतनगर तालुक्यात 76.00 मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गुरुवार 30 जून 2016 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 38.50 (260.55), मुदखेड- 55.33 (142.33), अर्धापूर- 107.33 (246.66) , भोकर- 98.75 (338.50) , उमरी- 23.00 (129.67), कंधार- 6.33 (143.16), लोहा- 11.17 (208.48), किनवट- 44.86 (213.55), माहूर- 28.25 (238.50), हदगाव- 53.00 (302.83), हिमायतनगर- 76.00 (316.33), देगलूर- 6.50 (150.00), बिलोली - 17.00 (214.60), धर्माबाद- 31.00 (167.67), नायगाव- 13.00 (155.80), मुखेड- 6.86 (178.56) आज अखेर पावसाची सरासरी 212.95 ( चालू वर्षाचा एकूण पाऊस 3406.19) मिलीमीटर आहे. यात सर्वात जास्त पाऊस अर्धापूर, भोकर हिमायतनगर तालुक्यात झाला आहे. तिसऱ्या दिवशी सुद्धा जिल्हाभरात पावसाची संततधार सुरूच असून, कालच्या पावसाने आलेय पूर उतरल्याने सर्वच ठिकाणची वाहतूक पूर्ववत झाली आहे. तर जिल्ह्यातील प्रसिद्ध सहस्र्रकुंड धबधबा ओथंबून वाहू लागला असून, प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या धबधब्याच्या धारांचे फव्वारे पर्यटकांच्या अंगाला शहर आणत आहेत. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी, युवक, युवतींसह अनेक कुटुंब पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. 

मराठवाडा विभागात सरासरी 19.78 मि.मि. पाऊस 

मराठवाडा विभागात आज दि. 30 जून रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी 19.78 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत हिंगोली जिल्हयात सर्वाधिक 61.55 मि.मी. पाऊस झाला. तर उस्मानाबाद जिल्हयात सर्वात कमी 0.88 मि.मि. पाऊस झाला. 

विभागात दि. 30 जून रोजी झालेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे. कंसातील आकडेवारी चालु हंगामातील आजवरच्या एकूण सरासरी पावसाची आहे. औरंगाबाद 3.48 (79.58 ) जालना 25.49 (123.18 ) परभणी 23.39 (123.19 ) हिंगोली 61.55 (190.29) नांदेड 38.56 (212.82 ) बीड 2.39 (118.16) लातूर 2.48 (157.46 ) उस्मानाबाद 0.88 (127.09). विभागात आजवर अपेक्षित सरासरीच्या 97.0 तर वार्षिक सरासरीच्या 18.2 टक्के पाऊस झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा