NEWS FLASH रजनीकांत के बाद कमल हासन की राजनीति में एंट्री, 26 से करेंगे तमिलनाडु का दौरा,... अमेठी से मिशन 2019 का आगाज करने जा रहे हैं राहुल, रास्ते में खाई चाट - पकौड़ी,... 'घर का मामला था, जिसे सुलझा लिया गया है': जज विवाद पर बोले BCI चीफ,... कुरुक्षेत्र में 'निर्भयाकांड', नाबालिग से गैंगरेप के बाद निर्मम हत्या,... रिपब्लिक डे पर धमाकेदार ऑफर, महज डेढ़ हजार में कर सकेंगे हवाई सफर,... दिल्ली की एक प्लास्टिक फैक्ट्री में लगी भीषण आग, लाखों रुपए का सामान जलकर खाक,... वसीम रिजवी को सिर कलम करने की धमकी, मदरसों पर उठाए थे सवाल,... छग : फिल्म 'नायक' की तरह पार्षद ने की एक दिन का सीएम बनाने की मांग,... Army Day: शहीदों के साहस और जज्बे को राष्ट्रपति और प्रधानमंत्री ने किया सलाम, ..., **

बुधवार, ४ मे, २०१६

रेतीचा राजरोसपणे उपसा

तहसिलदाराच्या आशीर्वादाने पैनगंगेतून होतोय रेतीचा राजरोसपणे उपसा...

हिमायतनगर(प्रतिनिधी)विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीतून बेसुमार पद्धतीने रेतीचा उपसा केला जात आहे. हा सर्व प्रकार खुद्ध तहसीलदार व रेती तस्करांच्या अभद्र युतीमुळे होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरीकातून केला जात आहे. याकडे जिल्हाधिकारी  सुरेश काकांनी यांनी लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.  

एकीकडे जिल्हाधिकारी सुरेश काकांनी म्हणतात कि, अवैद्य रेतीची वाहतूक व उत्खनन याबाबत प्रशासन दक्ष असून, दोषीवर कार्यवाही केली जाईल, याबाबत प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली आहे. यासाठी  उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार, नायबतहसीलदार व तलाठी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. परंतु हिमायतनगर तालुक्यात याउलट चित्र असून, राजकीय वरद हस्त असलेल्या रेती माफियांना खुद्द तहसीलदार महाशय आपल्या स्वार्थापोटी अभय देत असल्याने राजरोसपणे शहरात सुरु असलेले, सिमेंट रस्ते, घर बांधकाम यासह अन्य कामासाठी रेतीची वाहतूक व विक्री केली जात असल्याचे पर्यावरण प्रेमी नागरिक बोलून दाखवीत आहेत. एखाद्या नागरीकाने विचारपूस केली तर मी बाहेर गावी आहे.., आमचा तलाठी येईल..., त्यांच्याकडे परवाना आहे असे सांगून कार्यवाही करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे सांगितले जात आहे.   

चालू आर्थिक वर्षात हिमायतनगर तालुक्यातील एकही रेती घाटाचा लिलाव आजपावेतो झालेला नाही. तरीही बिनदिक्कतपने हजारो ब्रास रेतीचे उत्खनन पळसपूर, घारापुर, रेणापूर, कामारी, एकम्बा, कोठा, दिघी, सर्सम मासोबा नाला आदि ठिकाणाहून करण्यात येत आहे. यामुळे शासनाला महसूला पोटी मिळणारी रक्कम अधिकारी व कर्मचारी वसूल करून आपले चांगभलं करून घेत असल्याची चर्चा नागरीकातून केली जात आहे. या प्रकारामुळे येथील तहसीलदार महाशय हे जिल्हाधिकारी काकांनी यांच्या सूचना वजा आदेशाला केराची टोपली दाखवीत असल्याने तालुक्यातील रेती घाटावर, दगड व मुरुमाच्या खादानीवर  मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात असल्याचे चित्र शहर, ग्रामीण भागात वाहतूक केली जात असलेल्या अवैद्य गौण खनिजाच्या वाहनावरून स्पष्ट होत आहे. हिमायतनगर तालुक्यातील एकही रेती घाटाचा लिलाव झालेला नाही असे खुद्द तहसीलदार सांगतात. मग शहरात रेती, मुरूम, दगडाने भरलेले ट्रेक्टर, ट्रक, टिपर कुठून येतात...? असा सवालही पर्यावरण प्रेमी नागरिक विचारीत आहेत. 

