NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २० जानेवारी, २०१६

महाराष्ट्रात पहिलीच घटना...

बहिणीच्या हुंड्यासाठी भावाने आत्महत्या केल्याची महाराष्ट्रात पहिलीच घटना...
शासनाने कटाक्षाने लक्ष देण्याची गरज 
पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय 
हिमायतनगर(प्रतिनिधी)आजवर सर्वत्र हुंडाबळीने महिलांनी मृत्युला कवटाळल्याच्या घटना आपण ऐकत व पहात आहोत. परंतु हुंडा देऊ न शकणार्या एका बहिणीच्या भावाने आत्महत्या केल्याची घटना हि कदाचित पहिलीच असावी. त्यामुळे या घटनेच्या गांभीर्याकडे शासनाने कटाक्षाने लक्ष देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया गावकर्यांनी दि.२० बुधवारी भेट दिलेल्या मिडीयाच्या कैमेर्यासमोर व्यक्त करून पोलिसांच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त केला आहे. 

मयत युवकांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारी व काही गावकर्यांच्या म्हणण्यानुसार डोलारी येथील मयत सतीश यांचे वडील माधवराव कदम यांच्या नावाने २ ते ३ एकर जमीन आहे. गतवर्षी गावाजवळील शिवशेजारी असलेल्या सिरपल्ली येथील पंजाबराव भुजंगराव जाधव यांचा मुलगा गोपीनाथ जाधव याच्याशी प्रतिष्ठित लोकांनी सोयरिक जुळविली होती. तसेच १२ मी २०१५ रोजी रिती रिवाजाप्रमाणे साखरपुडाही उरकला होता. यावेळी नवरदेवाला कन्यादानरुपी ३ लाख ५० हजार व १० ग्रॅम सोन्याची अंगठी उपस्थितांच्या समक्ष देण्यात आली होती. आणि सन २०१६ मध्ये लग्न करण्याचे ठरले होते. नवीन वर्ष सुरु झाल्याने तसेच दुष्काळी पैस्थिती लक्षात घेता लवकर लग्न सोहळा उरकून घ्यावा ये हेतूने दि.१९ जानेवारी २०१६ शनिवारी गावातील ४ प्रतिष्ठित नागरिक व मयत सतीश माधव कदम हे लग्नाची तारीख ठरविण्यासाठी गेले होते. यावेळी नवरदेवाचे काका रमेश भुजंगराव जाधव यांनी तुम्ही २ लक्ष रुपये कन्यादानाच्या स्वरूपात द्यायला तयार असाल तरच लग्नाची तारीख ठरू असे म्हणून लग्न करायला आम्ही तयार आहोत. तुमची जर पैश्याची सोय होत नसले तर आजच सोयरिक मोडली म्हणून समजा असा सज्जड इशारा दिला होता. 

गेल्या तीन वर्षापासून सतत होत असलेली नापिकी व यावर्षी झालेल्या अल्प पावसामुळे पिके हाताची गेली. त्यामुळे आणखीन हुंड्याची रक्कम कुठून द्यायची या विवंचनेत सतीश व त्याचे वडील होते. दि. १९ रोजी सकाळी ०८ वाजेच्या सुमारास नवरदेवाच्या काकाने मयत सतीशला शेतात बोलावून पैश्याची सोय झाली कि नाही..? पैश्याची सोय होत नसेल तर सोयरिक कश्याला केली.... कोणासोबत तुझी बहिण तशीच पाठवून द्यायची होती.... असे अर्वाच्य भाषेत बोलून अगोदरच व्यतिथ असलेल्या सतीशच्या मनाला अजूनही ठेस पोन्चविली. या गोष्टी मनाला खटकल्यामुळे सतीशचा तणाव जास्त वाढला याच अवस्थेत सतीशने घरी आल्यानंतर आपल्या आई, वडिलास घडलेली हकीकत रडत सांगितली. माझा हयातात माझ्या बहिणीची सोयरिक तुटली आता मझुअ राहून काय फायदा... असे म्हणत दि.१९ जानेवारी रोजी सकाळी ०९ वाजेच्या सुमारास घरातून तो बाहेर पाळला....आणि गावातील ७० फुट खोल असलेल्या सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. 

यास कारणीभूत असलेल्या जबाबदार असणार्यांवर हुंडाबळी आणि मरणास कारणीभूत ठरल्या प्रकानी गुन्हे दाखल करावे अशी मागणी एली होती. परंतु पोलिसांनी तक्रारीला न जुमानता गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली होती, दरम्यान रात्रीला पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन उभारल्याने शेवटी कलम ३०६, ३४ भादवीच्या अनुसार आरोपी रमेश भुजंग राव जाधव, पंजाबराव भुजंगराव जाधव, गोपी भुजंगराव जाधव, भुजंगराव जाधव रा.सिरपल्ली, ता.हिमायतनगर या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक सुशील चव्हाण व त्यांचे सहकारी करीत आहेत. परंतु पोलिसांनी घडलेल्या घटनेच्या गांभीर्यानुसार कलम न लावता आरोपी निर्दोष सुटण्यास मदत व्हावी या पद्धतीच्या कलमा लावल्याचा आरोप मयताचे वडील, आई, बहिण, काका यासह गावकर्यांनी मिडीयाच्या कैमेर्यासमोर केला आहे. त्यामुळे या घटनेत पोलिसांची भूमिका संशयास्पद असून, मयताच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सर्वांवर हुंडाबळी कलमान्वये गुन्हा दाखल करून आम्हा गरिबांना न्याय मिळवून द्यावा अशी रास्त अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

मयत युवकाच्या नातेवाईकांनी आमच्याकडे तक्रार दिली आहे. त्या दिशेने आमची चौकशी सुरु आहे, चौकशीत सत्यता समोर येताच त्यानुसार कलम वाढविण्यात येतील यात आमची काही हरकत नाही. - सुरेश दळवे, पोलिस निरीक्षक हिमायतनगर 
टिप्पणी पोस्ट करा