NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २५ मे, २०१६

लोहा तालुक्याचा 83 टक्के निकाल

महेश ठाकूर, आकाश पवार, लाभशेटवार, स्नेहा पिठ्ठलवार, श्रद्धा चन्नावार यांचे घवघवीत यश

टेळकीचा यंदाही शुन्य-7 कॉलेज 77 विद्यार्थी

लोहा(प्रतिनिधी)बारावीच्या परिक्षेत लोहा-कंधार तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचे कोरे करकरीत नाणे खणखणविले आहे. महेश धोंडीबा ठाकूर (92 टक्के), आकाश गणेशराव पवार (83 टक्के), मयुर महेंद्र लाभशेटवार (84 टक्के), स्नेहा रमेशराव पिठ्ठलवाड (80 टक्के), श्रद्धा चन्नावार (80 टक्के), बालाजी मारूती कळसकर (80 टक्के) या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. लोहा तालुक्याचा निकालात यंदा वाढ झाली असून तालुक्याचा 83.80 टक्के तर कंधार तालुक्याचा 80.94 टक्के इतका आहे. टेळकीच्या राजाराम कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही निकालाचा भोपळा फोडला नाही तर जि.प.हा.लोह्याच्या ज्यु.कॉलेजमध्ये विद्यार्थीच नाही. उच्च माध्यमिक शालांत परिक्षेचा बुधवारी इंटरनेटद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. लोहा तालुक्यातील 22 ज्यु.कॉलेजमध्ये 1299 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी 1296 जणांनी परिक्षा दिली. यापैकी 1086 जण उत्तीर्ण झाले. तालुक्याचा सरासणी निकाल 83.80 टक्के लागला. लोह्याच्या संत गाडगे महाराज क.महाविद्यालयाचा (89.21 टक्के) तर तालुक्यात सोनखेडच्या शिवाजी ज्यु.कॉलेजचा सर्वाधिक 92.51 टक्के इतकी निकाल लागला. संत बाळगीर महाराज कापशी गुंफा (92.31 टक्के), शिवनिकेतन ज्यु.कॉलेज सावरगाव (न) (81.82), कै.विश्वनाथराव नळगे कनिष्ठ महाविद्यालय लोहा (78.58 टक्के), संजय गांधी ज्यु.कॉलेज कलंबर (81.13 टक्के).

कॉलेज 7 विद्यार्थी 77
-------------
ज्युनइर कॉलेजची अवस्था बिकट झाल्याचे समोर आले. अकरावीला काही ठराविक कॉलेज वगळता इतर कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थी उत्सुक नाहीत. लोह्याच्या जि.प.हायस्कूल (0), कै.राजाराम देशमुख ज्यु.कॉलेज (1), लोकमान्य क.म.सोनखेड (चार), मातोश्री ज्यु.कॉ.सोनखेड (08), श्री छत्रपती ज्यु.कॉलेज (चोवीस) असा सात ज्यु.कॉलेजमध्ये एकुण 77 विद्यार्थी परिक्षेला बसले.

विद्यार्थी संख्या एक-वर्ग आहे मुले नाहीत
-----------------------------------
टेळकीच्या कै.राजाराम देशमुख क.महाविद्यालयाचा निकाल शुन्य टक्के लागला. यंदाही या कॉलेजने मागील कित्ता गिरवला. बारावी वर्गात एक विद्यार्थी परिक्षेला बसला म्हणजे वर्षभर बारावीचे क्लास सुरू नव्हते यावर शिक्कामोर्तब होते. जि.प.हायस्कुलमध्ये अकरावी-बारावीचा वर्ग आहे पण विद्यार्थीच नाहीत.
कंधार तालुक्यात 34 कनिष्ठ महाविद्यालयातून 3043 विद्यार्थी परिक्षेला बसले होते त्यापेकी 3 हजार 33 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. 2455 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शेकडा 80.94 टक्के इतका निकाल तालुक्याचा आहे.

ठाकूर, पवार, लाभशेटवार, पिठ्ठलवाड, चन्नावार यांचे यश
------------------------------
महेश ठाकूर (92) टक्के, आकाश पवार (83 टक्के), मयुर महेंद्रकुमार लाभशेटवार (84.61), स्नेहा रमेश पिठ्ठलवाड (80 टक्के), श्रद्धा विजय चन्नावार (80 टक्के), बालाजी मारूती कळसकर (79 टक्के) यासह तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. बुधवारी दुपारी निकालासाठी ओमसाईचे माधव फुलवरे, एव्हीचे विठ्ठल पांचाळ, सायबरचे ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांच्याकडे गर्दी होती. मोफत निकालपत्रक काढून दिले परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांनी मोबाईलचाच जास्त युज केल्याचे दिसते. श्रद्धा विजयकुमार चन्नावार हिने 84 टक्के गुण कॉमर्समध्ये मिळविले.

गुणवत्ताधारक अभिनंदन
---------------------------
लोहा-कंधार तालुक्यात गुणवत्तेची खाण आहे. दरवर्षी निकालाचा-गुणवत्तेचा आलेख वाढतो आहे. मेहनत जिद्द, चिकाटीच्या बळावर विद्यार्थी राज्याच्या कानाकोपर्‍यात स्पर्धेत यशस्वी होत आहेत. त्यांचे व त्यांच्या पालकांचे, गुरूजणांचे मी जाहीर अभिनंदन करतो, असे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. गटशिक्षणाधिकारी कुलकर्णी, तहसिलदार झंपलवाड, उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांनी अभिनंदन केले.
टिप्पणी पोस्ट करा