तालुक्यातील दिघी, घारापुर, बोरी, पळसपूर, दिगडी, वारंग टाकळी, कोठा, एकम्बा पेंडावरून रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याच्या तक्रारी अनेक जागरूकांनी संबंधित महसूल अधिकारी व तलाठी कर्मचार्याकडे केल्या. परंतु कार्यवाही करण्याचे सोडून तस्करांना दूरध्वनीवरून तक्रारीची माहिती सांगून तक्रारकर्त्यास धमकावले जात असल्याचे काहींनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले. तर काहींनी पोलिस ठाण्याला रेती बाबत माहिती देवून कळविले होते. 

त्यावरून पोलिस व कर्मचार्यांनी नागरिकांच्या उपस्थितीत काही रेती घाटावर जाउन पाहणी केली. येथे विदर्भातील घाट सोडून मराठवाड्यातील रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी झाल्याचे उघड झाले. याचिया माहिती पोलिसांनी संबंधित तहसीलदार व तलाठी यांना कळविली परंतु त्यापैकी कोणीही याबाबत फिर्याद देण्यास आले नसल्याने कार्यवाही थंडबस्त्यात पडल्याचे नागरिकांनी सांगितले. एकूणच पैनगंगा नदी पत्रातून सुरु असलेल्या या रेती तस्करीला महसूल प्रशासनाचे अधिकारी स्वार्थापोटी अभ देऊन शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारत असल्याचे नागरिक बोलून दाखवीत आहेत.  

याबाबत तहसीलदार यांच्याशी विचारणा करण्यासाठी गेलो असता ते भेटू शकले नाही, तर रेतीचा परवाना दंड वसुली, जमा खर्चाचा कारभार पाहणाऱ्या कर्मचारी गोपेवाड यांच्याशी विचारण केली असता एकही रेती घाटाचा लिलाव झाला नाही. आणि आमच्याकडून कोनालालाही गौण खनिज उत्खनन व वाहतुकीची परवानगी दिली नसून, या वर्षात एकही अवैध्य रेतीची वाहतूक करणार्याकडून कवडीचाही दंड वसूल केला नसल्याचे सांगितले. 

याबाबत तलाठ्यांशी विचारणा केली असता ते म्हणाले कि, आम्ही वाहन पकडले तर साहेबांचा फोन येतो. त्यामुळे नाईलाजास्तव रेतीच्या वाहनास सोडून द्यावे लागत आहे. त्यामुळे आम्ही कार्यवाही कशी करावी असा प्रतिप्रश्न एका तलाठ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.

त्यामुळे तालुक्यातील कामारी, हिमायतनगर, पोटा, दुधड - वाळकेवाडी यासह विविध ठिकाणावर सुरु असलेल्या बंधारे, रस्ते, सिमेंट रस्ते, खाजगी बांधकामासाठी शासनाला चुना लावून रेती, दगड, गिट्टी, मुरूम सप्लाय केले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष देवून आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकारी, कर्मचार्यांवर महसूल प्रकरणी जबाबदार धरून कार्यवाही करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.  
टिप्पणी पोस्ट करा

आजकि खास खबर

टेक्स का भुगतान कर प्रशासन को सहयोग करें -- नगराध्यक्ष अ.अखिल

हिमायतनगर (अनिल मादसवार) शहर के नागरिकों ने प्रशासन के आधिकारियो कि और मार्च एन्डपूर्व   टेक्स का भुगतान कर शहर विकास में सहयोग देंवें ऐ...