NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

मंगळवार, १० मे, २०१६

वादळी वार्याच्या थैमान

वादळी वार्याच्या थैमानाने अनेक घरांसह महावितरण कंपनीचे प्रचंड नुकसान  

हिमायतनगर(प्रतिनिधी)मागील अनेक दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलाने जाऊन पावसाळ्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे. दि. १० रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास हिमायतनगर तालुक्यात वादळी वार्याने थैमान घातले असून, मौजे वाघी येथे अनेक घरांसह महावितरण कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तत्काळ विद्दुत पुरवठा खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला असून, या पावसामुळे मात्र गर्मीने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

हिमायतनगर शहर आणि ग्रामीण भागात परीसरात गेल्या महिन्याभरापासून उन्हाची तिव्रता वाढली असून, वाढत्या उष्णतेने सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान आठ दिवसापासून आभाळात उन सावल्यांचा खेळ चालू असून, प्रचंड वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटाने नागरिकांसह शेतकर्यांना त्रस्त करून सोडले आहे. दि. १० मंगळवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास सुरु झालेल्या अचानक वादळी वार्यामुळे तालुक्यातील मौजे वाघी गाव परिसरात विजेच्या कडकडाटसह रिमझिम पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली तर काही नागरिकांच्या घरावरील टीन पत्रे उडाली. रात्रीपर्यंत तालुक्यात काही गावात वारे व गारांचा पूस झाला. यात महावितरण कंपनीचे अनेक विद्युत वितरण कंपनीचे लोखंडी खांब जमीनदोस्त झाले. तर टीन - पत्राचे शेड कोसळले असून, यात कोणतीही वाईट घटना घडली नाही. वादळ थांबल्यानंतर नागरिक व महावितरण कंपनीचे कर्मचारी झालेल्या नुकसानीचे साहित्य गोळा करता करता नाके नऊ आल्याचे चित्र दिसून आले आहे. याबाबत तहसील व महावितरण कार्यालयाकडे संपर्क केला असता कुठलेच नुकसानाची माहिती मिळाली नाही. तालुक्यात रात्री ०९ वाजेपर्यंत जोराचा वारा सुटू लागल्याने ग्रामीण भागात अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

वीज पडून उमरखेड तालुक्यातील तिघांचा मृत्यू 
----------------------------
तर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्याला लागून असलेल्या उमरखेड तालुक्यात येणाऱ्या मौजे टाकळी  येथे विज पडून तिन जण जागीच ठार झाले आहेत. यात मारोती हापसे, नितीन शेषराव बाहदूरे, कृष्णा गायकवाड समावेश आहे. सायंकाळी अचानक सुरु झालेल्या वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी हे शेतातील एका झाडाखाली उभे होते. दरम्यान विजांचा कडकाडाट झाडावर वीज कोसळली. यात या तिघांचा मृत्यू झाला असल्याचे आमच्या प्रतिनिधीने सांगितले.  
टिप्पणी पोस्ट करा