NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, ३ मार्च, २०१६

उत्तरपत्रिकेच्या छपाईत चुकीची पुनरावृत्ती

लातूर बोर्डाच्या दहावीच्या उत्तरपत्रिकेच्या छपाईत दोष, 
गतवर्षीच्या चुकीची पुनरावृत्ती, मात्र मनस्ताप विद्यार्थ्यांना....
नवीन नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर च्या वतीने घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षार्थ्यांना जवळपास वेगवेगळ्या प्रकारच्या चार उत्तरपत्रिका देण्यात येत असल्यामुळे परीक्षक व नियामक यांच्यात संभ्रम होण्याची शक्यता असून या पूर्वी परिसरातील एका शाळेला बोर्डाच्या चुका असतांनाही केंद्र प्रमुखांसह चौदा परीक्षार्थ्यांना लातूर बोर्डाच्या केवळ गलथान कारभारामुळे चकरा माराव्या लागल्यामुळे तोच प्रकार यावर्षी पुन्हा काही केंद्रावर निदर्शनास आला असून बोर्डाने तात्काळ सुधारणा करण्याची मागणी होत आहे.

एस.एस.सी बोर्ड परीक्षांना काल दि. 01 मार्च रोजी परिसरातील सहा केंद्रावर सुरुवात झाली. यात गतवर्षी एका परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार्‍या चौदा विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका बदलली असल्याचे कारण देवून विद्यार्थ्यांसह केंद्र प्रमुखांना बोर्डाने नोटीस पाठविली. त्यात त्यांनी स्पष्टीकरण स्वत: लातूर बोर्डात येवून देण्याचे कळविले. त्यावेळी विद्यार्थ्यांसह केंद्रप्रमुखात खळबळ उडाली. यात 20 पानी उत्तरपत्रिकेत अनेक पानावर गुणांकन देण्यात येणार्‍या रकान्यात परीक्षक व नियामक हे रकाने नसल्याचे निदर्शनास आले. गेल्या पंधरादिवसापूर्वी लातूर बोर्डाच्या वतीने विविध केंद्रावर उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्यानंतर संबंधित केंद्रातील शिक्षकांसह केंद्र प्रमुख यांनी सतर्क राहून यावेळेस च्या उत्तरपत्रीका तपासल्या असता याहीवर्षी तोच प्रकार पुन्हा निदर्शनास आला. यात 20 पानी पत्रिकेत प्रत्येक पानावर गुणांकनाच्या रकान्यामध्ये परीक्षक व नियामक यांनी द्यावयाचे गुण व स्वाक्षरी हा रकानाच नसल्याचे स्पष्ट दिसून आले तर काही ठिकाणी दोन, तीन रकाने दिसून येत आहेत. त्यामुळे संबंधित केंद्राने बोर्डालाही कळविले. परंतु काही विद्यार्थ्यांनी 01 मार्च रोजी आहे त्याच उत्तरपत्रिकेवर मराठी विषयाची परीक्षाही दिल्याचे समजते. त्यामुळे हा प्रकार बोर्डाचा असतांनाही विद्यार्थ्याच्या माथी का हा प्रश्न पडला असून बोर्डाने आता तरी उत्तरपत्रिका सुरळीत आणि सुव्यवस्थीत देण्याची मागणी होत आहे.

