NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, १० जुलै, २०१५

कायमस्वरूपी पाणी मिळवून देईन

हिमायतनगर - हदगाव तालुक्याला शाश्वत पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - आ.आष्टीकर


हिमायतनगर(अनिल मादसवार) हदगाव हिमायतनगर तालुक्यात राबविल्या जात असलेल्या नळ योजनेची तब्बल १५० करोडोची रक्कम देणे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील तालुक्यातील जनतेला पाणी उपलब्ध नसल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हि समस्या कायमरुपी सोडविण्यासाठी २०० कोटीच्या खर्चातून एम.जी.पी.मार्फत शाश्वत व शुद्धपाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी माझे प्रयत्न सुरु आहेत. असे प्रतिपादन हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केले. ते हिमायतनगर येथील नगरपंचायतीचा प्रशासक पदाचा चार्ज तहसीलदार शरद झाडके यांनी स्वीकारल्यानंतर दिलेल्या भेटीत बोलत होते. 

यावेळी हिमायतनगर शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल शिवसेनेचे आ.नागेश पाटील आष्टीकर व प्रशासक शरद झाडके यांचा शहरातील प्रतिष्ठीत नागरिक व पत्रकारांच्या वतीने सत्कार करून शहरातील नागरिकांना मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले कि, पैनगंगा नदीवर जनतेची कोणतही मागणी नसताना १४२ कोटीच्या खर्चातून मंगरूळ येथे बंधारा बांधण्यात आला. एवढा निधी खर्च करूनही केवळ १० कि.मी.पर्यंत पाणी साठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न जैसे थेच राहून पाणी टंचाई उद्भवणार आहे. कायमरुपी पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी एम.जी.पी.मार्फत इसापूर धरणातून हदगाव -हिमायतनगर तालुक्यासाठी पाणी आणण्याच्या प्रयत्नात आहे. शासनाचे १५० कोटी आणि एम.जी.पी.च्या माध्यमातून २०० कोटीच्या खर्चातून होणार्या सिंचनातील खर्च आणी उपयोग यातील फरक निदर्शनास आणून दिला आहे. त्यामुळे राज्यशासन ५० केंद्रशासन ५० टक्के निधी म्हणजे १०० कोटीमध्ये हि योजना कार्यान्वित होऊन शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी मला वारंवार मुबईला जावे लागत आहे. मी काही कोणता मोठा माणूस नाही जे कि माझे काम फोनवर होईल, म्हणून मला मंत्रालयात जावून अधिकार्यांना भांडून काम करून घ्यावे लागत आहे. यानंतर दोन्ही तालुक्यातील जनतेच्या कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याच्या प्रश्न सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

विरोधी पक्षाकडून आजचे आमदार हे काँग्रेस कार्यकर्ते होत..! या पद्धतीने होत असलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले कि, मी काय.? कोणत्या पक्षाला जन्मलेला नाही. त्यासाठी विरोधकांनी पक्षाबाबत न बोलता विकास कामे करून घेण्यावर भर द्यावा. पक्ष हे निवडणुका पुरते असतात, विकास कामात कोणताही पक्ष नसून, आज मी सर्वांचाच आमदार आहे. या जिल्ह्याचे मुख्यमंत्री असताना नायगाव, हिमायतनगर नगरपंचायतीची घोषणा झाली. मग या दोन्ही ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा का..? मिळवून दिला नाही. असा सवालही त्यांनी करून मी काही एवढे कोटी आणीन असे आश्वासन देणार नाही. परंतु चांगल्या सुविधा व शाश्वत पाण्यासह जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करीन असे ठणकावून सांगितले. यावेळी पं.स. सभापती आडेलाबाई हातमोडे, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, स्विय्य सहाय्यक बंडू पाटील आष्टीकर, माजी जी.पं.सदस्य समद खान, रामभाऊ ठाकरे, शंकर पाटील, मदन पाटील, डॉ.गणेश कदम, राम राठोड, बाळू चवरे, संजय काईतवाड, यांच्यासह शिवसैनिक, नागरिक, पत्रकार उपस्थित होते. 

शिवसेनाच हिमायतनगर शहराचा विकास - महाविरचंद 
--------------------------- 
हिमायतनगर शहराला तालुक्याचा दर्जा शिवसेनेचे आमदार असताना मिळाला. आता नगरपंचायत सुद्धा शिवसेनेच्या आमदाराच्या कार्यकाळात झाली आहे. त्यामुळे हिमायतनगर शहर विकासाचे गदा हा शिवसेनेमुळे पुढे रेटत आहे. असे मत परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी व्यक्त केले. 

नगरपंचायतीसाठी आष्टीकरांचे परिश्रम फळाला - समद खान 
----------------------- 

हिमायतनगर शहराला नगरपंचायतीचा दर्जा प्रस्ताव अगोदर पाठविला हे खरे आहे. परंतु दर्जा मिळवून देण्यासाठी तत्कालीन पुढारी अपयशी ठरले. ग्रामपंचायतीची निवडणूक लागली, आणि मी स्वतः विद्यमान आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्यासोबत मुंबईला गेलो. माझ्या समक्ष मुख्यमंत्र्यासह सर्वांनी त्याने म्हणणे ऐकून हिमायतनगरला नगरपंचायतिचा दर्जा बहाल केला. त्यामुळे आ.नागेश पाटील आष्टीकर यांचे प्रयत्न फळाला आल्याचे मी या डोळ्यांनी पहिले आहे. त्याच प्रमाणे शहरातील नागरिकांना बिसलेरी पाणी मिळवून देण्याबरोबर सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावे, विकास करणार्यांच्या पाठीशी आम्ही आहे. असे मत माजी जी.पं.सदस्य समद खान यांनी व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा