NEWS FLASH लोकसभा विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. चारुलता टोकास यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली, भाजप नेते माजी आ.रमेश कदम यांचा समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश, मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची जाणीव करून देण्यासाठी गुरुवारी पनवेल सावंतवाडी दरम्यान काँग्रेस पक्ष करणार सत्याग्रह आंदोलन, मुखेड नगरपरिषदेच्या घन - कचरा व्यवस्थापन टेंडर निविदा प्रक्रिया रखडल्याने जागोजाग घाण साचली, राम शिंदे यांना स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्राचे ब्रँड अम्बॅसेडर नेमा- सचिन सावंत **

२६ ऑगस्ट, २०१५

भरदिवसा आखाड्यावर दरोडा...

पाण्याचा बहाणा करून अज्ञात चोरट्यांचा भरदिवसा आखाड्यावर दरोडा...



हिमायतनगर(अनिल मादसवार) शहरातील उत्तरेकडील ७ कि.मी. अंतरावर असलेल्या एका आखाड्यावर अज्ञात चोरट्यांनी पाणी पिण्याचा बहाणा करून महिलेचे तोंड दाबून मारहाण करून अंगातील दागिने लुटून नेल्याची खळबळजनक घटना दि.२६ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर येथील सदन शेतकरी संतोष गाजेवार यांच्या शहरापासून उत्तरेस ७ कि.मी.अंतरावर असलेल्या शेतात सालगडी म्हणून चांदु पुंजाराम अंबेकर हा पत्नी अंजनाबाई सोबत आखाड्यावर राहतो. बुधवार दि.२६ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास चांदु अंबेकर व अन्य एक मजूरदार रामराव कोंडीबा वणेकर हे दोघे शेतातील कापसावर पडलेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणीचे काम करीत होते. तर सालगड्याची पत्नी सौ. अंजनाबाई ही आखाड्यावर जेवणाचा स्वयंपाक करीत होती. दरम्यान अंगावर काळे टीशर्ट असलेला एक २५ ते ३० वर्षवयोगटातील अज्ञात युवक आला. आणि गडीदादा कुठे गेले असे म्हणून त्याने पिण्यासाठी पाणी मागीतले. शेजारील कोणी मजूरदार असेल असे समजून अंजनाबाई हिने त्या युवकास पिण्याचे पाणी दिले. याच वेळी पाठीमागुन अन्य एका युवकाने येवून तोंड दाबून धरले. कोणीही नसल्याचे पाहून दोघांनी सदर महिलेच्या कानातील २ ग्रामचे कर्णफुले व गळ्यातील २ ग्रामचे सोन्याचे मणीमंगळसुत्र अंदाजे ८ हजाराची जबरीने काढून घेतले, यास विरोध करता महिलेस मारहाण करून चोरट्यांनी पलायन केले आहे. 

चोरटे पसार होताच सदर महिलेने आरडा - ओरडा केली असता फवारणी करणारे पती व अन्य एक मजूरदारांनी धाव घेतली मात्र तोपर्यंत अज्ञात चोरटे पसार झाले होते. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे सदर महिला भयभीत झाली आहे. घटनेची वार्ता सर्वत्र पसरल्याने भीतीपोटी शेतीकामासाठी जाणाऱ्या महिलां कामावर येण्यास नकार देत आहेत. घटनेची माहिती मिळताच शिकावू उपविभागीय पोलिस अधिकारी एस.डी.बारी, पोलिस निरीक्षक अशोक चाटे, एएसआय डांगरे, सुरनर, पोहेको. आडे, वसंत जाधव, पोको. डगवाल यांनी घटनास्थळावर पोहंचून पंचनामा केला. याबाबत सौ. अंजनाबाई हिने दिलेल्या फिर्यादिवरून अज्ञात दोन चोरट्याविरुद्ध हिमायतनगर पोलिस स्थानकात कलम ३९२, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिस निरीक्षक अशोक चाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, हि घटना गंभीर असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने अज्ञात चोरट्यांच्या शोधात पोलिस पथक रवाना केले आहे. लवकरच त्या चोरट्यांना आम्ही जेरबंद करून महिला व तालुकावासियांच्या सुरक्षेची जिम्मेदारी पूर्णतः पार पाडू असे आश्वासन दिले.