           हद्दीत दहा केंद्रावर दहावीच्या शालांत परीक्षांना सुरुवात
नवीन नांदेड :ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील दहा केंद्रावर 01 मार्चपासून दहावीच्या शालांत परीक्षांना कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत सुरुवात झाली असून केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नवीन नांदेड परिसरातील इंदिरा गांधी हायस्कूल या ठिकाणी 300 परीक्षार्थी परीक्षा देत असून केंद्र प्रमुख जे.ई. गुपीले हे काम पहातआहेत. तर कुसुमताई चव्हाण माध्य. विद्यालय सिडको केंद्र प्रमुख के.ए. जोशी हे कार्यरत असून या ठिकाणी 294 परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. शिवाजी हायस्कूल सिडको येथे केंद्रप्रमुख अशोक लघुळे हे काम पहात असून या ठिकाणी 300 परीक्षार्थी आहेत. नरहर कुरुंदकर कौठा येथे ......., महात्मा गांधी विद्यालय सिडको येथे 225 विद्यार्थी परीक्षा देत असून केंद्रप्रमुख पी.एम. सांगळे हे काम पहात आहेत. जुना कौठा येथील माधवराव वटेमोड विद्यालयात परीक्षा प्रमुख म्हणून जि.एच. लदाफ हे काम पहात आहेत. जि.प. हायस्कूल विष्णुपूरी , शिवशक्ती माध्य. विद्यालय काकांडी, राष्ट्रमाता मराठी उर्दु शाळा वाजेगाव, गोदावरी माध्य. विद्यालय पिंपळगाव याही ठिकाणी दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून अनेक विद्यार्थी या केंद्रावरपरीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रावर ग्रामीणचे पो.नि. गजानन सैदाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी, होमगार्ड आदींची नियुक्ती करण्यात आली असून परीक्षा केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षांना सुरुवात झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सदैव कार्यरत सौ. बच्चेवार - आ. काळे
 
नवीन नांदेड : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सर्वांगीण विकासासाठी व्यक्तिमत्व विकास घडवून आणणार्‍या सहशिक्षिका सौ. भगीरथी बच्चेवार यांचे कार्य आदर्श असल्याचे प्रतिपादन आ. विक्रम काळे यांनी सेवानिवृत्ती निमित्त निरोप व सत्कार समारंभात केले. इंदिरा गांधी हायस्कूल येथील सहशिक्षीका तथा स्काऊट गाईडच्या कमिश्नर सौ. भगीरथी मारोती बच्चेवार या 33 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असल्याबद्दल इंदिरा गांधी हायस्कूलच्या शालेय समितीच्या वतीने निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस. एल.माचलोड, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आ. विक्रम काळे, साहित्यीक देविदास फुलारी, सामाजिक कार्यकर्त्या तस्लीम पटेल, आकाशवाणीचे भिमराव शेळके, स्काऊट गाईडचे संघटक दिगंबर करंडे, पर्यवेक्षक बि.बी. जाधव, एम.के. गायकवाड यांच्यासह मान्यवर पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. यावेळी आ. काळे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सर्वांगीण विकासासाठी व्यक्तिमत्व विकास घडवून आणणार्‍या सहशिक्षिका सौ. बच्चेवार यांचे कार्य उत्कृष्ट असल्याचे सांगीतले. तर प्रा. तस्लीम पटेल यांनी विद्यार्थ्यांना आईची ममता दिली, शेतकरी कुटुंबात व आदिवासी जमातीत जन्म घ्‌ेवून बिरसामुंडाची प्रेरणा घेवून शैक्षणिक कार्यात अग्रेसर भुमिका घेतल्याचे मत व्यक्त केले. यावेळी अंध विद्यालय धनेगावच्या संचाने सौ. मिरा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत गीत गायले. शालेय समितीच्या वतीने यावेळी सौ. भगीरथी बच्चेवार व जयवंत सोमावाड यांचा सहपरीवार सत्कार केला. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष ए.आर. बायस व एल.वाय. कोलेवाड यांनीही शाल, श्रीफळ व भेट वस्तु देवून सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.बी. जाधव, सुत्रसंचल व्हि.बी. शिंदे तर आभार सावते यांनी मानले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप एस.एल. माचलोड यांनी केला. कार्यक्रमास शिरफुले, बी.ई. चौधरी, आर.जी. बायस, नारवाड, निरपणे, सौ. सोनवणे, माजी मुख्याध्यापक डी.आर. राठोड, माजी पर्यवेक्षक सौ. इनामदार, सौ. सिंधुताई तिडके, सौ. गुमटे, एस.व्ही. पाटील, जे.ई. गुपिले, अमर बायस, बीबी गुपिले, डी.डी. काळे, डी.व्ही फुलारी, मस्के, उमाटे यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा