NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

रविवार, १७ मे, २०१५

शागतीत शेतकरी

पेरणी पूर्व मशागतीत शेतकरी गुंतला...
नियोजनपूर्व बैठक संपन्न 


हिमायतनगर(अनिल मादसवार)यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याने तळपत्या उन्हात बळीराजाने खरीप पेरणी पूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. ज्यांच्याकडे बैलजोडी आहे ते शेतकरी बैलाच्या सहाय्याने मशागतीचे कामे करत असले तरी, जाता शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत टेक्टरच्या सहाय्याने मशागतीचे कामे करून घेत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामाच्या नियोजन बाबत पंचायत संती कार्यालयात बैठक संपन्न झाली आहे. 

गत अनेक वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणाने शेतकर्यांचा खरीप हंगाम सतत नुकसानीत येत आहे. यावर्षी चांगला पाऊस असल्याचे व वेळेवर मान्सून येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीला सध्या वेग दिला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तालुक्यातील खरीप हंगामाचे क्षेत्र ४८ हजार ५४३ हेक्टर असून, त्यात पेरणी लावडीचे क्षेत्र ३९ हजार ९२४ हेक्टर आहे. गेल्या वर्षी सन १०१३ -१४ या वर्षात खरीपाची पेरणी ३४ हजार ६४४ हेक्टर वर पेरणी करण्यात आली होती. त्यात कपाशीची पेरणी २१ हजार ६७८ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. तर ५ हजार ६६ हेक्टरवर सोयाबीन या नगदी पिकाची पेरणी करण्यात आली होती. मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांना दुसर्यांदा व काही शेतकर्यांना तिसर्यांदा पेरणी करावी लागली. यामुळे बळीराजाने शेतीसाठी केलेला खर्च सुद्धा निघाला नसल्याने शेतकरी निराशेत जीवन जगात आहे. त्यातच शासनाने सुद्धा शेतकर्यांना म्हणावी तशी नुकसान भरपाईची मदत केली नसल्याने शेतकरी पुरता खचला आहे. 

हवामान खात्याकडून यंद अवेलेवर मान्सूनची दस्तक व चांगला पाऊस असल्याचे सांगण्यात आल्याने नव्या जोमाने शेतकरी पेरणी पूर्व मशागतीत गुंतला आहे. सध्या शेतातील केर कचरा साफ करणे, नांगरणी, वखरणी आदी कामे जोमात सुरु आहेत. तसेच दिवसाआड आकाशात ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचे आगमन होत असल्याने म्हणावी तशी जमीन तापत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. वाढती महागाई यातही शेतकरी तळपत्या उन्हात राब - राब राबत खरिपाच्या तयारीला लागला आहे. 

नुकतीच तालुक्यातील खरीप हंगामाच्या नियोजनासाठी येथील पंचायत समिती कार्यालयात पदाधिकारी व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. त्यात सन २०१५- १६ च्या हंगामासाठी ३५ हजार ७ हेक्टर वर पेरणी अपेक्षित असून, कापूस २१ हजार ८०५ हेक्टर, सोयाबीन ८ हजार ९० हेक्टरवर, भात ४५ हेक्टर, ज्वारी १०४० हेक्टर, तूर २२५० हेक्टर मुग १९८ हेक्टर, उडीद १८२ हेक्टरवर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

या वर्षीच्या खरीप हंगामाच्या ३५ हजार ७ हेक्टरच्या पेरणीसाठी खते, बी - बियाणे लागणार असून, त्यानुसार कपाशीच्या १ लाख ९०२५ पिशव्या, सोयाबीन ५२९८ कुंटल, मुग २९ कुंटल, उडीद २७ कुंटल, तूर ३३ कुंटल, ज्वारी १०४ कुंटल, साळ ४५ कुंटल अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रास्यानिक खतामध्ये ११ हजार ९८ मेट्रिक टनाची आवशकता असून, यात युरिया - ३६५५, डीएपी - २७९५, पोटेश - ९८९ मेट्रिक टन आणि संयुक्त खते २२७ मेट्रिक टन, एसएसपी - १२०० मेट्रिक टन, अमोनियम सल्फेट - १०८ मेट्रिक टन, सीएएन - ४३ मेट्रिक टन, एसओटी - ४३ मेट्रिक टन अशी मागणी करण्यात आली आहे. बाजारात मिळणाऱ्या बियाणांचा वापर शेतकर्यांनी करावा. तसेच शेतकर्यांनी विशिष्ट एकाच वाणाची मागणी न करता कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारसी नुसार आग्वाद करावी, तसेच शेतकर्यांनी घरी असलेल्या सोयाबीनचे बियाणे म्हणून वापर करावे असे आवाहन कृषी विस्तार अधिकारी सुडे, पी.आर.माने यांनी बैठकीत केले आहे.  या बैठकीत शहरातील अधिकारी, व्यापारी, पत्रकार व पदाधिकारी उपस्थित होते.         
टिप्पणी पोस्ट करा