NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, २७ मे, २०१६

शेतकर्याची आत्महत्या

 तरुण शेतकर्याची गळफास घेवून आत्महत्या


नवीन नांदेड(प्रतिनिधी)नांवामनपा हद्दीतील जुना कौठा येथील तरुण शेतकरी साहेबराव भिमराव गोरे यांनी आपल्या रहात्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 27 मे च्या सकाळी घडली असून, या घटनेमुळे कौठा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी पो.हे.कॉ. मोहन मुभा राठोड यांनी दिलेल्या माहितीनूसार साहेबराव भिमराव गोरे (वय 37) हे आपल्या घरी जुना कौठा येथे टिन पत्राच्या हुकाला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. पत्नीने दरवाजा निघत नसल्याने दरवाजाला जोरदार धक्का दिल्यानंतर साहेबराव गोरे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर आई व पत्नीने जोरदार आक्रोश केला. यानंतर घटनास्थळी अनेकांनी धाव घेतल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी मयत यांचे चुलत भाऊ गोविंद विश्र्वनाथ गोरे यांनी ग्रामीण पो.स्टे. मध्ये तक्रार दिली. घटनास्थळी सतत नापिकीला कंटाळुन आत्महत्या केल्याचे अनेकांनी सांगीतले. मयतास दोन एकर शेती कावलगाव ता.पुर्णा जि. परभणी येथे आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी दोन मुले व तीन बहीणी असा परिवार असून तो परिवारात एककुलता एक मुलगा होता. घटनास्थळी असर्जनचे पो.पा. खंडेराव बकाल यांच्यासह माजी नगरसेवक राजु गोरे, शिवसैनिकनिळकंठ काळे, तलाठी अनिल नरवाडे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरीकांसह अनेकांनी भेट दिली. शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला. या प्रकरणी ग्रामीण पो.स्टे. मध्ये आकस्मात 42/16, 174 सीआरपी नूसार नोंद करण्यात आली. मयतावर जुना कौठा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास पो.नि.सैदाने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हेकॉ. मोहन राठेाड हे करत आहेत.
सिडको परिसरालगत असलेले देशीदारूचे दुकान फोडून देशीदारुसह इतर वस्तुंची चोरी
नवीन नांदेड(प्रतिनिधी)नांदेड - उस्माननगर रोडवरील सिडको वसाहती लगत असलेल्या एका देशी दारुच्या दुकानाचे कुलुप तोडून, जवळपास 32 देशी दारुच्या बॉक्ससह एल.सी.डी. व डी.व्ही.आर. आदी वस्तुंची चोरी करुन चेारट्यांनी पोबारा केला. ही घटना 27 मे ला पहाटेच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
नांदेड उस्माननगर रोडवरील वाघाळा लगत असलेल्या उद्धव कौडगावकर यांच्या मालकीचे असलेल्या देशी दारु दुकान हे काल दि. 26 मे रोजी रात्री व्यवस्थापक प्रभाकर बाबाराव जाधव हे दिवसभर व्यापार करुन त्यांचे सहकारी शामराव आनंदा शिंदे, साहेबराव जळबा कांबळे, तिरुपती गंगाराम जाधव, बळी कांबळे, हणमंतराव साहेबराव कवाळे या सर्वांनी रात्री 10.30 वाजता दुकान बंद करुन सर्व शटर्सना कुलुप लावून ते निघून गेले. 27 मे रोजी नेहमीप्रमाणे ते सकाळी देशी दारु दुकान उघडण्यासाठी आले असता साहेबराव कवाळे (नौकर) यांनी दुकान उघडले असता त्यांना निदर्शनास आले की, दुकानातील सर्व माल हा चोरीस गेला आहे. त्यानंतर त्यांनी फोन करुन मॅनेजर प्रभाकर जाधव यांना कळविल्यानंतर दुकानात जाऊन पाहणी केली असता अज्ञात चोरट्टयांनी प्रथम दुकानातील चॅनलगेटचे त्यानंतर सेंटर गेटचे व पुन्हा चॅनेल गेट व त्यानंतर दरवाजावरील कुलुप असे चार पाच कुलुप तोडून आत प्रवेश करुन देशी दारुचे बत्तीस बॉक्स व एल.सी.डी, डी.बी.आर, मॉनीटर, अशा वस्तुं व नगदी 500 रु. अशा एकूण 80 हजार रुपयांची चेारी केल्याची फिर्याद मॅनेजर प्रभाकर जाधव यांनी ग्रामीण पो.स्टे. मध्ये दिल्यानंतर घटनास्थळी ग्रामीणचे पो.नि. गजानन सैदाने, उपनिरीक्षक नेहरकर, स्थागुशा चे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. व या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर उपनिरीक्षक नेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा च्या कर्मचार्यांनी चोरट्यांचा शोध सुरु केला. या घटनेमुळे मात्र परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 
माता रमाई आंबेडकर स्मृतीदिन साजरा....

नवीन नांदेड(प्रतिनिधी)माता रमाई आंबेडकर स्मृतीदिन माता रमाई चौक सिडको येथे साजरा करण्यात आला.

27 मे रोजी माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त सिडको येथील माता रमाई चौक येथे नामफलकास पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पंचशील त्रिरत्न घेण्यात आली. यावेळी जि.प. कृषी चे माझी सभापती उद्धवराव कौडगावकर, स्वच्छतादूत माधवराव पा. झरीकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त गौतम गजभारे, दलितमित्र के.एन.बोराळे, डॉ. ज्ञानेश्र्वर चिंतोरे, नरसिंग दरबारे, प्रा. एकनाथ वाघमारे, उपेंद्र तायडे, शाहीर गौतम पवार, राजु लांडगे, पत्रकार रमेश ठाकुर, सारंंग नेरलकर यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा